स्वभाव क्रोध मानसिक स्वास्थ्य तत्वज्ञान

राग आल्यावर काय करावे, काही चांगला उपाय आहे का?

6 उत्तरे
6 answers

राग आल्यावर काय करावे, काही चांगला उपाय आहे का?

6
सर्वप्रथम एकेठिकाणी बसून ग्लासभर पाणी प्यावे. त्यानंतर दीर्घ श्वास घ्यावा. आपल्या नोंद वहीत, आपल्याला त्या क्षणी काय वाटते आहे, कोणाचा राग आलाय, का आलाय या साऱ्या गोष्टी लिहून ठेवाव्यात कोणाला बोलून दाखवू नयेत.

यामुळे 2 फायदे होतील:
1. रागाच्या भरात अपशब्दाने कोणाचेही मन दुखावले जाणार नाही.
2. राग शांत झाल्यावर आपण नोंद वहीतील नोंदीच्या आधारे स्वतःच्या वागण्याचे चिंतन करू शकता. उदा. आज दिवसभरात मला कितीवेळा राग आला, माझं रागावणं योग्य होत का, नक्की चूक कोणाची या सर्व गोष्टींचा आपण शांतपणे विचार करू शकतो.
अश्याने आपले राग येण्याचे प्रमाण कमी होईल व आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेऊ शकाल. व असा एक दिवस येईल की तुम्हाला स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायला नोंद वहीची गरज लागणार नाही.
उत्तर लिहिले · 28/3/2017
कर्म · 7400
2
1)पाणी .
विक्षिप्त वाटेल , पण स्वानुभवावरून सांगतोय कि अशा वेळी पाणी पिण खूप लाभदायक ठरत.
2)दीर्घ श्वास.
समोरच्या व्यक्तीला जाणवणार नाही , अशा प्रकारे हळू हळू दीर्घ श्वासोच्छवास करा.
3) विचार
आपला राग हा समोरच्या व्यक्तीमुळे आला आहे की चालू असलेल्या विषयामुळे आलाय ह्यावर थोडं जमले तर विचार करा.
हि मी वापरत असलेली त्रिसूत्री कदाचित तुमच्याही कमी येईल, all the best..👍😊
उत्तर लिहिले · 29/3/2017
कर्म · 21355
0
नक्कीच, राग आल्यावर काय करावे यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
  • श्वासोच्छ्वास व्यायाम करा: दीर्घ श्वास घेतल्याने आराम मिळतो.count to ten. हळू श्वास घ्या आणि सोडा.
  • उदाहरणार्थ: 5 सेकंद श्वास घ्या, 2 सेकंद थांबा आणि 5 सेकंद श्वास सोडा.

  • विश्रांती तंत्रे: ध्यान (Meditation), योगा, किंवा आवडते संगीत ऐका.
  • टीप: नियमित ध्यानाने मानसिक शांती मिळते.

  • शारीरिक हालचाल: चालणे, धावणे किंवा व्यायाम करा.
  • उदाहरण: रोज 30 मिनिटे चाला.

  • मनोरंजन: चित्रपट पाहणे किंवा पुस्तके वाचणे.
  • क्रोध व्यक्त करा: आपल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करा.
  • उदाहरण: "मला राग आला आहे" असे स्पष्टपणे सांगा.

  • समस्या ओळखा: रागाचे कारण समजून घ्या आणि त्यावर तोडगा काढा.
  • टीप: समस्या मुळापासून सोडवण्याचा प्रयत्न करा.

  • सकारात्मक दृष्टिकोन: नकारात्मक विचार टाळा आणि सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
  • उदाहरण: दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा.

  • मदत मागा: गरज वाटल्यास व्यावसायिक सल्लागाराची मदत घ्या.
  • उदाहरण: मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घ्या.

हे काही उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवू शकता.
उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 860

Related Questions

तत्वज्ञानाच्या इतिहासातील प्रमुख दोन तट कोणते?
चैतन्यवादी तत्वज्ञानाचा परिचय करून द्या?
ऑस्कर वाइल्डच्या मते चालू घटकेला कोणते तत्त्वज्ञान आवश्यक आहे?
तत्वज्ञानाच्या इतिहासातील प्रमुख दोन तट कोणते आहेत?
संतानाबद्दलचे तत्त्वज्ञान कोणते?
तत्वज्ञानाचा आशय स्पष्ट करा?
बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान आणि त्याच्या प्रसाराची कारणे सांगा?