4 उत्तरे
4
answers
मला बुलढाणा जिल्ह्याची सर्व माहिती पाहिजे?
3
Answer link
बुलढाणा जिल्हा (किंवा बुलडाणा जिल्हा) हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम, जळगाव-जालना व परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस नेमाड जिल्हा(मध्य प्रदेश) आहे.
जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणार्या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. कापूस, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत.
जिल्ह्यातील तालुके
खामगांव
चिखली
जळगाव जामोद
देउळगांव राजा
नांदुरा
बुलढाणा तालुका
मलकापूर
मेहकर
मोताळा
लोणार
शेगांव
संग्रामपूर
सिंदखेड राजा..
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे
शेगाव येथे श्री संत गजानन महाराजाचे मंदिर आहे व आनंदसागर हा प्रसिद्ध बगीचा आहे.
लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खार्या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे.
जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे गांव छत्रपती शिवाजी राजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान आहे.
नांदुरा येथे जगातील सर्वात मोठी हनुमान मूर्ती आहे.
देऊळगाव राजा हे गाव तेथील बालाजीच्या मंदिरासाठी लोकांना माहीत असते.
लोणार पासून दक्षिणेला १५ किमी अंतरावर (लोणार-आघाव-वझर रोडवर) पार्डा दराडे नावाचे गाव आहे. तेथे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे
लोणार पासून ७ किमी वर पांगरा (डोले) गाव आहे. तेथे भगवान बाबाचे मंदिर आहे.
बुलडाणा जिल्ह्यातच पैनगंगा या नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण बुधनेश्वर हे असून बुलढाणा अजिंठा या रोडवर बुलडाण्यापासून २० किमी अंतरावर आहे.
जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये चिखली पासून फक्त १२ किलोमीटर च्या अंतरावर साकेगाव या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे. निसर्गरम्य असे हे साकेगाव चिखली ते सैलानी या रोडवर आहे.
मोताळा तालुक्यातील तारापुर येथील जागृत देवस्थान अंबादेवीचे मंदिर आहे. राजा हरिश्चंद्र द्वारा स्थापित असुन नवरात्रोस्त्व काळात मोठी गर्दी असते.
सध्या ना. पांडुरंग फुंडकर हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर डाॅ. विजय झाडे हे जिल्हाधिकारी आहेत.

1
Answer link
☙ बुलढाणा जिल्हा ☙
_____________________________
बुलढाणा जिल्हा हा अमरावती विभाग मध्ये असून विदर्भाच्या पश्चिम सीमेवर आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजधानी पासून ५०० कि मी अंतरावर आहेबुलढाणा जिल्ह्यामध्ये १३ तहसील असून ६ महसूल उपविभाग आहेत. जिल्ह्याचे ठिकाण बुलढाणा असून या जिल्ह्यापासून औरंगाबाद (१५० कि मी), अमरावती(२०० कि मी), पुणे(४२५ कि मी), नागपूर(३५० कि मी) अंतरावर आहे.लोणार, शेगाव, सैलानी दर्गा, जिजामाता जन्म ठिकाण हे या जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळे आहेत.२०११ च्या जनगणने नुसार जिल्ह्याची लोकसंख्या २५,८८,०३९ असून लिंग प्रमाण ९२८/१००० आहे. तसेच शिक्षणाची शेकडेवारी प्रमाण ८२.०९% आहे.कापूस,ज्वारी, सोयाबीन, सुर्यफुल हे या जिल्ह्यातील महत्वाचे पिके आहेत. खामगाव, मलकापूर हे महत्वाचे औद्योगिक शहरे आहेत.☙

0
Answer link
बुलढाणा जिल्ह्याची माहिती
बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात येतो. हा जिल्हा पूर्वी विदर्भाचा भाग होता, परंतु आता तो प्रशासकीय दृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रात गणला जातो.
जिल्ह्याची माहिती
- स्थापना: १ मे १९६०
- मुख्यालय: बुलढाणा शहर
- क्षेत्रफळ: ९,६६१ चौ.किमी.
- लोकसंख्या (२०११ नुसार): २५,८६,२५८
भौगोलिक माहिती
बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या वायव्य दिशेला असून तो सातपुडा पर्वतरांगेत वसलेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेला मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे.
- अक्षांश: २०° ३०' उत्तर
- रेखांश: ७६° १८' पूर्व
प्रशासकीय विभाग
- उपविभाग: बुलढाणा, खामगाव, मेहकर, मलकापूर
- तालुके: १३ (बुलढाणा, चिखली, देउळगाव राजा, मलकापूर, मोताळा, नांदुरा, मेहकर, सिंदखेड राजा, लोणार, जळगाव जामोद, संग्रामपूर, शेगाव, खामगाव)
अर्थव्यवस्था
बुलढाणा जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे. ज्वारी, बाजरी, गहू, तेलबिया, कापूस आणि सोयाबीन ही प्रमुख पिके आहेत.
पर्यटन
बुलढाणा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहेत:
- लोणार सरोवर: हे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून ते एका उल्कापातामुळे तयार झाले आहे.
- सिंदखेड राजा: हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांचे जन्मस्थान आहे.
- शेगाव: येथे संत गजानन महाराजांचे प्रसिद्ध मंदिर आहे.
शिक्षण
बुलढाणा जिल्ह्यात अनेक शाळा, महाविद्यालये आणि शिक्षण संस्था आहेत.