औषधे आणि आरोग्य वाचा दोष आरोग्य

बोबडे बोलणे यावरील उपाय काय?

2 उत्तरे
2 answers

बोबडे बोलणे यावरील उपाय काय?

5

तोतरे बोलणे हा एक वाणी चा दोष आहे ज्यात व्यक्ती काही शब्दांची पुनरावृत्ती करतो किंवा काही उच्चार करताना अडखळतो.
हा विकार जास्त प्रमाणात असणारे काही लोक काही शब्द उच्चारूच शकत नाहीत.
अश्या व्यक्ती शक्यतो मूळ स्वराना उच्चारताना अडखळतात.
असे म्हटले जाते की तोतरेबोलणे हा "टिप ऑफ आइसबर्ग " असतो, म्हणजेच जे अडखळने आपल्याला वरदर्शी दिसते त्यापेक्षा खूप जास्त भावनांचा कलोहल त्या व्यक्तीच्या मनात चालू असतो. त्यात सामाजीक भीती आणि चिडवले जाण्याच्या भावाने मुळे अश्या व्यक्ती आपला आत्मविश्वास गमवून बसतात.

लक्षणे :
1. एखादा शब्द किंवा वाक्याची सुरूवात करायला अवघड जाणे.
2. एखादा शब्द परत परत उच्चारणे.
3. काही शब्द उच्चारण्यास संकोच होणे.
4. काही शब्दांचे नाद दीर्घकाळपर्यंत होणे.
5. बोलताना ओठ किंवा जबाडा थरथर कापणे.
6. बोलताना डोळ्यांच्या पापण्यांची वेगाने हालचाल होणे.
7. बोलत असताना चहेरा आणि शरीराचा वरचा भाग कठीण जाणवणे.

कारणे :

बोबडेपणा मूख्यत्वे दोन प्रकारचा आढळतो
1. लहानपणापासून असणारा (Developmental) - हा प्रकार वयाच्या 3 वर्षांपर्यंत सुरू होतो. आजपर्यंतच्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की हा आजार अनुवंशिक असु शकतो. एका अभ्यासात निष्पन्न झले होते की ज्या मुलांच्या आई किंवा वडिलाना हा आजार आहे त्यापैकी 9% मुलांच्या जणुकांमधे काही तत्व आढळली आहेत.

2. चेतासन्स्थेच्या विकारामुळे होणारा (Neurogenic) - यात मज्जतंतूचे वाहनकौशल्य खराब झलेले असते अथवा मेंदूमधील पेशींची विकृती झॅलेली असते, ज्यामुळे तोतरेपना येतो. अपघातात मेंदूला झालेल्या इजे मुळे अथवा अर्धांगवायूनंतर येणारा तोतरेपणा या प्रकारात मोडतो.

उपचार :

आलॉपती (allopathy) मधे तोतरेपणासाठी काही विशेष औशोधोपचार उपलब्ध नाहीत. स्पीच थेरपी ने ह्या आजारास आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो.
होमिओपथिमधे या आजारासाठी उत्तम उपचार उपलब्ध आहे. Stramonium, Merc-sol, Causticum यासारखी उत्तम औषधी या आजारास पूर्णपणे बरे करू शकतात.
या शास्त्रात रुग्नाचे वैयक्तिकीकरण करून उपचार केले जातात त्यामुळे डॉक्टोराँच्या सल्ल्याशिवाय ही औषधे घेऊ नयेत.

उत्तर लिहिले · 25/2/2017
कर्म · 48240
0

बोबडे बोलणे (Stuttering) यावर काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:

  1. स्पीच थेरपी (Speech Therapy): स्पीच थेरपी हा बोबड्या बोलण्यावरचा एक महत्त्वाचा उपाय आहे. स्पीच थेरपिस्ट तुम्हाला बोलण्याची गती कमी करणे, श्वासावर नियंत्रण ठेवणे आणि अडथळ्यांवर मात करण्यासाठी तंत्रे शिकवतात.
    नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन डेफनेस अँड अदर कम्युनिकेशन डिसऑर्डर्स (NIDCD)
  2. इलेक्ट्रॉनिक उपकरणे (Electronic Devices): काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे, जसे की डिलेड ऑडिटरी फीडबॅक (Delayed Auditory Feedback - DAF) आणि फ्रिक्वेन्सी-अल्टरर्ड फीडबॅक (Frequency-Altered Feedback - FAF), बोलण्यात सुधारणा करू शकतात.
  3. समुपदेशन (Counseling): बोबडे बोलण्यामुळे निर्माण होणारा ताण आणि चिंता कमी करण्यासाठी समुपदेशन उपयुक्त ठरू शकते.
  4. गट चर्चा (Support Groups): समान समस्या असलेल्या लोकांबरोबर बोलल्याने आत्मविश्वास वाढतो आणि भावनिक आधार मिळतो.
    The Stuttering Foundation
  5. जीवनशैलीतील बदल (Lifestyle Changes): पुरेसा आराम करणे, नियमित व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे हे देखील महत्त्वाचे आहे.
  6. तंत्रिका तंत्र प्रशिक्षण (Nervous System Training): काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की तंत्रिका तंत्र प्रशिक्षण बोबडे बोलणे कमी करू शकते.

टीप: कोणताही उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा स्पीच थेरपिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 2300

Related Questions

तोटारी न बोलू येण्यासाठी काही उपाय ?
लकव्यामध्ये बोलणे बंद झाल्यास काय उपाय करावे?
माझा भाऊ बारावीमध्ये आहे. तो अजून तोतरा बोलतो तर यासाठी काय उपाय करावे, स्पीच थेरपिस्टचा काही उपयोग असतो का?
भावाला बोलताना अडथळा येतो, 'र' ऐवजी 'ळ' येतं, म्हणजे तो तोतरा बोलतो, वय १७ आहे, मला काही उपाय सांगा?
मला 'ळ' शब्द बोलताना 'ल' हा शब्द बाहेर पडतो, कृपया मार्गदर्शन करा?
मी अडखळत बोलतो, उपाय सुचवावा?
मला स्टॅमरिंगचा प्रॉब्लेम आहे तो कसा कमी केला जाईल?