2 उत्तरे
2 answers

MCA कोर्स बद्दल माहिती द्या?

2
MCA म्हणजेच Master in Computer Application. MCA हा पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे.
या कोर्सचा कालावधी ३ वर्ष असतो.
जर तुम्ही ३ वर्ष BCS/BCA/BSc(IT/Computer Special) केलेले असेल तर तुम्हाला MCA ला  प्रवेश मिळू शकतो.
ज्यांनी BA किंवा BCom केलेले आहे त्यांनी १२ वीला किंवा ग्रॅज्युएशन दरम्यान गणित विषय घेणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला MCA ला प्रवेश मिळू शकतो.

या कोर्स मध्ये तुम्हाला कॉम्पुटर क्षेत्रातील २५ विषय आणि १० प्रॅक्टिकल शिकवले जातात. हे सर्व ३ वर्षाच्या कालावधीत ६ सेमिस्टर मध्ये शिकवले जाते. दर सेमिस्टर ला ५ विषय आणि २ प्रॅक्टिकल असतात. सहावे सेमिस्टर हे इंटर्नशिपसाठी असते. या सेमिस्टर मध्ये तुम्ही IT कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करू शकता. इंटर्नशिप साठी सरकारचा कंपन्यांवर दबाव असल्याने इंटर्नशिप सहज मिळते.
तसेच कोर्स पूर्ण झाल्यानंतर IT कंपनीत महिना १५ ते २५ हजारापर्यंत नोकरी देखील लागू शकते. नंतर जसा अनुभव वाढत जातो तास पगारही वाढत जाईल. इतर कॉर्सपेक्षा MCA हा कोर्स करणे कधीही फायद्याचे ठरेल.
AICTE हि भारत सरकारची संघटना या कोर्सवर नजर ठेवते. खालील PDF मध्ये तुम्ही कोर्सबद्दल सर्व अधिकृत माहिती वाचू शकता:
उत्तर लिहिले · 14/1/2017
कर्म · 283320
0

MCA म्हणजे मास्टर ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशन. हा कोर्स ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित करतो. MCA कोर्स 3 वर्षांचा असतो.

MCA कोर्ससाठी पात्रता:

  • उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
  • उमेदवाराला गणित विषय बारावी किंवा पदवी स्तरावर असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराला किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.

MCA कोर्समध्ये शिकवले जाणारे विषय:

  • प्रोग्रामिंग (Programming)
  • डेटाबेस मॅनेजमेंट (Database Management)
  • ऑपरेटिंग सिस्टम (Operating System)
  • कॉम्प्युटर नेटवर्किंग (Computer Networking)
  • सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग (Software Engineering)

MCA कोर्सनंतर करिअरच्या संधी:

  • सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer)
  • वेब डेव्हलपर (Web Developer)
  • डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर (Database Administrator)
  • नेटवर्क इंजिनिअर (Network Engineer)
  • सिस्टम विश्लेषक (System Analyst)

भारतातील काही टॉप MCA कॉलेज:

  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT)
  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)
  • वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT)
  • सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अँड रिसर्च (SICSR), पुणे
  • दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU)

अधिक माहितीसाठी तुम्ही संबंधित कॉलेजच्या वेबसाइटला भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5400

Related Questions

पुणे युनिव्हर्सिटीमध्ये MCA साठी काय पात्रता आहे? माझ्या १२वी मध्ये गणित विषय नव्हता.