गुगल वेब ब्राउझिंग तंत्रज्ञान संगणक विज्ञान

ऑनलाईन पेपरमधील आवश्यक तेवढीच बातमी कशी सेव्ह करायची?

2 उत्तरे
2 answers

ऑनलाईन पेपरमधील आवश्यक तेवढीच बातमी कशी सेव्ह करायची?

2
तुम्ही कॉम्पुटरवर किंवा मोबाईलवर ही बातमी सेव्ह करू शकता.
मोबाईल वर:
मोबाईल वर जेव्हा बातमी दिसत असेल तेव्हा स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट मध्ये स्क्रीन चा फोटो सेव्ह होतो. स्क्रीनशॉट घेण्यासाठी पॉवर बटन आणि आवाज कमी करण्याचे बटन, दोन्ही सोबत दाबून धरावे. बातमी मोठी असेल तर स्क्रीन स्क्रोल करून दुसरा स्क्रीनशॉट घ्यावा. स्क्रीनशॉट घेतलेले सगळे फोटो तुमच्या मोबाईलमध्ये आपोआप सेव्ह होतात. तुम्ही ते गॅलरी किंवा फोटो अँप मध्ये जाऊन पाहू शकता.

कॉम्पुटर वर:
विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या कॉम्पुटरवर Snipping Tool नावाचे सॉफ्टवेअर आहे. Snipping चा अर्थच कात्रण असा होतो. हे सॉफ्टवेअर फ्री आहे आणि आधीपासूनच कॉम्पुटरवर इन्स्टॉल असते.
या सॉफ्टवॅरमध्ये तुम्ही कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या कुठल्याही गोष्टीचे कात्रण घेऊ शकता. म्हणजेच तुम्ही जी बातमी वाचत असाल ती स्क्रीनवर राहूद्या आणि Snipping Tool चालू करा. कात्रण घेतल्यानंतर ते तुम्ही इमेज म्हणून कॉम्पुटरवर सेव्ह करू शकता.
ते कसे वापरायचे यासाठी खालील व्हिडीओ पहा:

उत्तर लिहिले · 27/12/2016
कर्म · 283280
0

ऑनलाईन पेपरमधील आवश्यक तेवढीच बातमी सेव्ह करण्याचे काही सोपे मार्ग:

  1. कॉपी-पेस्ट (Copy-Paste):

    तुम्हाला जी बातमी हवी आहे, ती सिलेक्ट (select) करा. Ctrl + C (Windows) किंवा Command + C (Mac) दाबून कॉपी करा. वर्ड (Word) डॉक्युमेंट किंवा टेक्स्ट एडिटरमध्ये Ctrl + V (Windows) किंवा Command + V (Mac) दाबून पेस्ट करा.

  2. रीडर मोड (Reader Mode):

    ब्राउझरमध्ये 'रीडर मोड' असतो. ॲड्रेस बारमध्ये (address bar) त्याचे चिन्ह दिसते. त्यावर क्लिक केल्यास बातमीतील जाहिराती आणि इतर अनावश्यक गोष्टी न दिसता फक्त टेक्स्ट (text) दिसतो. ते कॉपी करून पेस्ट करता येते.

  3. स्क्रीनशॉट (Screenshot):

    तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये बातमीचा स्क्रीनशॉट काढू शकता. परंतु, या पद्धतीने टेक्स्ट कॉपी करता येत नाही.

  4. ॲप्स आणि एक्सटेन्शन्स (Apps and Extensions):

    ब्राउझरसाठी काही ॲप्स आणि एक्सटेन्शन्स उपलब्ध आहेत, जे वेबपेजमधील फक्त महत्वाचा भाग सेव्ह (save) करायला मदत करतात.

यापैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल, ती वापरून तुम्ही बातमी सेव्ह करू शकता.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 1860

Related Questions

मला उत्तर ॲप हे वेबसाईटवर ओपन करायचे आहे, कसे करायचे?
मूव्हीज डाउनलोड करण्यासाठी वेबसाईट कोणत्या आहेत, त्या कोणत्या ब्राउजरवर उघडतात, डाउनलोड करण्यासाठी नक्की कोणती लिंक आहे हे कसे ओळखावे?
गुगल वेबपेजवरती साईट ओपन होत नाही. 'Site cannot be reached' असा मेसेज येतो, तर साईट ओपन करण्यासाठी काय करावे?
एखादी वेबसाइट आपल्या मोबाईलवर दिसली नाही पाहिजे असं काही ॲप आहे किंवा सेटिंग आहे का?