कर्ज अर्थ अर्थशास्त्र

खाजगी सावकारी व्यवसायाचा परवाना कसा मिळवावा? किती खर्च येतो?

2 उत्तरे
2 answers

खाजगी सावकारी व्यवसायाचा परवाना कसा मिळवावा? किती खर्च येतो?

9
खासगी सावकारीसाठी महाराष्ट्र शासनाने २०१४ साली एक अध्यादेश काढला आहे. त्यानुसार खासगी सावकारीसाठी रीतसर अर्ज सहाय्यक निबंधकांकडे करणे बंधनकारक केले आहे. सावकारी परवान्यांचा कालावधी १ एप्रिल ते ३१ मार्च असा राहील. या कायद्यानुसार निबंधकांना दिवाणी न्यायालयास असलेले अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

यासाठी खर्च किती येईल हे निबंधक कार्यालयाकडून कळू शकेल. 

अर्जाचा नमुना व तपशील
विहित नमुन्यातील अर्जात पुढीलप्रमाणे खाते संपूर्ण तपशिलासह देणे आवश्‍यक असते. त्यात पुढील तपशिलाचा ऊहापोह असतो :
* सावकाराचे नाव, तसेच जबाबदार व्यक्तीचे नाव व पत्ता.
* अविभक्त कुटुंबाचे वतीने अर्ज असेल तर कुटुंबातील सर्व प्रौढ सभासदांची यादी, नावे व पत्ते.
* संस्थेतर्फे अर्ज असेल तर त्या त्या कायद्यानुसार संस्थेचा पूर्ण तपशील व त्यासंबंधीचे नोंदणी प्रमाण पत्र.
* ज्या ठिकाणी सावकारीचा धंदा करत आहे किंवा करावयाचा असेल त्याचा तपशील.
* ज्या वर्षासाठी सावकारीचा धंदा करायचा त्या वर्षीसाठी गुंतवत असलेल्या भांडवलाची उभारणी तपशील.
* सोबत रु. 200 लायसन्स फी चलन.

लायसन्सच्या शर्ती
* लायसन्सवर लिहिलेल्या शर्ती बंधनकारक.
* फक्त कार्यक्षेत्रात सावकारीचा धंदा करता येईल.
* लायसन्स देण्यापूर्वी संबंधित ग्रामसभा/ पंचायतीची शिफारस व त्यांचेबरोबर विचार विनिमय आवश्‍यक.
* सोबत संबंधित ग्रामसभा, पंचायतीचा ठराव आवश्‍यक.
* ग्रामसभेने केलेला ठराव पंचायत समितीवर बंधनकारक असेल.

सावकारी लायसन्स नाकारण्याची कारणे
* कायद्याने अक्षम व्यक्ती.
* लायसन्स धारण्याची पात्रता नसेल तर.
* या कायद्याचे नियमांचे व तरतुदीचे पालन न केल्यास.
* अर्जदाराने सावकारीचा धंदा करताना संबंधित फसवणुकीचे वा अप्रामाणिकपणाचे कृत्य करण्यात जाणून बुजून भाग घेतला असल्यास किंवा यासाठी साह्य करणे वा जाणून बुजून दुर्लक्ष केलेले असल्यास.
* भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 465, 477, 477 क यावरील गुन्ह्यांची नोंद असल्यास व अपराधी म्हणून घोषित झालेला असल्यास यात पुढील गुन्ह्यांचा समावेश होतो.
(अ) घरफोडीचा गुन्हा.
(ब) धोखाधडी
(क) खोटे दस्त करणे, दस्त गायब करणे वा दस्तास इजा पोचवणे.
(ड) चुकीचे खाते ठेवणे/ खाते न ठेवणे.

अपिलाची पद्धत
सहायक निबंधकाने वरीलपैकी कोणत्याही व इतर कारणास्तव अर्ज नाकारल्यास सदर निर्णयाविरुद्ध महानिबंधकाकडे अपील करता येईल.

दिलेले लायसन्स रद्द करण्याची पद्धत
* वर दिलेल्या कोणत्याही कारणासाठी लायसन्सधारक दोषी आढळल्यास.
* कायद्याने कोणतेही दुष्कृत्यासाठी दोषी आढळल्यास.
* लायसन्स रद्द करणेपूर्वी नोटीस देऊन, म्हणजे मांडण्याची संधी देणे निबंधकावर बंधनकारक असते.
* सदर निर्णयावर फेर अपील महानिबंधकाकडे करता येते.

लायसन्सची मुदत
एकदा लायसन्स जारी केल्यानंतर त्या त्या वर्षीच्या 31 जुलैपर्यंत ते चालू राहते. त्यानंतर सावकारास परत नूतनीकरण अर्ज दाखल करून लायसन्सचे नूतनीकरण दरवर्षी करून घेणे बंधनकारक असते.
सावकारी धंद्याची तपासणी
* संबंधित निबंघकास सावकारी धंद्याची तपासणी घेणे आवश्‍यक ठरते. तसेच लायसन्सच्या कालावधीसाठी आवश्‍यक तपासणी फी रु. 5000 अगोदर भरणे बंधनकारक असते.

सावकाराने जाच केल्यास नियमभंग केल्यास तक्रारीवरून लायसन्स रद्द करण्याची पद्धत :
* कायद्यातील कोणत्याही तरतुदींचे पालन न केल्यास व अटी व शर्तीचे पालन न केल्यास लायसन्सची मुदत चालू असताना कोणाही व्यक्तीस वा हितसंबंधीयास संबंधित लायसन्स रद्द करण्यासाठी महानिबंधकाकडे रु. 100 ची अनामत रक्कम जमा करून अर्ज दाखल करता येईल.
* महानिबंधक अर्जाचे प्रतिवृत्त मागवून योग्य त्या चौकशीचे आदेश देतील.
* केलेल्या अर्जाचे संबंधित पुरावे न आढळल्यास व अर्ज केवळ त्रास देण्याचे उद्देशाने केलेला आढळल्यास फेटाळण्यास प्राप्त राहील. अशा वेळी अर्जदाराची अनामत रक्कम जप्त होईल.
उत्तर लिहिले · 22/11/2016
कर्म · 48240
0
खाजगी सावकारी व्यवसायाचा परवाना मिळवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करणे आवश्यक आहे. त्या खालीलप्रमाणे:
  • अर्ज करणे: तुम्हाला तुमच्या क्षेत्रातील निबंधक कार्यालयात (Registrar Office) परवान्यासाठी अर्ज करावा लागेल.
  • आवश्यक कागदपत्रे: अर्जासोबत तुम्हाला काही कागदपत्रे सादर करावी लागतील, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्त्याचा पुरावा, आणि इतर आवश्यक कागदपत्रे.
  • खर्च: परवान्यासाठी लागणारा खर्च राज्य सरकारनुसार बदलतो. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी निबंधक कार्यालयातून नक्की माहिती घ्यावी.
  • नियमांचे पालन: सावकारी व्यवसाय काही विशिष्ट नियमांनुसार चालतो. त्यामुळे, परवाना मिळवण्यापूर्वी त्या नियमांची माहिती घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील निबंधक कार्यालयात संपर्क साधू शकता.

नोंद: खाजगी सावकारी परवान्याची प्रक्रिया किचकट असू शकते आणि नियम वेळोवेळी बदलू शकतात. त्यामुळे, नवीनतम माहितीसाठी शासकीय कार्यालयांशी संपर्क साधावा.

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5280

Related Questions

1850000.₹17,139 प्रति महिना हप्ता आहे. 25 वर्षांच्या नाहप्त्याच्या सहाव्या महिन्यानंतर ₹4 लाख भरले, तर माझी मुदत किती कमी होईल? साधारणपणे व्याजदर 10.25% आहे.
माझा मित्र माझ्याकडून पैसे घेत आहे मला कधी?
जर कर्ज थकित केले तर काय होते?
बँक ऑफ महाराष्ट्र सामान्य कर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात पाईपलाईन विहीर दुरुस्ती साठी?
सामान्य कर्जासाठी लागणारी कागदपत्रे कोणती?
मी एचडीएफसीचा कर्जदार होतो, शेतीवर कर्ज घेतले होते पण मी ते सेटलमेंट केले. तर मला दुसरी बँक कर्ज देत नाही, काही पर्याय?
मी एचडीएफसीचा कर्जदार होतो, पण मी ते सेटलमेंट केले. तर मला दुसरी बँक कर्ज देत नाही, काही पर्याय?