शिक्षण
शैक्षणिक समानता
महाराष्ट्राचा इतिहास
महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक अंतर कसे कमी करता येईल?
2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक अंतर कसे कमी करता येईल?
10
Answer link
महाराष्ट्र मध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक अंतर का वाढत आहे याची कारणमीमांसा करणे सर्वप्रथम गरजेचे आहे.

१. मार्गदर्शनाचा अभाव: ग्रामीण भागात शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी झालेल्या लोकांची कमतरता असते त्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळत नाही
२. नकारात्मक विचार: शिकून लई मोठा होणारे का रे का ?, आम्ही काय शाळा शिकलो नाही का ? हे असे सर्रास वापरले जाणारे विधान हेच सर्वात धोकादायक असतात.
३. गोष्टींची कमतरता: शैक्षणिक साहित्य , गरजेच्या गोष्टी लवकर वेळेवेवर न मिळणे.
४ अडाणी परिवार: जर घरचे लोक शिकलेले नसले तर शैक्षणीक गोष्टीकडे आपसूक दुर्लक्ष होते.
५ महागाई: ग्रामीण भागात मिळकत कमी असल्यामुळे शैक्षणिक गोष्टीना प्रथमता मिळत नाही.
६. न्यूनगंड: ग्रामीण भागाती विद्यार्थ्यांमध्ये हा जरा जास्त प्रमाणात आढळतो. आपल्याला इंग्लिश येत नाही मग आपण कमी हुशार. इंग्लिश बोलणारे मूल जास्त हुशार अशा विचारांमुळे विद्यार्थी मानाने खचतात आणि प्रयत्न काणे सोडून देतात.
७. माहितीचा अभाव: बर्याचश्या गोष्टी होतकरू विद्यार्थ्यांना माहित नसतात किंवा वेळेवर माहित होत नाही.

असेच बरेचशे कारण आपण सांगू शकतो जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मागे राहण्यास करणी भूत ठरतात आणि शैक्षणिक अंतर वाढवण्यास मदत करतात. तर हे अंतर कमी करण्यासाठी खालील उपाय करू शकतो.
१. तंत्रज्ञानचा उपयोग: आजकाल इंटरनेट, स्मार्ट फोन या द्वारे आपण माहितीची कमतरता दूर करू शकतो. इंटरनेट सारखा गुरु नाही !! सर्व माहिती क्षणात उपलब्ध होते. योग्य वापर होणे गरजेचं. आजकाल खेड्यापाड्यात हि सुविधा उपलब्ध आहे/ होत आहे.
२. योग्य व्यतींकडून वेळोवेळी सल्ला: खेड्यामधील विद्यार्धीना जरी घरचे शिकलेले नसले तरी योग्य सुशीक्षीत व्यतींकडून वेळोवेळी सल्ला घेणं त्यांच्याशी चर्चा कारण फायद्याचं ठरू शकत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता प्रयानांची पराकाष्टा करून,
वर नमूद केलेल्या अडचणींवर मात केल्याने हे शैक्षणिक अंतर नक्कीच कमी होऊ शकते.
0
Answer link
उत्तर:
ग्रामीण आणि शहरी भागातील शैक्षणिक अंतर कमी करण्यासाठी काही उपाय खालीलप्रमाणे आहेत:
शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे:
- शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
- अद्ययावत शिक्षण पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर करणे.
- प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे.
शैक्षणिक सुविधांमध्ये सुधारणा:
- ग्रामीण भागातील शाळांमध्ये चांगल्या इमारती, प्रयोगशाळा, ग्रंथालय आणि क्रीडांगणे उपलब्ध करणे.
- इंटरनेट आणि संगणक सुविधा उपलब्ध करणे.
- स्वच्छ पेयजल आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे.
आर्थिक सहाय्य:
- गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत देणे.
- शालेय गणवेश, पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य मोफत पुरवणे.
- शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देणे.
जागरूकता आणि समुपदेशन:
- शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती मोहीम चालवणे.
- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि करिअरच्या संधींविषयी मार्गदर्शन करणे.
- पालकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि मुलांना शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहित करणे.
तंत्रज्ञानाचा वापर:
- ऑनलाईन शिक्षण प्रणाली विकसित करणे.
- दूरदर्शन आणि रेडिओच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करणे.
- मोबाइल ॲप्सच्या माध्यमातून शिक्षण देणे.
स्थानिक भाषेचा वापर:
- प्राथमिक शिक्षण स्थानिक भाषेतून देणे.
- स्थानिक भाषेतील पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करणे.
समुदाय सहभाग:
- शाळा व्यवस्थापन समित्यांमध्ये स्थानिक लोकांचा सहभाग वाढवणे.
- गावातील लोकांना शाळेसाठी मदत करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
- शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना (NGO) प्रोत्साहन देणे.