स्टार्टअप्स
व्यवसाय
उद्योग
अन्न प्रक्रिया
काजू प्रोसेसिंग युनिट सुरु करायचे आहे....त्याबद्दल सविस्तर माहिती हवी आहे...?
2 उत्तरे
2
answers
काजू प्रोसेसिंग युनिट सुरु करायचे आहे....त्याबद्दल सविस्तर माहिती हवी आहे...?
3
Answer link
सध्याच्या स्पर्धेच्या युगात तरूणांनी केवळ नोकर्यांच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय सुरू करायला हवा. स्वत:चा व्यवसाय सुरू करणार्या तरूणांना राज्य आणि केंद्र शासनातर्ङ्गे मदत मिळू शकते. अशा व्यवसायाुंळे आणखी किमान आठ-दहाजणांना रोजगार उपलब्ध होऊन बेरोजगारीची समस्या कमी होण्यास हातभार लागू शकतो. अशा व्यवसायांसंदर्भात मार्गदर्शन करणार्या अनेक संस्था आहेत. व्यवसायाचे तंत्रशुद्ध शिक्षण, कच्च्या आणि पक्क्या मालाच्या उपलब्ध बाजारपेठा, कर्ज मिळवण्याचे मार्ग, शासकीय मदत अशी सर्व माहिती या संस्थांद्वारे मिळू शकते. असे असूनही बर्याच तरूणांपर्यंत ही माहिती पोहोचू शकत नाही. ‘पिकतं तिथं विकत नाही’ या उक्तीनुसार कच्चा माल उपलब्ध असूनही केवळ अज्ञान किंवा आळसामुळे त्यावर प्रक्रिया केली जात नाही. कोकणातील काजूच्या बाजारपेठेबाबत असेच म्हणता येईल. गोवा आणि कोकणात मुबलक प्रमाणात पिकणार्या काजूला सगळीकडे मोठी मागणी असूनही काजू प्रक्रिया उद्योगाकडे म्हणावे तेवढे लक्ष दिले जात नाही. काजू आणि काजूप्रक्रियेबद्दल माहिती असेल आणि अभियांत्रिकी शाखेची पार्श्वभूी असेल तर काजू प्रक्रियेचा व्यवसाय करणे सहजसोपे होते. त्यासाठी संशोधन करून यंत्रांची जमवाजमव करता येते. या यंत्रांच्या सहाय्याने काजूबियांपासून काजूगर वेगळे करण्याचे प्रयोग करता येतात. काजूची झाडे उष्णकटिबंधीय प्रदेशात समुद्रकिनारी चांगली रुजतात. काजूचे ङ्गळ हे बोंड आणि काजू बीपासून बनलेले असते. बोंडापासून सरबते, स्क्वॉश, जॅ, मद्य (ङ्गेणी) ही उत्पादने तयार केली जातात. काजू बीमध्ये काजूगर म्हणजेच आपण नेहमी पाहतो ते काजू असतात. काजूगरावर टरङ्गलाचे आवरण असते. या टरङ्गलात ‘कॅश्यूनट शेल लिक्वीड’ (सीएनएसएल) हे तेल असते. हे तेल ऑईलपेंट किंवा लाकडाच्या पॉलीशमध्ये वापरले जाते. टरङ्गल काढून काजू आपल्या हातात पडण्यासाठी त्यावर बरीच प्रक्रिया करावी लागते. झाडावरून काढलेले बी दमट असल्याने दुपारी बारा ते चार या कालावधीत तीन-चार दिवस कडक उन्हात वाळवले जाते. त्यानंतर ते २० मिनिटे वाङ्गवले जाते. या प्रक्रियेसाठी स्टीमर आणि व्हेसल ही उपकरणे लागतात. व्हेसलमध्ये बी टाकून स्टीमरमधून ठरावीक तापमानाची वाङ्ग ठरावीक दाबाने सोडून ते वाङ्गवले जाते. वाङ्गवल्यावर बी ड्रायरमध्ये आठ ते दहा तास वाळवले जाते. वाङ्गवून वाळवल्यावर बियांचे टरङ्गल सहजपणे निघून टरङ्गलातील तेल गराला लागण्याचे प्रमाण कमी होते. वाळवलेले बी कटरद्वारे ङ्गोडून गर वेगळा काढला जातो. या गरावर लालसर रंगाचा पापुद्रा असतो. हा पापुद्रा काढल्यावर पक्का माल अर्थात खाण्यायोग्य काजू हाती लागतो. चार किलो काजू बीपासून एक किलो काजू मिळतात. पापुद्य्राचा वापर कुक्कुट पालन केंद्रात कोंबड्यांच्या खाद्यामध्ये केला जातो. टरङ्गल भट्टीमध्ये इंधन म्हणून वापरता येते किंवा त्यापासून तेलही काढता येते. काजूपासून खारे, मसाला, लेन, संत्रा, मिरी, तिखट, चॉकलेट, स्ट्रॉबेरी अशा विविध स्वादांचे काजू तयार करता येतात. काजू बीयांवर इतर प्रक्रिया सुरू असताना ड्रायर वापरात नसतो. अशावेळी त्यात भाज्या, ङ्गळे, मोड आलेली कडधान्ये असे पदार्थ डिहायडे्रट करता (सुकवता) येतात. असे सुकवलेले पदार्थ बाजारात मिळणार्या ‘रेडी टू युज’ सुप्स, सरबते, मिल्कशेक्समध्ये वापरले जातात. हा एक चांगला जोडधंदा होऊ शकतो. काजूप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी जागेव्यतिरिक्त ५० ते ५५ हजारांची किमान गुंतवणूक करावी लागते. यात बॉयलर (स्टीमर आणि व्हेसल), ड्रायर आणि कटर या यंत्रांचा समावेश असतो. पाच ते सहा कामगारांना सोबत घेऊन दिवसाकाठी किमान ३० किलो काजूबियांवर प्रक्रिया करता येऊ शकते. सर्व खर्च वजा जाता एका किलोागे साधारणपणे २५ रूपयांचा नङ्गा मिळू शकतो. त्यानुसार महिन्याकाठी १८ ते २० हजार रूपये कमवणे सहज शक्य होते. कच्चा माल विकत घेऊन संबंधितांनाच पक्का माल पुरवायचा असल्याने मार्केटिंगची वेगळी डोकेदुखी सांभाळायची गरज उरत नाही. शिवाय कर्ज मिळवण्यासाठी लागणारा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी रोटेक्सतर्ङ्गे सर्व प्रकारची मदत पुरवली जाते. याशिवाय केंद्र आणि शासनाच्या विविध योजनांतर्ङ्गे या व्यवसायावर २५ टक्क्यांपर्यंत अनुदानही दिले जाते. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी रोटेक्सतर्ङ्गे त्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मोङ्गत देण्यात येते. या सर्व बाबींमुळे हा व्यवसाय बराच निर्धोक बनतो. त्यामुळेच तरूण या व्यवसायात उतरण्याचा विचार करू शकतात.
सौजन्य:
0
Answer link
काजू प्रक्रिया युनिट सुरू करण्यासाठी सविस्तर माहिती:
1. व्यवसायाची योजना (Business Plan):
- व्यवसायाची उद्दिष्ट्ये निश्चित करा.
- बाजाराचा अभ्यास करा.
- उत्पादन क्षमता आणि अंदाजित खर्च निश्चित करा.
- आर्थिक नियोजन करा.
2. आवश्यक परवानग्या आणि नोंदणी (Permissions and Registration):
- कंपनी नोंदणी (Company Registration).
- उद्योग आधार (Udyog Aadhaar) नोंदणी.
- FSSAI परवाना (FSSAI License). FSSAI
- GST नोंदणी (GST Registration).
- प्रदूषण नियंत्रण मंडळाची (Pollution Control Board) परवानगी.
3. जागेची निवड (Location):
- प्रक्रिया युनिटसाठी योग्य जागा निवडा.
- जागा औद्योगिक क्षेत्रात (Industrial area) असल्यास उत्तम.
- पाणी आणि वीजपुरवठा योग्य असावा.
4. मशिनरी आणि उपकरणे (Machinery and Equipment):
- काजू प्रक्रिया मशिनरी खरेदी करा.
- भट्टी (Roasting), शेलिंग (Shelling), ग्रेडिंग (Grading) आणि पॅकिंग (Packing) मशीनची आवश्यकता असते.
- चांगल्या दर्जाची मशिनरी खरेदी करा.
5. कच्चा माल (Raw Material):
- काजूची नियमित उपलब्धता सुनिश्चित करा.
- विश्वसनीय पुरवठादारांशी संपर्क साधा.
- गुणवत्तापूर्ण काजू खरेदी करा.
6. मनुष्यबळ (Manpower):
- कुशल आणि अनुभवी कामगरांची नेमणूक करा.
- प्रशिक्षित कामगारांची आवश्यकता असते.
- व्यवस्थापक, पर्यवेक्षक आणि कामगार यांची नेमणूक करा.
7. प्रक्रिया (Process):
- काजूची प्रतवारी (Grading) करा.
- काजू भाजणे (Roasting).
- शेलिंग (Shelling) करूनassessment करणे.
- काजूkernel काढणे.
- ग्रेडिंग आणि पॅकिंग करणे.
8. पॅकेजिंग (Packaging):
- आकर्षक आणि टिकाऊ पॅकेजिंगMaterial वापरा.
- पॅकेजिंगवर उत्पादनाची माहिती स्पष्टपणे नमूद करा.
- FSSAI च्या नियमांनुसार पॅकेजिंग करा.
9. विपणन (Marketing):
- उत्पादनाचे योग्य विपणन करा.
- विविध माध्यमांद्वारे जाहिरात करा.
- ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा (Online platform) वापर करा.
- वितरकांशी (Distributors) संपर्क साधा.
10. गुणवत्ता नियंत्रण (Quality Control):
- उत्पादनाची गुणवत्ता नेहमीMaintain करा.
- नियमित तपासणी करा.
- गुणवत्ता मानकांचे पालन करा.
11. आर्थिक नियोजन (Financial Planning):
- कर्ज आणि अनुदान योजनांची माहिती घ्या.
- मुद्रा योजना (Mudra Yojana) आणि इतर सरकारी योजनांचा लाभ घ्या. Mudra Yojana
- खर्चाचे योग्य नियोजन करा.
हे सर्व मुद्दे विचारात घेऊन तुम्ही तुमचा काजू प्रक्रिया उद्योग सुरू करू शकता.