श्रीकृष्ण धर्म

श्री कृष्णा बद्दल माहिती लिहा?

3 उत्तरे
3 answers

श्री कृष्णा बद्दल माहिती लिहा?

1

कृष्ण हा पारंपरिक हिंदू धर्मकल्पनांनुसार विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवर्णाचा" आणि "सर्वाना आकर्षित करणारा" असा होतो.

Sri Mariamman Temple Singapore 2 amk.jpg

श्रीकृष्ण जन्म

कृष्णाचा जन्म गोकुळ अष्टमीच्या आधल्या दिवशी मध्यरात्रीला झाला. त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो.

इतिहास

कृष्णाचा "देवकीपुत्र कृष्ण' असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात (३.७.६) आला आहे. कृष्ण हे नाव "विष्णू सहस्रनामात" ५७वे येते, तर तेथे विष्णूचे नाव ५५०व्या क्रमांकावर आहे. कृष्ण हे नाव "केशवनामात" २४वे आहे. पूजेच्या वेळीस या नामावलीचे पठण केले जाते. कृष्ण हा द्वापारयुगाच्या अखेरीस म्हणजे द्वापारयुग आणि कलियुग यांच्या संधिकालात इ.स.पू. तीन हजार वर्षांच्या आसपास झाला असावा.

शिक्षण

श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.

कार्य

कालिया नागाला त्याने धडा शिकवला. भारतीय युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढला. महाभारतात म्हटले आहे की कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. ( म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्र हे एकूण एकशेआठ वर्षांचे असल्याचे सांगितले आहे. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली.

गीता

महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्‍न, कष्ट, काम म्हणजेच कर्म केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी कर्म केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतेचा अभ्यास करून, गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

गीतेवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आणि प्रत्येक लेखकाने गीतेवर वेगवेगळ्या अंगांनी भाष्ये लिहिली आहेत. टिळकांनी गीतेचा कर्मयोग असा अर्थ लावला आहे.

श्री कृष्णा बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.



उत्तर लिहिले · 27/10/2016
कर्म · 15105
0
श्रीकृष्ण हा पूर्ण जगाचा गुरु आहे. आज श्रीकृष्णाच्या कथाच लोकांना माहिती आहेत, परंतु त्याच तत्वज्ञान कोणाला माहित नाही. तेच तत्त्वज्ञान श्रेष्ठ आहे म्हणून "कृष्णम वंदे जगद्गुरुं". अधिक माहिती हवी असेल तर 'श्रीकृष्ण जीवन दर्शन ' पांडुरंग शास्त्री आठवले यांचं पुस्तक नक्कीच वाचा, खूप छान आहे.
उत्तर लिहिले · 28/10/2016
कर्म · 10
0

श्री कृष्ण हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे दैवत आहेत. त्यांना विष्णूंचा आठवा अवतार मानले जाते.

जन्म:

  • श्रीकृष्णांचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मथुरेत झाला.

कुटुंब:

  • पिता: वासुदेव
  • माता: देवकी
  • पत्नी: रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नाग्नजिती, भद्रा, लक्ष्मणा (आठ पट्टराण्या)
  • पुत्र: प्रद्युम्न

जीवन:

  • कृष्णाने आपले बालपण गोकुळात नंद आणि यशोदा यांच्यासोबत घालवले.
  • त्याने कंसाचा वध केला आणि मथुरेला त्याच्या जाचातून मुक्त केले.
  • महाभारताच्या युद्धात अर्जुनाला भगवतगीतेचा उपदेश केला, जो आजही लोकांना मार्गदर्शन करतो.
  • द्वारका नगरीची स्थापना केली आणि तेथे राज्य केले.

महत्व:

  • श्रीकृष्ण हे प्रेम, भक्ती आणि ज्ञानाचे प्रतीक आहेत.
  • भगवतगीतेतील त्यांचे उपदेश जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देतात.
  • ते कला आणि संगीताचे भोक्ते होते.

मंदिरे:

  • भारतात कृष्णाची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत, जसे की द्वारकाधीश मंदिर, बांके बिहारी मंदिर, आणि जगन्नाथ मंदिर.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता:

उत्तर लिहिले · 14/3/2025
कर्म · 5240

Related Questions

भगवान श्रीकृष्णाने आपली बासरी का तोडली?
श्री कृष्णाबद्दल माहिती द्या?
आज श्री कृष्णाचा जन्मदिवस (गोकुळ अष्टमी) तर श्री कृष्ण किती वर्षांचा झाला असेल?
श्री कृष्णाच्या मुलाचे नाव काय?
श्री कृष्णाचे पूर्ण नाव काय?