Topic icon

श्रीकृष्ण

1




 भगवान श्रीकृष्णाने आपली बासरी का तोडली 

: भगवान श्रीकृष्णाला त्यांची बासरी खूप आवडते. तो नेहमी बासरी सोबत ठेवतो. त्यांच्या बासरीचे सूर ऐकून सारे जग भक्तिमय व्हायचे. मात्र, त्यानंतर भगवान श्रीकृष्णाने त्यांची बासरी तोडली. या मागचे कारण समजून घेऊया.

 
भगवान श्रीकृष्णाची बासरी हे प्रेम, आनंद आणि आकर्षणाचे प्रतीक मानले जाते. त्यांच्या बासरीचे नाव महानंदा किंवा संमोहिनी असे होते.
 
धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिवाने महर्षी दधीची यांच्या अस्थींपासून श्रीकृष्णाची बासरी निर्माण केली. जेव्हा भगवान शिव बाल कृष्णाला भेटायला आले तेव्हा ही बासरी त्यांना भेट म्हणून देण्यात आली.

 
कंसाचा वध केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण रुक्मणीशी विवाह करून द्वारकेला स्थायिक झाले. मात्र, रुक्मणीने पत्नीचा धर्म पाळला आणि सदैव भगवंताच्या सेवेत मग्न असे. पण, श्रीकृष्ण राधाला मनातून कधीच काढू शकले नाहीत.
 
असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाने आयुष्यभर आपल्या सर्व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणी त्यांचा राधाशी पुन्हा संगम झाला.
 
यादरम्यान श्रीकृष्णाने राधाला काही मागायला सांगितले तेव्हा राधाने बासरी ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. बासरीचे सूर ऐकून राधाने आपला देह सोडल्याचे सांगितले जाते. भगवान कृष्णाला राधाचा वियोग सहन झाला नाही आणि त्यांनी आपली बासरी तोडून फेकून दिली.

उत्तर लिहिले · 19/8/2023
कर्म · 53750
5
श्री कृष्णा भगवान श्री विष्णूचे अवतार मानले जातात. ते सर्वशक्तिमान परमेश्वर आहेत, हे जगाला आणि समाजाला दाखवण्यासाठी आणि जर कोणाला आपणच सर्वशक्तिमान आहोत असा गर्व झाला तर तो तोडण्यासाठी ते अवतार घेतात. श्रीकृष्णचा काळ फार काही लांबचा नाही. सिंधू संस्कृतीच्या अस्तानंतर श्रीकृष्णाचा काळ होता असे पुरावे आहेत. संशोधन करताना सर्वात जास्त पुरावे किंवा संकल्पना सापडतात त्या कृष्णाच्या आहेत.
श्रीविष्णू अजूनही अवतार घेऊ शकतात, जर अजून कोणी असा व्यक्ती आला ज्याला कोणीही थांबवू शकत नाही असा अधर्मी जर आला किंवा संपूर्ण मानवता नष्ट होण्याच्या मार्गावर आली तर ते परत अवतार घेतील.
उत्तर लिहिले · 11/8/2020
कर्म · 15400
1
भगवान श्रीकृष्ण यावर्षी 5242 वर्षाचे होतील आणि 5243  वें वर्षा मधी प्रवेश करेल,

ज्योतिष गणित के मुताबिक भगवान कृष्ण द्वापर के अंत में धरती पर 125 वर्ष तक रहे कलियुग की आयु 5117 वर्ष बताई गई है अगर इन दोनों को जोड़ लिया जाए तो कन्हैया जी की सही उम्र निकल आती है। 
शास्त्रों में उल्लेखित है कि भगवान श्रीकृष्ण द्वापर के अंत में धरती पर 125 वर्ष तक रहे उनकी इस आयु 5117 वर्ष को जोड़ दिया जाए तो भगवान श्रीकृष्ण इस साल धरती पर अपने जीवन काल का 5242 वां वर्ष पूर्ण कर लेंगे। 25 अगस्त को ब्रज में मनाई जाने वाली श्रीकृष्ण जन्माष्टमी पर वे 5243 वें वर्ष मे प्रवेश करेंगे, ज्योतिष गणित से इस बात की पुष्टि होती है।
उत्तर लिहिले · 12/8/2020
कर्म · 14865
7


भगवान श्रीकृष्णाचा वंश

भारतीय पुराणेतिहासात तसेच आधुनिक इतिहासात महत्त्व असलेले प्रमुख दोन क्षत्रिय वंश आहेत. 


१. सूर्यवंश
२. चंद्रवंश.


सूर्यवंशात प्रभू रामाचा तर चंद्रवंशात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णाला यादव, माधव, वाष्र्णेय अशी नावे आहेत. ही सर्व नावे वंशनिदर्शक आहेत. याचे विश्लेषण आपण लेखात पुढे पाहणारच आहोत. 


चंद्रवंश हा भारतातील सर्वांत मोठा राजवंश आहे. सर्वांत यशस्वी राजवंश म्हणूनही याच्याकडेच अंगुलीनिर्देश करावा लागतो. ज्याच्या नावावरून या देशाला भारत हे नाव पडले तो राजा भरत याच वंशातील आहे. महाभारतातील युद्धाला कारणीभूत असलेले कौरव-पांडव याच राजवंशातील आहेत. इतकेच नव्हे, तर भारती युद्धात सहभागी झालेले बहुतांश राजेही याच वंशातील आहेत. ययाति-देवयानी, दुष्यंत-शकुंतला, पुरूरवा-उर्वशी अशा महानायक-नायिकांच्या जोड्या या चंद्रवंशाने भारताला दिल्या. कंस, जरासंध, दुर्योधन, शिशूपाल ही मोठी खलनायक मंडळीही याच वंशाने दिली. परशुरामाशी वैर घेणारे हैहय कुळातील राजे हे चंद्रवंशीच आहेत. नहुष हा चंद्रवंशातील पहिला ऐहिक पुरूष म्हणायला हवा. इंद्राची पत्नी शचि हिची इच्छा धरल्यामुळे नहुषाच्या नशिबी बदनामी आली. तथापि, तो अत्यंत पराक्रमी होता. त्याला ६ मुले होती. राजा ययाति हा त्याचा क्रमांक दोनचा मुलगा. वि. स. खांडेकरांनी आपल्या "ययाति" या कादंबरीत याचेच चरित्र वर्णिले आहे. 

उत्तर लिहिले · 6/2/2018
कर्म · 11275
4
माझ्या माहितीप्रमाणे कृष्णाचे पूर्ण नाव कृष्ण वासुदेव यादव असे आहे. तरी दुसऱ्यांकडून खात्री करून घ्या.
उत्तर लिहिले · 12/9/2017
कर्म · 125
1

कृष्ण हा पारंपरिक हिंदू धर्मकल्पनांनुसार विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे. कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवर्णाचा" आणि "सर्वाना आकर्षित करणारा" असा होतो.

Sri Mariamman Temple Singapore 2 amk.jpg

श्रीकृष्ण जन्म

कृष्णाचा जन्म गोकुळ अष्टमीच्या आधल्या दिवशी मध्यरात्रीला झाला. त्यामुळे त्या अष्टमीला हा जन्मदिवस उत्साहाने साजरा होतो. महाराष्ट्रात त्या दिवशी श्रावण वद्य अष्टमी असते, उत्तरेकडे तो दिवस भाद्रपद वद्य अष्टमीचा असतो.

इतिहास

कृष्णाचा "देवकीपुत्र कृष्ण' असा उल्लेख छांदोग्य उपनिषदात (३.७.६) आला आहे. कृष्ण हे नाव "विष्णू सहस्रनामात" ५७वे येते, तर तेथे विष्णूचे नाव ५५०व्या क्रमांकावर आहे. कृष्ण हे नाव "केशवनामात" २४वे आहे. पूजेच्या वेळीस या नामावलीचे पठण केले जाते. कृष्ण हा द्वापारयुगाच्या अखेरीस म्हणजे द्वापारयुग आणि कलियुग यांच्या संधिकालात इ.स.पू. तीन हजार वर्षांच्या आसपास झाला असावा.

शिक्षण

श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते.

कार्य

कालिया नागाला त्याने धडा शिकवला. भारतीय युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढला. महाभारतात म्हटले आहे की कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा क्षत्रिय नाही. ( म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्र हे एकूण एकशेआठ वर्षांचे असल्याचे सांगितले आहे. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली.

गीता

महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी (मोक्षदा एकादशी) हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्‍न, कष्ट, काम म्हणजेच कर्म केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी कर्म केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे. लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना गीतेचा अभ्यास करून, गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.

गीतेवर अनेक ग्रंथ लिहिले गेले आणि प्रत्येक लेखकाने गीतेवर वेगवेगळ्या अंगांनी भाष्ये लिहिली आहेत. टिळकांनी गीतेचा कर्मयोग असा अर्थ लावला आहे.

श्री कृष्णा बद्दल अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.



उत्तर लिहिले · 27/10/2016
कर्म · 15105