3 उत्तरे
3 answers

मेल कसा करावा?

3
  • प्रथम ज्या साईटवर (Site) आपण आपला ई-मेल आयडी (E-mail ID) तयार केला आहे ती साईट ओपन (Site Open) करावी.
  • त्यानंतर समोर आलेल्या विंडो (Window) मध्ये युजर नेम (User name) च्या पुढे आपला ई-मेल आयडी (E-mail ID) टाईप करावा.
  • तसेच त्याखाली पासवर्ड (Password) पुढे आपल्या आयडी (ID) चा पासवर्ड (Password) टाईप करावा आणि साईन इन (Sing in) या पर्यायावर क्लिक करावे.
  • आपल्यापुढे इनबॉक्स (Inbox) मध्ये आलेले ई-मेल (E-mail) (संदेश) दिसतात.
  • त्यापैकी जो संदेश वाचायचा / पाहायचा आहे त्यावर क्लिक करावे.तो संदेश आपल्या समोर डिस्प्ले होईल.  
  • ई-मेल (E-mail) कसा पाठवावा ?

    • आपल्याला आलेल्या ई-मेल (E-mail) ह्या इनबॉक्स (Inbox) मध्ये असतात.
    • ई-मेल (E-mail) पाठविण्यासाठी ई-मेल (Inbox) च्या बाजूला असलेल्या कम्पोज मेल (Compose mail) ह्या पर्यायावर क्लिक करावे. 
    • समोर आलेल्या बॉक्समध्ये टू (To) च्या पुढे ज्या व्यक्तीला मेल (mail) करायचा आहे त्याचा आयडी (ID) टाईप करा.
    • एकापेक्षा अधिक व्यक्तींना ई-मेल (E-mail) पाठवायचा असल्यास, स्वल्पविराम देउन त्यांचे आयडी (ID) टाईप करावे.
    • सीसी (CC) याचा अर्थ कार्बन कॉपी (Carbon Copy). यात आपण जितक्या व्यक्तींना मेल (Mail) पाठवला त्या सर्व व्यक्तींना जेव्हा ई-मेल (E-mail) मिळेल तेव्हा इतर कोणा कोणाला तो मेल पाठवला आहे, त्याची लिस्ट (List) दिसेल.
    • बीसीसी (BCC) म्हणजे ब्लाईड कार्बन कॉपी (Blind Carbon Copy).
    • ह्या ऑप्शन (Option) मध्येही एकापेक्षा जास्त व्यक्तींना वर सांगितल्याप्रमाणे मेल (mail) आपण पाठवू शकतो.
    • परंतु त्या व्यक्तींना, इतर कोणाकोणाला मेल (mail) पाठवला आहे, त्याची लिस्ट (List) किंवा माहिती दिसत नाही.फक्त मेल (mail) पाठवणाऱ्याचे नाव कळते. सब्जेक्ट (Subject) या पर्यायामध्ये मेल (mail) कशासंबंधी आहे तो विषय थोडक्यात लिहावा.
    • आपल्याला जी माहिती पाठवायची आहे ती सर्व माहिती मोठ्या टेक्स्ट बॉक्स (Text box) मध्ये लिहावी.
    • आपण टाईप केलेल्या माहितीमध्ये स्पेलिंग मिस्टेक (Spelling mistakes) असतील तर चेक स्पेलिंग (Check Spelling) ह्या बटणाच्या साहाय्याने त्या दूर करू शकतो.
    • जर आपल्याला मेल (Mail) सोबत एखादी अटचमेंट  (Attachment) द्यायची असेल (एखादी दुसरी फाईल (File) जोडायची असेल) तर अटच अ फाईल (attach a file) वर क्लिक करावे व हवी असलेली फाईल (File) घ्यावी.
    • त्यानंतर सेंड (Send) बटणावर क्लिक करावे.मेल सेंड (Mail send)  झाल्यानंतर युवर मसेज सक्से सक्सेसस्फुल्ली सेंड (Your massage successfully send) हा मसेज (massage) दिसेल.
    उत्तर लिहिले · 27/10/2016
    कर्म · 15105
    0
    अगदी सोपे आहे....
    मेल पाठवायला सर्वात महत्वाची असते समोरच्या व्यक्तीची इ-मेल आयडी (E-mail ID)  उदाहरणार्थ:  amol123@gmail.com
    आणि त्यासाठी आपले स्वतःचे अकाउंट असणे आवश्यक आहे.
    उत्तर लिहिले · 28/10/2016
    कर्म · 95
    0

    मेल (Email) कसा करायचा यासाठी खालील सोप्या स्टेप्स:

    1. ईमेल सेवा (Email Service) निवडा:

    प्रथम Gmail, Yahoo Mail, Outlook किंवा इतर कोणतीही ईमेल सेवा निवडा.

    2. अकाउंट तयार करा:

    तुमच्या निवडलेल्या ईमेल सेवेवर अकाउंट तयार करा. त्यासाठी आवश्यक माहिती (नाव, जन्मतारीख, इत्यादी) भरा आणि एक युजरनेम (Username) आणि पासवर्ड (Password) तयार करा.

    3. लॉग इन करा:

    तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करा.

    4. 'Compose' वर क्लिक करा:

    लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 'Compose' (नवीन मेल तयार करा) नावाचे बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.

    5. प्राप्तकर्त्याचा ईमेल पत्ता (Recipient's Email Address) टाका:

    'To' (Recipient) फील्डमध्ये ज्या व्यक्तीला मेल पाठवायचा आहे त्याचा ईमेल पत्ता टाका.

    6. विषय (Subject) लिहा:

    मेल कशाबद्दल आहे ते 'Subject' फील्डमध्ये थोडक्यात लिहा.

    7. मेल लिहा:

    मुख्य टेक्स्ट बॉक्समध्ये तुमचा संदेश (message) लिहा.

    8. अटॅचमेंट (Attachments) जोडा (आवश्यक असल्यास):

    जर तुम्हाला फाईल्स (files) पाठवायच्या असतील, तर अटॅचमेंट (attachment) आयकॉनवर क्लिक करून फाईल्स सिलेक्ट (select) करा.

    9. मेल पाठवा:

    सर्व माहिती भरल्यानंतर 'Send' (पाठवा) बटणावर क्लिक करा.

    टीप:

    • Cc (carbon copy) मध्ये तुम्ही ज्या व्यक्तींना मेलची कॉपी पाठवू इच्छिता त्यांचे ईमेल पत्ते टाका.
    • Bcc (blind carbon copy) मध्ये तुम्ही ज्या व्यक्तींना मेलची कॉपी पाठवू इच्छिता त्यांचे ईमेल पत्ते टाका, पण ते इतरांना दिसणार नाहीत.
    उत्तर लिहिले · 14/3/2025
    कर्म · 5220

    Related Questions

    आपण पाठवलेला ईमेल समोरील व्यक्तीने वाचला आहे हे कसे कळेल?
    कृषी विभागाचा ईमेल ॲड्रेस काय आहे?
    मला मेल ड्राफ्ट शिकायचं आहे, तरी कोणती सोपी युक्ती सांगा?
    माझे विसरलेले ई मेल आयडी कसे शोधायचे?
    एखाद्या व्यक्तीला आपण मराठी भाषेत ईमेल पाठवू शकतो का?
    आधी असलेला ईमेल कॅन्सल कसा करावा व त्या जागी नवीन ईमेल कसा टाकावा?
    ईमेल ॲड्रेस कसा बनवावा?