
वृक्षशास्त्र
0
Answer link
चिंचेच्या उपयोग/वापर, वैशिष्ट्ये
खाद्य पदार्थात सांबार, रसम, चटणी आणि विविध प्रकारची आमटी बनवताना चिंचेचा कोळ वापरला जातो. झाडाची कोवळी पाने व पाकळ्या खातात. त्याची चव आंबट तुरट अशी असते. चिंचेची पाने भाजीसाठी वापरली जातात. उद्योगात चिंच बियांचे चूर्ण वापरले जाते. चिंचेच्या बिया वाळवल्या जातात. त्यानंतर गिरणीमध्ये दळून त्याचे चूर्ण बनविले जाते. वस्त्रउद्योगामध्ये याला खूप मागणी असते. चिंचेच्या झाडाला पाणी कमी लागते व झाड मोठे असल्याने जनावरांना सावली होते.
लागवड
चिंच हे फळझाड अनेक प्रकारच्या जमिनीत तसेच विविध पाऊस मानाच्या प्रदेशात चांगले वाढते. चिंचेच्या फळाच्या गरातील रंगावरून चिंचेचे पिवळी चिंच आणि लाल चिंच असे दोन प्रकार पडतात. चिंचेच्या झाडांच्या बियांपासून 9चिंचोक्यांपासून) चिंचेचे रॊप बनते. बियांपासून रोपे तयार करून व शिवाय कलमे तयार करून रोप तयार केले जाते.. इतर फळझाडांचा चिंचेच्या बागेत आंतरपिके म्हणून वापर करता येतो. चिंचेच्या २० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली सुमारे ५०० किलो चिंच मिळते. चिंच रोपांची अथवा कलमांची लागवड करण्यासाठी १ बाय १ बाय १ मीटर आकाराचे खड्डे खणून भरतात. तळाशी १०-१५ सेंटीमीटर उंचीपर्यंत पालापाचोळा टाकतात. नंतर खड्डे चांगले कुजलेले शेणखत आणि माती यांच्या मिश्रणाने भरतात. मातीत १०० ग्रॅंम बी.एच.सी. (१०टक्के) फॉलीडॉल पावडर मिसळतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात चिंचेचे एक रोप लावतात आणि लगेच पाणी द्देतात..
0
Answer link
झाड तोडण्यापूर्वी काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे. बोरीचे झाड अडचण करत असेल, तरी ते तोडण्याऐवजी काही पर्याय वापरून बघावेत.
झाड तोडण्यापूर्वी विचार करण्याची कारणे:
- झाड पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
- झाडामुळे प्रदूषण कमी होते.
- झाडामुळे जमिनीची धूप थांबते.
- झाड पक्ष्यांसाठी आणि इतर प्राण्यांसाठी आश्रयस्थान असते.
झाड तोडण्याऐवजी खालील पर्याय वापरून बघा:
- झाडाच्या फांद्या छाटून टाका.
- झाडाला दुसरीकडे लावा.
- झाडाभोवती कुंपण घाला.
जर झाड तोडणे आवश्यकच असेल, तर स्थानिक प्राधिकरणाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी मिळवण्यासाठी अर्ज करावा लागतो आणि काही शुल्क भरावे लागते.
झाड तोडताना घ्यावयाची काळजी:
- सुरक्षिततेची काळजी घ्या.
- झाड तोडताना आसपास कोणी नाही याची खात्री करा.
- झाड तोडल्यानंतर त्याचे अवशेष व्यवस्थितsite काढा.
4
Answer link
चंदनाच्या गाभा हा चंदनाच्या झाडाच्या खोडांच्या मध्यभागी असतो हा गाभा जाड मुळापासून ते जमिनीपासून 2 अडीच फूट वर असतो
जर तुम्ही हे खोड तोडले तर लाल चॉकलेटी रंगाचा गाभा दिसेल
जर तुम्ही हे खोड तोडले तर लाल चॉकलेटी रंगाचा गाभा दिसेल