Topic icon

वैज्ञानिक दृष्टिकोन

0
विज्ञानाच्या अभ्यासावर आणि उपयोजनावर आधारित दृष्टीकोन म्हणजे विज्ञानवाद. याची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत: * **अनुभवजन्य पुरावा:** विज्ञानवाद हा अनुभवजन्य पुराव्यावर आधारित आहे. याचा अर्थ असा की वैज्ञानिक निष्कर्ष प्रयोग, निरीक्षण आणि डेटा विश्लेषण यांसारख्या अनुभवजन्य पद्धतींद्वारे समर्थित असले पाहिजेत. * **वस्तुनिष्ठता:** विज्ञानवाद वस्तुनिष्ठतेवर जोर देतो. वैज्ञानिकांनी त्यांचे वैयक्तिक bias किंवा पूर्वग्रह त्यांच्या संशोधनात हस्तक्षेप करू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. * **तार्किक विचार:** विज्ञानवाद तार्किक विचारांवर अवलंबून असतो. वैज्ञानिक निष्कर्ष वैध युक्तिवादांवर आधारित असले पाहिजेत. * **शंकावाद:** विज्ञानवाद शंकावादाला प्रोत्साहन देतो. वैज्ञानिकांनी त्यांच्या स्वतःच्या आणि इतरांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले पाहिजेत. * **पुनरावृत्ती:** वैज्ञानिक निष्कर्ष पुनरावृत्ती करण्यायोग्य असले पाहिजेत. याचा अर्थ असा की इतर वैज्ञानिक समान परिस्थितीत समान परिणाम प्राप्त करण्यास सक्षम असावेत. * **सार्वत्रिक:** विज्ञानवाद हा सार्वत्रिक आहे. वैज्ञानिक निष्कर्ष जगातील कोठेही लागू असले पाहिजेत. * **प्रगतीशील:** विज्ञानवाद हा प्रगतीशील आहे. नवीन ज्ञान उपलब्ध होत असताना वैज्ञानिक निष्कर्ष बदलू शकतात. विज्ञानवाद हा जगाला समजून घेण्यासाठी एक शक्तिशाली दृष्टीकोन आहे. हे आपल्याला नैसर्गिक जगाबद्दल अधिक जाणून घेण्यास आणि समस्या सोडविण्यास मदत करते. तथापि, विज्ञानवादाच्या काही मर्यादा आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, विज्ञानवाद नैतिक किंवा आध्यात्मिक प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही.
उत्तर लिहिले · 18/1/2022
कर्म · 0
20
*_❓वैज्ञानिकांना विचारलेले काही रंजक प्रश्न व त्याची त्यांनी दिलेली उत्तरे_*

________________________
*_🌎पृथ्वी अचानक स्वत:भोवती फिरायची थांबली तर काय होईल?_*
उत्तर : येत्या लाखो वर्षांपर्यंत तरी हे अशक्यच आहे तरीही असे झालेच तर पृथ्वीवरील सर्वच वस्तु प्रकाशाच्या वेगाने अंतराळात फेकल्या जातील, मातीचा एक कणसुद्धा पृथ्वीवर उरणार नाही,संपुर्ण पृथ्वी ओसाड पडेल,झाडेच काय गवताचेसुद्धा नामो-
निशान नसेल.

*_🎇अंतराळात बंदुकीतुन गोळी चालवली तर काय होईल?_*
उत्तर : पृथ्वीवर गोळी चालवली की आपल्या हाताला किंचीत झटका बसतो परंतु अंतराळात गोळी चालवल्या बरोबर तुम्ही तब्बल पन्नास फुट मागे जाल.आणि सुटलेली गोळी वेग न बदलता कुठेही थांबणार नाही.गोळी तेव्हाच थांबेल जेव्हा तिच्या मार्गात एखादा ग्रह किंवा कृष्णविवर येईल, तरीही ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती कमी असल्यास ती गोळी त्या ग्रहाभोवती प्रदक्षिणा करेल.

*_👃अंतराळात कसा वास येतो ?_*
उत्तर : अंतराळात वातावरण नसल्याने व vaccum असल्याने तेथे वास येत नाही परंतु अंतराळवीर जेव्हा spacewalk करुन यानात परतले तेव्हा त्यांना तसाच गंध आला जो welding करताना किंवा धातु द्रव अवस्थेत असताना येतो त्यांच्या मते हा गंध अंतराळात असलेल्या ions च्या टक्कर मुळे उत्पन्न होतो

*_👩‍🚀spacesuit न वापरता अंतराळात गेल्यास काय होईल ?_*
उत्तर : spacesuit हा अंतराळातील तापमान, अतिनील किरणे, कमी दाब यांच्यापासुन बचाव करतो, spacesuit न वापरता अंतराळात गेल्यास आॅक्सिजन च्या कमतरते मुळे तुम्ही फक्त १५ सेकंदपर्यंत जिवंत राहु शकता, त्यानंतर तुमच्या जीभ व डोळ्यांच्या ओलाव्याचे बाष्पिभवन होईल, रक्त गोठुन मृत्यु होईल.

*_🌎पृथ्वी दुप्पट मोठी असती तर?_*
उत्तर : पृथ्वी दुप्पट मोठी असती तर गुरूत्वाकर्षण शक्ती सुद्धा दुप्पट असती, एवढ्या प्रचंड गुरूत्वाकर्षण शक्तीमुळे मानवाला उभे राहणेसुद्धा कठीण झाले असते, परिणामी मानवाची उंची सरासरी १ ते २ फुट राहिली असती.

*_☀पृथ्वी प्रकाशाच्या वेगाने सुर्या भोवती फिरु लागली तर ?_*
उत्तर : पृथ्वी प्रकाशाच्या वेगाने सुर्याभोवती फिरु लागली तर त्याच वेगाने ती सुर्यापासुन दुर जाईल, परिणामी केवळ १ सेकंदात पृथ्वी बेचिराख होईल.

*_🌎पृथ्वी उलट दिशेने फिरु लागली तर?_*
उत्तर : दिवस ८ मिनीटांनी कमी
होईल.
उत्तर लिहिले · 3/9/2018
कर्म · 569225
15
वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीला/घटनेला किंवा समजेला त्या मागे असलेला विज्ञानाचा आधार, व सिद्धांताच्या दृष्टीतून बघणे.

लिंबू मिरची टांगली जाते, नजर वैगरे हा झाला समज. व लिंबू मधील सायट्रिक ऍसिड व मिरची लिंबू यांचं सुती दोऱ्यातून होणारा रस प्रवाह व हवेत होणार मिश्रण, हवा प्रसन्न व कीटकांना दूर ठेवण्याचा उपाय हा झाला ते टांगण्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन.

प्रत्येक गोष्ट, जी घडते त्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन हा असतोच, जर अशी एखादी गोष्ट असेल ज्या मागे विज्ञानाच्या आधार नसेल, तरी त्या मागे आधार असतो, फक्त तो आपल्याला माहीत नसतो.
उत्तर लिहिले · 22/1/2018
कर्म · 85195