Topic icon

विद्राव्यता

1
पाण्यामध्ये गूळ विरघळण्याचा पाणी गोड का होतो
गुळाचे गोड स्वरूप त्यातील सुक्रोज एकाग्रतेमुळे आहे. त्यामुळे पाण्यात मिसळल्यावर पाण्याची चव गोड होते.
पाण्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेटचे स्फटिक टाकल्यावर ते पाण्यात विरघळतात त्यामुळे पाण्याला रंग येतो.  पाण्यामध्ये गुळ टाकून चमच्याने ते पाणी ढवळले तर पाणी गोड का लागते? पाण्यामध्ये गुळ टाकून चमच्याने ते पाणी ढवल्यास गुळ त्या पाण्यामध्ये विरघळतो आणि पाणी गोड लागते.
गुळामध्ये बऱ्याच प्रमाणात साखर (सुक्रोज) असते. कधीकधी तिचे प्रमाण शेकडा ९० पेक्षा अधिक असते. त्याशिवाय थोड्या प्रमाणात ग्लुकोज व फ्रुक्टोज, खनिज लवणे ही द्रव्ये सापडतात. यात पाण्याचाही थोडा अंश असतो. तो ऋतुमानाप्रमाणे कमी जास्त होतो. गुळाचे रासायनिक पृथःकरण सर्वसाधारणपणे पुढीलप्रमाणे असते : साखर ६५ ते ८५%, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज १० ते १५%, खनिज लवणे (रक्षा) २·५% आणि जलांश ३ ते ५%. यांशिवाय कॅरोटीन २८० आंतरराष्ट्रीय एकके /१०० ग्रॅ., निकोटिनिक अम्ल १·० मिग्रॅ. / १०० ग्रॅ. तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, लोह व तांबे हीदेखील थोड्या प्रमाणात आढळतात. गुळाचे कॅलरी मूल्य दर १०० ग्रॅमला ३६५ इतके आहे.
उत्तर लिहिले · 25/9/2023
कर्म · 53710
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0

खोबरेल तेल खालील वस्तूंमध्ये विरघळते:

  • इथर (Ether): खोबरेल तेल इथरमध्ये चांगल्या प्रकारे विरघळते.
  • क्लोरोफॉर्म (Chloroform): हे एक उत्तम विद्रावक (Solvent) आहे आणि खोबरेल तेल यात विरघळते.
  • कार्बन टेट्राक्लोराईड (Carbon Tetrachloride): ह्यामध्ये खोबरेल तेल विरघळते.
  • बेंझिन (Benzene): बेंझिनमध्ये खोबरेल तेल मिसळते.
  • पेट्रोलियम ईथर (Petroleum Ether): ह्यामध्ये सुद्धा खोबरेल तेल विरघळते.

टीप: वरील रसायने ज्वलनशील (Flammable) आहेत, त्यामुळे त्यांचा वापर करताना योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1240
0

खोबरेल तेल हे खालील गोष्टींमध्ये विरघळते:

  • इतर तेले: खोबरेल तेल हे इतर तेलांमध्ये मिसळले जाते. उदाहरणार्थ, ऑलिव्ह ऑईल (Olive oil) किंवा सूर्यफूल तेल (sunflower oil).
  • सेंद्रिय सॉल्व्हेंट्स (Organic solvents): हे तेल बेंझिन (benzene), पेट्रोलियम ईथर (petroleum ether) आणि कार्बन टेट्राक्लोराईड (carbon tetrachloride) मध्ये विरघळते.

टीप: खोबरेल तेल पाण्यात विरघळत नाही.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1240
0
या प्रश्नाचे उत्तर या पूर्वी दिले गेले आहे,

खालील लिंक वर क्लिक करा.


खोबरेल तेल कशात विरघळते ?
उत्तर लिहिले · 25/2/2018
कर्म · 19415
7

पोलार कम्पाउंड (polar compound) हे पोलार मध्ये मिसळते, नॉन पोलार, हे नॉन पोलार मध्ये मिसळते. तर काही नॉन पोलार हे पोलार मध्ये ही मिसळते जसे की Turpentine.

खोबरेल तेल नॉन पोलार आहे, म्हणजे ते नॉन पोलार मध्ये मिसळू शकते.

पाणी पोलार आहे. पेट्रोल नॉन पोलार आहे.

त्यामुळे माझ्या मते पेट्रोल मध्ये मिसळू शकते, पण मी नक्की नाही उत्तरावर, तुम्ही स्वता प्रयोग करून पहा की कशात मिसळते.


उत्तर लिहिले · 17/2/2018
कर्म · 85195
6
पुढील उत्तर पूर्णतः समाधान कारक नसेल कदाचित पण थोडी फार माहिती मिळत असेल तर पहा.....
★. वनस्पती तुपात खोबरेल तेलाचा बराच अंंश असतो आणि खरे म्हणजे वनस्पती तूप काहीसे चवदार लागते, ते त्यातल्या खोबरेल तेलाच्या अंशामुळेच लागते. ते घट्ट असते आणि त्यामुळे ते खाण्यास अयोग्य आहे असे आपण मानतो. कारण जे तेल सामान्य तपमानाला विरघळत नाही ते तेल खाणे म्हणजे हृदयविकाराला निमंत्रण, असे आपण समजत असतो. परंतु वनस्पती तुपातले खोबरेल तेल त्यात हायड्रोजन गॅस पास केलेला असतो, म्हणून घट्ट झालेले असते. वस्तुत: शुद्ध स्वरुपातले खोबरेल तेल असे धोकादायक नसते कारण ते सामान्य तापमानाला विरघळत असते. 


उत्तर लिहिले · 5/1/2018
कर्म · 123540