Topic icon

जागतिक वेळ

0

जागतिक प्रमाणवेळ (Coordinated Universal Time - UTC) ही शून्य अंश रेखावृत्तावर (0° longitude) ठरवली जाते. या रेखावृत्ताला ग्रीनविच रेखावृत्त (Greenwich Meridian) असेही म्हणतात. हे रेखावृत्त युनायटेड किंगडममधील ग्रीनविच वेधशाळेतून जाते.

ग्रीनविच रेखावृत्तावरील वेळेनुसार जगातील इतर ठिकाणच्या वेळा निश्चित केल्या जातात.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 16/4/2025
कर्म · 2680
0
ग्रीनविच प्रमाणवेळ (Greenwich Mean Time; संक्षेप : (GMT) ही लंडनच्या ग्रीनविच बरोमधील रॉयल ऑब्झर्व्हेटरीमध्ये पाळली जात असलेली एक प्रमाणवेळ आहे. 

पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) लंडनच्या ग्रीनविच ह्या उपनगरामधून जात असल्याचे गृहीत धरले आसल्याने ग्रीनविच प्रमाणवेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यूटीसी (युनिव्हर्सल टाईम कोआॅर्डिनेटेड) या जागतिक प्रमाणवेळेसाठी ग्रीनविच येथील स्थानिक वेळ ही आधारभूत धरली जाते. यूटीसी±००:०० ही प्रमाणवेळ ग्रीनविच वेळेशी संलग्न आहे.

जागतिक समन्वित वेळ (इंग्लिश: Coordinated Universal Time) किंवा यूटीसी हे आंतरराष्ट्रीय परमाण्विक वेळेवर आधारलेले वेळ मोजण्याचे एक प्रमाण आहे. ह्या प्रमाणाद्वारे सध्या जगातील सर्व स्थानांवरील प्रमाणवेळ ठरवली जाते. पूर्वी याच कामासाठी ग्रीनविच सरासरी वेळ (GMT) वापरली जाई.. ग्रीनविच सरासरी वेळ ही लंडनमधील ग्रीनिच ह्या स्थळाची स्थानिक वेळ आहे. ही यूटीसीशी मिळतीजुळती आहे. जगातील सर्व आंतरराष्ट्रीय कालविभाग आता यूटीसीच्या संदर्भात मोजले जातात.
उत्तर लिहिले · 6/4/2023
कर्म · 7460
0
पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिम दिशेला सुरू होतो आणि पूर्व दिशेला संपतो. 
पृथ्वीवर दिवस आंतरराष्ट्रीय वाररेषेच्या पश्चिम दिशेला सुरू होतो आणि पूर्व दिशेला संपतो. १८०° रेखावृत्तावर रात्रीचे बारा वाजण्याच्या वेळेस सर्व पृथ्वीवर एकच वेळ असते, तेथून पश्चिमेला दिवस सुरू होण्याचा वेळ असतो, तर पूर्वेकडील देशात तो वेळ दिवस संपण्याचा असतो. म्हणून १८०° रेखावृत्तावर रात्रीचे १२ वाजताच पूर्वेकडील देश जसे संयुक्त संस्थाने, चिली येथे दिवस संपण्याचा क्षण सुरू होतो, तर पश्चिमेकडील देश जसे जपान, ऑस्ट्रेलिया येथे दिवस सुरू होण्याचा क्षण सुरू होतो.
उत्तर लिहिले · 26/3/2023
कर्म · 53750
0

बरोबर. ग्रीनिच वेळेला (Greenwich Mean Time - GMT) जागतिक प्रमाण वेळ (World Standard Time) असे म्हटले जाते.

ग्रीनिच ही लंडनच्या पूर्वेकडील एक वेधशाळा आहे आणि तेथील वेळेनुसार जगातील इतर ठिकाणांची वेळ निश्चित केली जाते.

टीप: 'ग्रीनिच Mean टाइम' (GMT) हा शब्दप्रयोग आता कमी प्रमाणात वापरला जातो. त्याऐवजी 'युनिव्हर्सल कोओर्डिनेटेड टाइम' (UTC) हा शब्दप्रयोग अधिकृतपणे वापरला जातो, जो GMT पेक्षा अधिक अचूक आहे.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2680
2
ग्रीनविच प्रमाणवेळ (Greenwich Mean Time; संक्षेप : जी.एम.टी.) ही लंडनच्या ग्रीनविच बरोमधील रॉयल ऑब्झर्व्हेटरीमध्ये पाळली जात असलेली एक प्रमाणवेळ आहे. 

पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) लंडनच्या ग्रीनविच ह्या उपनगरामधून जात असल्याचे गृहीत धरले आसल्याने ग्रीनविच प्रमाणवेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

यूटीसी (युनिव्हर्सल टाईम कोआॅर्डिनेटेड) या जागतिक प्रमाणवेळेसाठी ग्रीनविच येथील स्थानिक वेळ ही आधारभूत धरली जाते. यूटीसी±००:०० ही प्रमाणवेळ ग्रीनविच वेळेशी संलग्न आहे.

युनायटेड किंग्डममध्ये ग्रीनविच वेळ हीच स्थानिक वेळ म्हणून वापरली जाते.

ग्रीनिच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते.
उत्तर लिहिले · 5/12/2021
कर्म · 25850
3
सूर्य आकाशात सरकतो तसतशी सावली लहान होत जाते. – मध्यान्हाच्या वेळी सावली सर्वात लहान असते. मध्यान्होत्तर काळात सावली पुन्हा मोठी होत जाते. 

एखाद्या ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या ठिकाणावरून ठरवण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय.   

जगात एकूण 24 स्थानिक वेळा आहेत
उत्तर लिहिले · 17/11/2021
कर्म · 25850
0
जागतिक प्रमाणवेळ किती अंशाच्या रेखावृत्तावरून ठरवली जाते ?
उत्तर लिहिले · 20/9/2021
कर्म · 0