Topic icon

पोलीस प्रशासन

0
पोलिस पाटलाचा कार्यकाळ सामान्यतः ५ वर्षांचा असतो. महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार, त्यांची निवड गावकऱ्यांमधून केली जाते आणि त्यांची नियुक्तीsub-divisional Magistrate (SDM) करतात. अधिक माहितीसाठी, आपण महाराष्ट्र पोलिस पाटील अधिनियम १९६७ चा संदर्भ घेऊ शकता.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2680
7
पोलीस अधीक्षक यांना  SP (Suprintendent Of police) असे म्हणतात.


पोलीस उपअधीक्षक यांना Dy SP (Deputy Supritendendent of police)असे म्हणतात.

DySP हे पद MPSC exam प्रक्रिये द्वारे भरले जाते.
                                तर
DySP नंतर SP हे पद promotion ने मिळवले जाते.

SP हे जिल्हा पोलीस अधीक्षक असतात.
                     तर
DySP हे उपविभाग पोलीस अधीक्षक असतात.



कामे:-

राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणे.
DySP हे SP ना त्यांच्या कामात मदत करणे.





@@@महाराष्ट्र पोलीस खात्याची रचना:-@@@


पोलीस महासंचालक(DGP)

अतिरिक्त महासंचालक

विशेष पोलीस महानिरीक्षक Special IGP

पोलीस उपमहानिरीक्षक (DIG)

सहायक महानिरीक्षक (AIG)

पोलीस अधीक्षक (SP/DCP)

अतिरिक्त पोलीस अधीक्षक(Add. SP)

पोलीस उपअधीक्षक(Dy SP/DCP)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Sr.PI)

पोलीस निरीक्षक(PI)

सहाय्यक पोलीस निरीक्षक(API)

पोलीस उपनिरीक्षक(PSI)

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक(APSI)

पोलीस हवालदार (Head constable)

पोलीस नाईक(police naik)

पोलीस शिपाई (Police constable)
🙏



    
उत्तर लिहिले · 3/4/2020
कर्म · 3350
0
तुमच्या प्रश्नामध्ये अनेक कायदेशीर आणि प्रशासकीय मुद्दे आहेत. त्यांची माहिती खालीलप्रमाणे:

नियुक्ती रद्द करण्याची प्रक्रिया:

  • पोलीस पाटलाची नियुक्ती रद्द करण्याची एक विशिष्ट प्रक्रिया असते.
  • जर विरोधकांनी खोटी तक्रार दाखल केली, तर त्या तक्रारीची पडताळणी होणे आवश्यक आहे.
  • पडताळणीमध्ये तथ्य आढळल्यास, नियमानुसार कारवाई होऊ शकते.
  • दारू पिऊन गैरवर्तन करणे:

  • जर पोलीस पाटील दारू पिऊन गैरवर्तन करताना आढळले, तर हे निश्चितच गैरवर्तन आहे आणि त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
  • परंतु, केवळ तक्रार दाखल झाल्यास, तत्काळ नियुक्ती रद्द करणे योग्य नाही.
  • दारूचा परवानाधारक व्यक्तीची निवड:

  • जर दारूचा परवाना असलेल्या व्यक्तीची निवड पोलीस पाटील म्हणून झाली, तर हा निवडीच्या नियमांचे उल्लंघन असू शकते.
  • कारण, पोलीस पाटील हे पद निष्पक्ष आणि जबाबदार व्यक्तीकडे असणे अपेक्षित आहे.
  • कायदेशीर उपाय:

  • जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्यावर अन्याय झाला आहे, तर तुम्ही या निर्णयाविरोधात अपील करू शकता.
  • तुम्ही न्यायालयात देखील दाद मागू शकता.
  • नियमांचे उल्लंघन:

  • नियमानुसार, जर निवड प्रक्रिया योग्य नसेल, तर ती निवड रद्द होऊ शकते.
  • या संदर्भात अधिक माहितीसाठी, तुम्ही महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि संबंधित नियम तपासू शकता.
  • Disclaimer: मी तुम्हाला अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु अंतिम निर्णय घेण्यापूर्वी कृपया संबंधित कायद्याचा अभ्यास करा किंवा वकिलाचा सल्ला घ्या.

    उत्तर लिहिले · 19/3/2025
    कर्म · 2680
    2
    दत्ता पडसलगीकर हे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक आहेत.
    उत्तर लिहिले · 3/2/2019
    कर्म · 1495
    5
    महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीस दलांपैकी एक असून त्यात १० पोलीस आयुक्तालये व ३६ जिल्हा पोलीस दले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचे मनुष्यबळ सुमारे १,८०,००० आहे. मुंबई येथे महाराष्ट्र पोलिसांचे मुख्यालय आहे.
    उत्तर लिहिले · 6/9/2018
    कर्म · 0
    3
    'डीजीपी राज्य पोलिस दलाचे प्रमुख आहेत [1] शास्त्रीय दृष्टीकोनातून, प्रत्येक राज्य प्रादेशिक बोर्डांमध्ये विभागला जातो, ज्यास श्रेण्या म्हणतात. आणि प्रत्येक पोलीस श्रेणी पोलीस महानिरीक्षकांचे प्रशासकीय नियंत्रण आहे. एका श्रेणीत अनेक जिल्हे असू शकतात. जिल्हा पोलिस प्रामुख्याने पोलिस विभाग, मंडळे व थानामध्ये विभागले आहे. नागरीक पोलिसांशिवाय राज्याला स्वत: ची सशस्त्र पोलिस ठेवण्याचा अधिकार आहे आणि स्वतंत्र गुप्तचर शाखा, गुन्हे शाखेची तरतूद आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, पुणे, भुवनेश्वर, कटक यासारख्या मोठया महानगरांमध्ये पोलीस यंत्रणेचे प्रमुख थेट पोलीस आयुक्त आहेत. विविध राज्यांमध्ये, भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) ने उच्च पोलिस अधिकार्यांच्या पदांवर भरती केली जात आहे, ज्यांची भरती परीक्षा संपूर्ण भारतातील उमेदवारांची आहे

    हे भारतीय पोलीस सेवेद्वारे निवडलेल्या राज्याचे सर्वात मोठे पोलिस अधिकारी आहे. राज्यातील कॅबिनेट मंत्री यांच्या समकक्ष रेटिंग मिळते.
    उत्तर लिहिले · 13/5/2018
    कर्म · 20065
    3
    राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माथूर हे अगोदर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) महासंचालक म्हणून काम पाहत होते.
    उत्तर लिहिले · 22/9/2017
    कर्म · 22090