Topic icon

रक्त तपासणी

5
रक्त तपासणी करायच्या अगोदर काय करायचे

समजा तुम्हाला एक किंवा दोन महिन्यानंतर रक्त तपासणी करायची आहे आणि तुम्हाला काळजी वाटत आहे की आपल्या रक्तात दोष तर नाही निघणार !

रक्तात एखाद्या गोष्टीची कमी असणे किंवा सर्वसामान्य बिमारी किंवा दोष निघाल्यास एवढी चिंता वाटत नाही. मग आपल्याला चिंता वाटते तर ती म्हणजे काही मोठी बिमारी तर नसेल.

म्हणुन असे विचार डोक्यात येतात


समजा समजा समजा ! तुम्हाला एक भयंकर मोठी बिमारी आहे आणि हे गोष्ट तुम्हाला माहित नाही. माहित यासाठी नाही कारण तुम्ही रुग्णालयात जाऊन तपासणी केली नाही.

हे गोष्ट तुम्हाला तेव्हा माहित पडेल जेव्हा तुम्ही रुग्णालयात जाऊन तपासणी करालं.

परंतु

तुम्हाला हे गोष्ट माहीत नाही की तुम्हाला भयंकर बिमारी आहे तरीही आपण या बिमारीला हरवुन ही बिमारी आपल्याला होतीच नाही असं करू शकतो. म्हणजे एका महिन्यात किंवा जास्तीत जास्त दोन महिन्यात आपण या बिमारीला नष्ट करू शकतो. आपल्याला सकारात्मक परिणाम पाहिजे की मी तंदुरुस्त असलो पाहिजे आणि मला कुठल्याही प्रकारची बिमारी नको.

मग काय करायचं रक्त तपासणी करण्याअगोदर की जेणेकरून परिणाम चांगला लागेल, भीती तसेच Depression कमी होईल.


रोज सकाळी......

  • . योगा व्यायाम करणे.
  • सुर्यनमस्कार करणे. (12 वेळा)
  • प्राणायाम करणे.
  • पाच किंवा दहा वेळा "ॐ" चा उच्चारण करणे. हा व्यायाम आहे एकप्रकारचा.
  • ध्यान करणे. ( meditation )
  • वरिल सर्व झाल्यावर शवासण करणे.
  • शवासण करताना "मी निरोगी, तंदुरुस्त, healthy आहे" या गोष्टी चा जास्तीत जास्त विचार करावा.

तत एक किंवा दोन महिने करणे, रोज करणे.

यामुळे 99 percent chances आहे की रक्त तपासणी चा परिणाम चांगला म्हणजे 99 percent चांगला येईल. जे तुम्हाला बिमारी होती ते नष्ट झाली असणार‌.

जर तुम्हाला बिमारी आहे आणि हे गोष्ट तुम्हाला माहित आहे. मग तुम्ही एक दोन महिने वरील गोष्टी केल्या तरी फार कमी chances असते की तुमची बिमारी नष्ट होईलच म्हणून तुम्ही doctor ची मदत घ्यावी.

कारण या गोष्टी करुन आपल्याला मेंदूला मुर्ख बनवावे लागते.
उत्तर लिहिले · 30/12/2019
कर्म · 44255
0
ESR म्हणजे काय?

ESR चा अर्थ एरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट (Erythrocyte Sedimentation Rate) आहे. या रक्त तपासणीद्वारे शरीरात दाह (inflammation) आहे की नाही हे तपासले जाते.

ESR तपासणी कशासाठी करतात?

  • संसर्ग (Infection)
  • auto immune disorder
  • कर्करोग (Cancer)

ESR सामान्य पातळी काय आहे?

  • पुरुषांसाठी: 0-22 mm/hr
  • स्त्रियांसाठी: 0-29 mm/hr
  • मुलांसाठी: 0-10 mm/hr

ESR चाचणी एक विशिष्ट चाचणी नाही. याचा अर्थ, ESR चाचणीतील वाढलेले प्रमाण नेहमीच कोणत्यातरी विशिष्ट आजाराचे निदान करत नाही. दाह अनेक कारणांमुळे होऊ शकतो, त्यामुळे डॉक्टर इतर चाचण्यांच्या निकालांवर आणि शारीरिक तपासणीच्या आधारावर निदान करतात.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती केवळ माहितीपर आहे. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 5400
5
✍️……एक complete blood count, किंवा सीबीसी, आपल्या आरोग्यास प्रभावित करणार्या विशिष्ट विकारांच्या स्क्रीनची एक सोपी आणि अत्यंत सामान्य चाचणी.

🎯लाल रक्तपेशी……

  • लाल रक्तपेशी आपल्या शरीरात ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डाय ऑक्साईड काढून टाकतात. आपल्या लाल रक्तपेशींच्या दोन घटकांचा सीबीसी पालन करतो.
  • हेमोग्लोबिन: ऑक्सिजन-वाहून नेणारे प्रोटीन
  • हेमाटोक्रिट: आपल्या रक्तातील लाल रक्तपेशींची टक्केवारी.
  • हेमोग्लोबिन आणि हेमेटोक्रिट्चे कमी स्तर हे बहुधा अॅनिमियाचे लक्षण आहेत,जेव्हा रक्त मध्ये लोहाची कमतरता असते तेव्हा असे होते.
🎯पांढर्या रक्त पेशी……

  • पांढर्या रक्त पेशी आपल्या शरीरात संसर्ग लढण्यास मदत करतात.एक Complete Blood Countसीबीसी आपल्या शरीरातील पांढर्या रक्त पेशींची संख्या आणि प्रकार मोजतो. पांढर्या रक्त पेशींची संख्या किंवा प्रकार संक्रमण, सूज किंवा कर्करोगात असामान्य वाढ किंवा घट दर्शवू शकतो.
🎯प्लेटलेट्स……

  • प्लेटलेट आपल्या रक्तात व रक्तस्त्राव नियंत्रित करते. जेव्हा कटमधून रक्तस्त्राव बंद होतो तेव्हा प्लेटलेट आपले काम करत असतो. प्लेटलेट पातळीतील कोणत्याही बदलामुळे आपल्याला अति रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते आणि ती गंभीर वैद्यकीय स्थितीचे लक्षण असू शकते.
  • नियमित तपासणीचा भाग म्हणून आपले डॉक्टर सीबीसीला ऑर्डर देऊ शकतात किंवा आपल्याकडे रक्तस्त्राव किंवा दुखापत असल्यासारखे कोणतेही अस्पष्ट लक्षण असल्यास.
…✍️
उत्तर लिहिले · 10/3/2019
कर्म · 1155
4
प्रत्येक हॉस्पिटलला वेगवेगळे दर असतो, त्यामुळे नक्की कोणीच सांगू शकत नाही. रक्त तपासणी म्हणजे रक्तामध्ये वेगवेगळ्या तपासण्या असतात, त्यामध्ये वेगवेगळी फी आकारली जाते.
उत्तर लिहिले · 3/10/2018
कर्म · 25725
0

रक्त गट (Blood group) तपासण्यासाठी खालील पद्धती वापरल्या जातात:

  1. प्रयोगशाळेतील तपासणी (Laboratory Testing):

    ही सर्वात अचूक पद्धत आहे. यामध्ये प्रशिक्षित तंत्रज्ञ (Technician) रक्त तपासणी करतात.

    प्रक्रिया:

    • Healthcare provider तुमच्या हातातील रक्तवाहिन्यांमधून (Vein) रक्त काढेल.
    • रक्ताचा नमुना (Blood Sample) प्रयोगशाळेत पाठवला जातो.
    • प्रयोगशाळेत, रक्तातील अँटिजेन्स (Antigens) आणि अँटिबॉडीज (Antibodies) तपासले जातात. ह्यावरून तुमचा रक्तगट कोणता आहे हे ठरवले जाते.

  2. रक्त गट तपासणी किट (Blood Typing Kit):

    काही किट बाजारात उपलब्ध आहेत, ज्याद्वारे तुम्ही स्वतः घरी रक्तगट तपासू शकता. परंतु हे किट वापरताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

    प्रक्रिया:

    • किटमध्ये दिलेल्या सुईने बोटातून रक्ताचा नमुना घ्या.
    • किटमध्ये असलेल्या कार्डवर रक्ताचे थेंब टाका.
    • कार्डवरील रंगात होणारे बदल पाहून रक्तगट ओळखा.

    धोके: हे किट वापरताना sterility maintain करणे आवश्यक आहे, नाहीतर infection चा धोका असतो.

    अचूकता: या किटची अचूकता प्रयोगशाळेतील तपासणीइतकी नसते.

सामान्य माणूस स्वतः रक्त तपासू शकतो का?

घरी रक्त तपासणी किट वापरून रक्तगट तपासणे शक्य असले तरी, प्रयोगशाळेतील तपासणी अधिक सुरक्षित आणि अचूक असते. त्यामुळे शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रयोगशाळेत रक्त तपासणी करावी.

अधिक माहितीसाठी तुम्ही हे विडिओ (https://www.youtube.com/watch?v=Y-iFQoHktnk) बघू शकता.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 5400
6
नाही केवळ ब्लड टेस्ट मुळे आपण काही रक्ताचे प्रमाण कमी किंवा अधिक असे जाणू शकत नाही. किंवा रक्त पातळ किंवा घट्ट असे जाणू शकत नाही. रक्ताच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्टस असतात त्या खालील प्रमाणे
C B C- रक्तपेशी संख्या(तांबडया पांढऱ्या प्लेटलेट्स)
हिमोग्लोबिन
H I V
कावीळ  (Hb S Ag)
मलेरिया
सिफिलिस
डेंग्यू
Chikungunya
Leptospira
वगैरे......
उत्तर लिहिले · 3/4/2018
कर्म · 7355
0
Blood Sugar म्हणजे काय यासाठी हे उत्तर वाचा माणसाच्या शरीरात साखर म्हणजे काय, ती कशी तयार होते? हिमोग्लोबिन म्हणजे काय यासाठी खालील उत्तर वाचा: हिमोग्लोबिन म्हणजे काय?
उत्तर लिहिले · 24/6/2017
कर्म · 283320