Topic icon

मोबाईलचा इतिहास

8



भ्रमणध्वनी हे एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण (यंत्र) असून याचा दूरसंचारासाठी उपयोग केला जातो. याला इंग्रजीमध्ये मोबाईल फोन (मोबाईल) किंवा सेल्युलर फोन (सेल फोन) असे म्हणतात. भ्रमणध्वनीच्या साहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण करता येते. पारंपरिक दूरध्वनी उपकरणे घरामध्ये एकाच जागी ठेवून वापरावी लागतात.

जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात.

आधुनिक काळातील मोबाईल फोन हे संभाषणाखेरीज महाजाल (इंटरनेट) न्याहाळणे, लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडियो ऐकणे, जीपीएस वापरणे, पैसे देणे/काढणे इत्यादी कामांकरिता वापरले जातात. नोकिया, मोटोरोला, अ‍ॅपल, सीमेन्स, सॅमसंग

रेड मी,विवो या मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांपैकी काही सर्वात मोठ्या कंपन्या आहेत.

दूरसंचारविषयक सेवांसाठी मोबाईल फोनमध्ये सिम कार्ड वापरणे आवश्यक असते. भ्रमणध्वनीमुळे माणसे जोडली गेली आहेत. मोबाईलमुळे सर्व जग जवळ आले आहे.
उत्तर लिहिले · 18/12/2019
कर्म · 34255
2
जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात.
उत्तर लिहिले · 24/1/2019
कर्म · 705
16
मोबाइल चा शोध मार्टिन कूपर यांनी लावला आहे. मार्टिन कूपर एक अमेरिकन अभियंता आहे. तो वायरलेस संचार उद्योगात एक पायोनियर आणि दूरदृष्टी आहे. क्षेत्रात अकरा पेटंट, तो रेडिओ स्पेक्ट्रम व्यवस्थापन एक नवा उपक्रम प्रस्थापित म्हणून ओळखले जाते.
    
जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात.
उत्तर लिहिले · 15/2/2018
कर्म · 115390
9

मोबाइल चा शुद्ध मार्टिन कोपर यांनी लावला.
१९४०च्या दशकात फोनची सुविधा उपलब्ध झाली.
आणि पुढची तीन दशकं यावर बरचं संशोधन झालं.
३ एप्रिल १९७३ ला पहिला मोबाईल फोन कॉल झाला.. मोटोरोला कंपनीचे इंजीनिअर मार्टिन कुपर यांनी तो कॉल केला होता...तो प्रोटोटाईप पद्धतीचा मोबाईल फोन होता...
त्या घटनेला 3 एप्रिलला चव्वेचाळीस वर्ष पूर्ण होतील...
उत्तर लिहिले · 31/3/2017
कर्म · 21355