उपनिषदे
उपनिषदे भारतीय दर्शनाचा आणि अध्यात्माचा आधार आहेत. त्यांचे महत्त्व खालीलप्रमाणे:
उपनिषदे आत्मज्ञानाचे महत्त्व सांगतात. 'तत् त्वम् असि' (ते तू आहेस) यांसारख्या वाक्यांमधून आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत हे स्पष्ट करतात.
उपनिषदे ब्रह्माचे स्वरूप, त्याची उत्पत्ती आणि जगाशी असलेला संबंध याबद्दल मार्गदर्शन करतात. ब्रह्म हे अंतिम सत्य आहे असे मानले जाते.
उपनिषदांमध्ये कर्म आणि पुनर्जन्म या सिद्धांतांचे विश्लेषण आहे. कर्मानुसार मनुष्य जन्म घेतो आणि मुक्तीसाठी योग्य कर्म करणे आवश्यक आहे, हे सांगितले आहे.
उपनिषदे मोक्ष प्राप्तीचा मार्ग दर्शवतात. अज्ञान आणि सांसारिक बंधनांपासून मुक्ती मिळवणे हा जीवनाचा अंतिम उद्देश आहे, असे उपनिषदांमध्ये सांगितले आहे.
उपनिषदे सत्य, अहिंसा, त्याग, आणि तपस्या यांसारख्या नैतिक मूल्यांवर जोर देतात. हे गुण मनुष्याला आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यास मदत करतात.
उपनिषदे भारतीय संस्कृती आणि परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. भारतीय कला, साहित्य, आणि দর্শનમાં उपनिषदांचा प्रभाव दिसतो.
उपनिषदे मानवाला शांती आणि समाधानाचा मार्ग दाखवतात. आत्मज्ञानाने मनुष्य जीवनातील दुःखांवर मात करू शकतो, असे उपनिषदांचे सार आहे.
अधिक माहितीसाठी काही संदर्भ:
१ ईशावास्य, २ केन, ३ कठ, ४ प्रश्न, ५ मुण्ड, ६ माण्डुक्य, ७ तैत्तिरीय, ८ ऐतरेय, ९ छांदोग्य, १० बृहदारण्य, ११ ब्रम्ह, १२ कैवल्य, १३ जाबाल, १४ श्वेताश्वेतर, १५ हंस, १६ आरुणि, १७ गर्म, १८ नारायण, १९ परम, (हंस) २० (अमृत) बिंदु, २१ (अमृत) नाद, २२ (अथर्व) शिरस्. २३ (अथर्व) शिखा, २४ मैत्रायिणी, २५ कौषीतकी, २६ बृहज्जाबाल, २७ नृसिंहतापिनी, २८ कालाग्निरुद्र, २९ मैत्रेयी, ३० सुबाल, ३१ क्षुरि (का) ३२ मन्त्रिका, ३३ सर्वसार, ३४ निरालंब, ३५ शुक (रहस्य), ३६ वज्रसूचिका, ३७ तेजो - (बिन्दु), ३८ नाद - (बिन्दु ३९ ध्यान-बिन्दु, ४० ब्रह्मविद्या, ४१ योगतत्त्व, ४२ आत्मबोधक, ४३ (नारद)- परिव्राजक, ४४ त्रिशिखि - (ब्राह्मण) ४५ सीता, ४६ (योग) चूडा - (मणि), ४७ निर्वाण, ४८ मण्डल- (ब्राह्मण) ४९ दक्षिणा - (मूर्ती) ५० शरम, ५१ स्कंद, ५२ महानारायण, ५३ अद्वय - (तारक) ५४ राम - (रहस्य) ५५ रामतपन, ५६ वासुदेव, ५७ मुद्गल, ५८ शाण्डिल्य, ५९ पिङ्गल, ६० भिक्षुक, ६१ महा, ६२ शारीरक, ६३ (योग)- शिखा, ६४ तुर्यातीत, ६५ संन्यास, ६६ (परमहंस)- परिव्राजक, ६७ अक्षमालिका, ६८ अव्यक्त, ६९ एकाक्षर, ७० (अन्न)- पूर्णा, ७१ सूर्य, ७२ अक्षिक, ७३ अध्यात्म, ७४ कुण्डिका, ७५ सावित्री, ७६ आत्म, ७७ पाशुपत, ७८ परव्रह्म, ७९ अवधूतक, ८० त्रिपूर तापन, ८१ देवी, ८२ त्रिपुर, ८३ कठ (रुद्र) ८४ भावना, ८५ रुद्र - (ह्रदय) ८६ (योग)- कुण्डली, ८७ भस्म - (जाबाल), ८८ रुद्राक्ष, ८९ गण - (पति) ९० (श्री जाबाल)- दर्शन, ९१ तारसार, ९२ महावाक्य, ९३ पञ्चब्रह्म, ९४ प्राण - (अग्निहोत्र), ९५ गोपाल (पूर्वतापिनी-उत्तरतापिनी), ९६ कृष्ण, ९७ याज्ञवल्क्य, ९८ वराह, ९९ शाठयानीय, १०० हयग्रीव, १०१ दत्तात्रेय, १०२ गरुड, १०३ कलि (संतराण), १०४ जाबालि, १०५ सौभाग्यलक्ष्मी, १०६ सरस्वती (रहस्या), १०७ बव्ह्रच आणि १०८ मुक्तिकोपनिषद. " अष्टोत्तरशतस्यादौ प्रामाण्यं मुख्यमीरितम. " (रा. गी. १८-३)
आज अस्तित्वात असलेल्या मोठय़ा व मुख्य धर्मामध्ये भारतातील हिंदू धर्म हा जगात सर्वात प्राचीन धर्म आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी आर्याच्या भारत प्रवेशानंतर लगेच ज्याची रचना सुरू झाली तो ऋग्वेद (ज्याच्यापासून हिंदू धर्माचा आरंभ मानण्याची परंपरा आहे.) तोच सबंध मानव जातीचा आद्य सांस्कृतिक ग्रंथ आहे. हिंदू हा धर्म ‘एकमेव परमेश्वराने त्याच्या आवडत्या एकमेव प्रेषिताला एकांतात सांगितलेला’, अशा प्रकारचा धर्म नसून, तो शेकडो ऋषींनी, शेकडो वर्षे सांगितलेला धर्म आहे. भारतात आलेल्या विविध मानवसमूहांनी, त्यांच्यातील शत्रुत्वानंतर पुढील काळात एकत्र येत, सर्वाच्या स्वकल्पनांचे सहिष्णुतेने सम्मीलन करीत उभा राहिलेला हा धर्म, केवळ आर्याचा धर्म नसून, हा संस्कृती संगमाचा विश्वधर्मच होय.
ऋग्वेदकाळी हा धर्म कसा होता, त्याची आणखी थोडी माहिती मागील प्रकरणानंतर, आपण इथे आधी घेऊ या. १) जगभरच्या इतर अनेक प्राचीन मानवसमूहांप्रमाणे या धर्मातील कुटुंबव्यवस्थासुद्धा काही ठिकाणी ‘स्त्रीप्रधान’ व्यवस्था असावी. कारण काही जण फक्त आईचेच नाव सांगत असत. वडिलांचे नाही. २) आजच्यासारखी विवाहसंस्था आणि आजच्यासारख्या कुटुंब-कल्पना त्या काळी अस्तित्वात नव्हत्या. ३) तत्कालीन लोकांचे गट किंवा साम्य संघ असत, ज्यात एक प्रकारची नैसर्गिक लोकशाही प्रचलित होती. म्हणजे संघातील सर्वाना समान हक्क असत. संपत्ती व उपभोग सामायिक होते. ‘वैयक्तिक मालकीहक्क’, ‘खासगी मालमत्ता’ आणि ‘राजाचे राज्य’ या थोडय़ा उशिरा आलेल्या कल्पना आहेत. ४) जरी या काळात वेदविचारांचे प्रभुत्व होते तरी वेद-यज्ञ-विरोधी विचारही आणि अगदी ईश्वर-अस्तित्व नाकारणारे विचारही- जरी ते युद्धात हरलेल्यांचे विचार होते आणि जरी आज ते ग्रंथरूपात उपलब्ध नाहीत- तरी ते समांतरपणे प्रचलित होते. ५) हे लोक आणि यांचे ऋषी-मुनीसुद्धा ‘गोमांस भक्षण’ निश्चितपणे करीत असत. गोरक्षण आणि गाईचे देवत्व हे पुढील काळातील विचार आहेत. ६) हे लोक जरी अनेक निसर्गदेवता मानीत होते व त्यांच्या उपासना करीत होते तरी ऋग्वेदात कुठेही ‘ईश्वर ब्रह्म’ ही कल्पना नाही. ७) या लोकांची देवळे, मंदिरे नव्हती. मूर्तिपूजा नव्हत्या, अवतार-कल्पनाही नव्हत्या; परंतु त्यांच्या इंद्रादी देवता माणसांच्या समारंभात येत, त्यांच्याबरोबर सोमप्राशन करीत, अशा त्यांच्या समजुती होत्या. ८) तत्कालीन तीर्थस्थळे, तीर्थयात्रा, जत्रा, मेळे, कुंभमेळे यांचे काहीही उल्लेख नाहीत. उपवास, व्रते असेही उल्लेख नाहीत. ९) ऋग्वेदकाळी जातिभेद, चातुर्वर्णभेद नव्हते. आर्याच्याच फक्त ब्राह्मण (कमी) व क्षत्रिय (जास्त) हे दोनच वर्ण होते व तेही कर्माधारित असावेत; जन्माधारित नव्हे. पुढे केव्हा तरी वैश्य वर्ण व वेदकाळाच्या शेवटी केव्हा तरी शूद्र वर्ण बनून चातुर्वण्र्य बनले असावेत व त्यानंतर पुढील काळात जातिभेद. १०) वेदांमध्ये जरी देव, होमहवने व प्रार्थना आहेत तरी त्या बहुतेक प्रार्थना अन्न, वस्त्र, निवारा, संरक्षण आणि प्रजोत्पत्ती अशा ‘भौतिक गरजा’ भागविण्यासाठी आहेत आणि त्यांचे इंद्रवरुणादी देव त्या गरजा भागवतील असे त्यांना वाटत असे. आजच्या हिंदू धर्मात इंद्रवरुणादी देव विस्मृतीत जाऊन ब्रह्मा, विष्णू, महेश आदी देव प्रमुख म्हणून पुढे आलेले असून, आज त्यांच्याच प्रार्थना होतात. ११) ऋग्वेदात ‘विणकाम, वस्त्रे, दागिने व काही धातूंचे उल्लेख आहेत. त्यातील काही धातूंचे उल्लेख उत्तरकालीन असावेत. ऋग्वेदात व्यापार नाही, पण वस्तुविनिमयाचा एक उल्लेख आहे. आर्याच्या दीड-दोन हजार वर्षांच्या दीर्घ कालखंडातील जीवनात, मोठे चढउतार झालेले नसावेत. १२) आजच्या हिंदू धर्मातील ‘आत्मा, पुनर्जन्म, मोक्ष’ इत्यादी अत्यंत वैशिष्टय़पूर्ण विचारमंथन ऋग्वेदरचना (इ.स.पू. ३००० ते इ.स.पू. १५००) होईपर्यंत झालेले नव्हते. त्या ऋषींना असे काहीही माहीत नव्हते. म्हणून ऋग्वेदात पुनर्जन्मांचे उल्लेख अजिबात नाहीत. हे विचारमंथन ज्या उपनिषदकाळी (इ.स.पू. १५०० नंतर) झाले त्या काळाकडे आपण आता वळू या.
हिंदू धर्म तत्त्वज्ञानाचा गाभा म्हणून ज्या प्राचीन दशोपनिषदांना मानले जाते ती बहुतेक सर्व इ.स.पू. १००० पर्यंत रचली गेली असावीत. यांना जरी वेदांत म्हणजे ‘वेदांचाच शेवटचा भाग’ असे म्हटले जाते तरी ते सयुक्तिक वाटत नाही. कारण यांचा रचना-काळ हा ऋग्वेद रचनेच्या सुरुवातीनंतर सुमारे दीड हजार वर्षांनंतरचा काळ आहे. त्यामुळे त्यांची भाषाही वेगळी आहे. शिवाय वेदांनी जे विचार सांगितले त्याहून वेगळेच नव्हे तर चक्क विरोधी विचारसुद्धा उपनिषदांनी सांगितले. त्यांची जीवनपद्धतीही यांनी साफ नाकारली. यज्ञाच्या कर्मकांडाचा यांनी निषेध केला; यज्ञांना फुटक्या होडय़ा म्हटले. यज्ञादी कर्मे करणाऱ्या पंडितांची रांग ही आंधळ्यांच्या माळेप्रमाणे आहे, असे मुंडक व कठ उपनिषदात म्हटलेले आहे. मग उपनिषदांचे ऐकायचे तर हिंदू धर्मात यज्ञ-होमांना काही स्थान उरले काय?
उपनिषदे सांगतात की, मनुष्याचा देह व त्याचा आत्मा या दोन वेगवेगळ्या वस्तू असून देहाचा जन्म त्याच्या ‘अदृश्य पण अमर’ आत्म्यासह होतो. आत्मा हा सर्वव्यापी ब्रह्माचाच अंश असतो. माणसाच्या या आत्म्यानेच, जीवनकाळात ब्रह्मप्राप्ती (म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्ती) करून घेणे हे त्याचे मुख्य ध्येय होय. अशी ब्रह्मप्राप्ती करून घेतली तर शरीराच्या मृत्यूसमयी आत्म्याने देहत्याग केल्यावर त्याला पुनर्जन्माने दुसरा देह धारण करावा लागत नाही. कारण तो मोक्ष मिळवून ब्रह्ममय झालेला असतो; पुनर्जन्माच्या साखळीतून सुटलेला असतो.
१) दशोपनिषदे रचली जाण्यापूर्वीच्या वैदिक वाङ्मयात, विशेषत: ब्राह्मण ग्रंथात ‘स्वर्गप्राप्ती’ हेच माणसाचे सर्वोच्च उद्दिष्ट सांगितले जात होते. त्याऐवजी उपनिषदांनी मोक्ष किंवा ब्रह्मप्राप्ती हे अधिक आकर्षक मुख्य उद्दिष्ट माणसापुढे ठेवून एक वैचारिक क्रांतीच केली. तरीही स्वत: उपनिषदकार त्यांच्या ऐहिक जीवनातील सुखप्राप्तीबद्दल अगदी उदासीन होते असे काही दिसत नाही. २) शिवाय उपनिषदांमध्ये स्वर्गासारख्या दुसऱ्या अनेक लोकांचे (म्हणजे स्थानांचे) उल्लेख आहेत. त्यात अंभ, मरीची, आदित्यलोक, हीनतरलोक, पितृलोक, मातृलोक, गंधर्वलोक मनुष्यलोक सूर्यलोक, चंद्रलोक इत्यादी २८ लोकांचे उल्लेख आहेत. म्हणजे अशी स्थाने (आत्म्यांच्या हंगामी निवासासाठी?) कुठे तरी प्रत्यक्षात आहेत असे त्यांना वाटत होते; परंतु हे लोक (स्थाने) कुठे आहेत ते काही त्यांनी सांगितले नाही. ३) त्याचप्रमाणे विश्वोत्पत्ती व जीवोत्पत्तीबद्दल विविध उपनिषदांमध्ये अनेक वेगवेगळी विधाने आहेत. ती विधाने सारांशाने काल्पनिक, असंबद्ध व परस्परविरोधीसुद्धा आहेत, असा त्यांच्याबद्दलचा निष्कर्ष, प्रकरण ४ मध्ये उल्लेखिलेले वेदोपनिषदांचे अभ्यासक रघुनाथ जोशी यांनी काढलेला आहे. ४) उपनिषदकाळीसुद्धा स्त्री-पुरुषांमध्ये काहीही समानता नव्हती याचे कित्येक पुरावे उपनिषदातच आहेत. ५) उपनिषदकारांचे मानवी शरीरविषयक ज्ञानसुद्धा अगदी मर्यादित असावे असे दिसते. उदा. मनुष्याला कुठलेही ज्ञान होते ते त्याच्या मेंदूला नव्हे तर हृदयातील अंगठय़ाएवढय़ा आत्म्याला होते, असे त्यांना वाटत होते. ६) उपनिषदांतील काही विचार व विधाने, तत्त्वज्ञानासारखी प्रगल्भ न वाटता निसर्गविषयक प्राथमिक विचार किंवा लहान मुलांना सांगण्यासारख्या गप्पागोष्टी वाटतात. ७) उपनिषदकालीन समाज मोठा सुखी आणि सद्गुणसंपन्न होता असे काही वाटत नाही. म्हणजे असे की, त्या काळीसुद्धा चांगले-वाईट राजे होते, चोर होते, मदिराभक्त होते, व्यभिचारी होते, गरीब, दरिद्री, भुकेकंगाल, दुराचारी, मूर्ख व अंधश्रद्ध लोकही होते. भुतांप्रमाणे गंधर्वसुद्धा माणसांच्या (बहुधा स्त्रियांच्या) अंगात येत असत. ८) आत्मा, पुनर्जन्म, ब्रह्म आणि मोक्ष या सर्व उपनिषदांनी मांडलेल्या व ठसविलेल्या कल्पना आहेत. खरे तर ‘माणसाला पुनर्जन्म आहे’ ही धूर्त कल्पना म्हणजे सिद्धान्त नव्हे, पण आज जवळजवळ सर्वच हिंदू पुनर्जन्म, मोक्ष इत्यादी आध्यात्मिक कल्पना सत्य मानतात.
औपनिषदिक तत्त्वज्ञान बहुतांशी ब्रह्मप्राप्ती, मोक्ष या काल्पनिक, पारलौकिक ध्येयसिद्धीसाठी मांडलेले दिसते व ते पूर्णत: वैयक्तिक प्रयत्नसाध्य दिसते. समाजाच्या ऐहिक प्रगतीसाठी मात्र ते उपयुक्त ठरलेले दिसत नाही. शिवाय त्यातील चातुर्वण्र्य, पुनर्जन्म व सर्व काही ब्रह्मनियंत्रित आहे या मनुष्य कर्तृत्वाला गौण लेखणाऱ्या दैववादी कल्पना आज समाजाच्या ऐहिक प्रगतीला घातक ठरलेल्या दिसतात.
शब्दश: गुरुंजवळ बसून मिळवलेली विद्या. उप=जवळ, निष=बसणे.श्रीमद्भगवद्गीताहे एक उपनिषद आहे.प्राचीनभारतीयआर्यांचे तात्विक विचार उपनिषद साहित्यात आढळून येतात.उप या उपसर्गाचा अर्थ आहे ‘जवळ’ आणि सद याचा अर्थआहे बसणे. गुरुंच्या जवळ परमार्थ विद्या समजून घेणे असा याचा अर्थआहे.