प्रश्न विचारणे
0
Answer link
तुमचे प्रश्न विचारण्यासाठी मी सज्ज आहे. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करेन.
3
Answer link
प्रश्न लांबलचक होऊ नये, उत्तर देणाऱ्यास ते सोपे जावे. तसेच जेव्हा प्रश्न हा ठराविक शब्दांपेक्षा जास्त होतो त्यावेळेस कदाचित या प्रश्नांमध्ये अनेक उपप्रश्न असू शकतात. अशा वेळेत तुम्ही प्रश्न मोजक्या शब्दात लिहावा अशी अट आहे. तुमच्या प्रश्नांमध्ये वेगवेगळे भाग असतील तर कृपया तुम्ही वेगवेगळे प्रश्न विचारा. एका प्रश्नामध्ये जास्तीत जास्त ३०० अक्षरे असू शकतात.
4
Answer link
सर, तुमचे प्रोफाइल चेक केले. तुम्ही ४ प्रश्न विचारले आहेत, त्यापैकी तुम्हाला तुमच्या २ प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. उत्तर ॲपवर लाखो लोक आहेत, ते रोज प्रश्न विचारतात, त्याची उत्तरे पण दिली जातात. म्हणून कधी कधी उत्तर मिळण्यासाठी वेळ लागतो. हा एक सोशल प्लॅटफॉर्म आहे. जो तो व्यक्ती त्याच्या सवडीने इथे उत्तरे देत असतो, म्हणून तुम्हाला लगेच उत्तर मिळणार नाही. तुम्हाला लगेच उत्तर हवे असेल, तर Google वापरू शकता.
8
Answer link
आपल्या प्रश्नातील प्रमुख मुद्दा असा आहे की,
"जातीचं करायचं काय, निर्मूलन की व्यवस्थापन"..!
आपली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमधील काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगू इच्छिते..!
स्पर्धेसाठी स्पर्धकास किमान ५ ते ७ मिनिटांचा अवधी भाषणासाठी दिला जातो. काही ठिकाणी त्यांच्या नियमांनुसार अवधी वेगळे असू शकतात.
या कालावधीतच आपल्याला आपले तडफदार आणि पटेल असे भाषण तयार करावे लागते आणि या कालावधीतच अनेक मुद्दे मांडून त्यांची विशिष्टता स्पष्ट करावी लागते. सोबत आपला हावभाव, आपली बोलण्याची पद्धत, बोलण्याची गती, स्वरातील चढ उतार, यात सर्वच पारखले जाते. म्हणून पूर्ण तयारी नुसार आपण वक्तृत्व स्पर्धेसाठी सकारात्मक राहावे.
विषय:- जातीचं करायचं काय, निर्मूलन की व्यवस्थापन"..!
जो विषय दिला आहे त्या विषयाची माहिती असणे आवश्यक आहे. प्रश्नातील काही शब्दांचे अर्थ देखील माहिती असणे तितकेच महत्त्वाचे आहे..
प्रथम प्रश्नातील निर्मूलन आणि व्यवस्थापन याचा अर्थ घेऊ..!
निर्मूलन म्हणजे याला संबंधित गोष्टींना संपवून टाकणे.. जातीचं निर्मूलन.. म्हणजे जातीची प्रथा मुळात जातच नष्ट करणे.. तर व्यवस्थापन म्हणजे नक्की काय अर्थ होईल.. जातीचं व्यवस्थापन करणं की त्याची रीतसर व्यवस्था करणं होय...!
आणि मूळ विषयाच्या भाष्यावर बोलायचे झाल्यास मी खुद्द असं सांगेन की, साहजिकच जातीचं निर्मूलन झालं पाहिजे.. हे फक्त वाटतं.. पण असं होणार नाही याची कल्पना आहे आणि व्यवस्थापन केल्यास तूर्तास शांतता होईल पण पुन्हा जातीवरून आक्रोश हा येणारच.. पण मी बोलून काय होणार आहे.. माणूस जाती धर्माशी इतका खिळला गेला आहे की त्यातून तो बाहेर पडूच शकत नाही आणि दुसऱ्याला ही बाहेर येऊ देत नाही.. कारण ही नुसती जात नसून त्याचा स्वाभिमान, त्याची परंपरा, त्याची संस्कृती, त्याची जातीतील धार्मिक भावना, आणि अश्याच इतर गोष्टीही पणाला लावल्या गेल्या असतात.. ज्यामुळे त्याला जातीतून बाहेर पडायचं नाही.. बरं जातीचं निर्मूलन झालंच तर लोकांचा व्यवहार कसा असेल, कोणते सण, आणि कोणाचे सण कसे साजरे करतील कधी यावर विचार केला आपण?? नाही नं?? केला तरी यावर जात आडवी येईल की नाही??
काय तुम्हाला माहिते का!! की अगदी मुलीच्या घरच्यांनी त्यांच्याच जातीच्या मुलाशी लग्न करून दिलं.. आणि ती नववधू नवीन घरात जेव्हा प्रवेश करते तेव्हापासून ते ती पुर्णतः रुळेपर्यंत समजे पर्यंत तिला तिच्या सासरचे मंडळी सांगतात, की आमच्यायेथे अशी परंपरा आहे, तशी परंपरा आहे.. देवाला हाच नैवेद्य द्यावा लागतो , अश्याच पद्धतीचे जेवण बनवावे लागते, अश्याच पद्धतीच्या चपात्या कराव्या लागतात.. हे सर्व ती नववधू ऐकत असते, करतही असते..
मग एकाच जातीतील दोन वेगवेगळ्या घरात वेगवेगळी प्रथा कशी काय??
मग एकाच जातीतील विविध परंपरा असू शकतात तर अश्या तर बऱ्याच जाती आहेत.. त्या जातीचं निर्मूलन करणं म्हणजे त्यांच्या परंपरेला नष्ट करण्यासारखे होय ना!!
जातीचं निर्मूलन करणं हा विषय इथपर्यंतच थांबत नाही तर शैक्षणिक, करिअर तसेच व्यावहारिकतेवर देखील प्रभावी परिणाम दिसून येतात. आणि म्हणूनच जातीचं निर्मूलन व्हावं असे वाटते..
पण खंत..!
जातीचं व्यवस्थापन होऊ शकतं..!
पण त्यावर जर कठोर नियम लगावले गेले आणि वर्तमान तसेच भविष्यातही या नियमांचं उल्लंघन होणार नाही असे नियम बनवले गेले पाहिजे जेणेकरून जनता देखील संतुष्ट असेल..
कारण जातीचा पडदा हा कुणाच्या शिक्षणावर, कुणाच्या नोकरीवर येऊ नये..
जात ही एक समुदाय म्हणून मर्यादित ठेवून शिक्षण, नोकरी, इतर गरजा ह्या फक्त आणि फक्त गरजूंनाच मिळावी, आणि यासाठी जातीचं व्यवस्थापन योग्य पद्धतीत व्हावं.. असं वाटते.. आणि यामध्ये कोणतीही जात न पाहता आर्थिक परिस्थिती, सक्षम व्यक्ती पाहिल्यास नक्कीच जातीचं व्यवस्थापन होण्यास मदत मिळेल..!
वरील मजकुरमधील बाब ही मी स्वतः लिहिली आहे.. माझे स्वतःचे हे मत आहे..
यातून ही आपणास काही मुद्दे भेटत असतील तर उत्तमच... !
बाकी आपणास या विषयावर अनेक चर्चा, वादविवाद नेट वरून सहज उपलब्ध होतील.. त्यातूनही काही मुद्दे जमवून घ्या.. जेणेकरून वक्तृत्व स्पर्धेत मदत होईल..
☺️Stay positive 👍