Topic icon

औषधी वनस्पती

0
जंगलात सापडणारी नरभक्षक झुडपे (Carnivorous plants) ही किडे, छोटे प्राणी आणि अन्य पोषक तत्वे शोषून घेतात.

सर्वात प्रसिद्ध नरभक्षक वनस्पतींची काही उदाहरणे:

  • व्हीनस फ्लायट्रॅप (Venus Flytrap): ही वनस्पती कीटकांना पकडण्यासाठी आपले पाने वापरते. पाने hinged असतात आणि त्यांच्या कडांवर काटेरी केस असतात. जेव्हा एखादा कीटक पानांच्या आतल्या भागाला स्पर्श करतो, तेव्हा पाने झटकन बंद होतात आणि कीटक आत अडकतो. Britannica - Venus Flytrap
  • पिचर प्लांट (Pitcher Plant): या वनस्पतीमध्ये घड्याळासारखे (pitcher) आकार असलेले पाने असतात, ज्यात गोड वास असलेला रस असतो. कीटक या रसाकडे आकर्षित होतात आणि घरात शिरतात, परंतु गुळगुळीत पृष्ठभागामुळे ते बाहेर पडू शकत नाहीत आणि रसात बुडून मरतात. California Botanic Garden - Pitcher Plant
  • संड्यू (Sundew): या वनस्पतींच्या पानांवर चिकट द्रव असलेले तंबू असतात. कीटक या द्रवाकडे आकर्षित होतात आणि त्यावर चिकटून राहतात. त्यानंतर, संड्यू हळू हळू कीटकाला आपल्या पानात गुंडाळतो आणि पचवतो. Britannica - Sundew
  • ब्लॅडरवॉर्ट (Bladderwort): ही जलीय वनस्पती आहे आणि पाण्यामध्ये लहान bladder वापरून लहान जीवांना पकडते. US Fish & Wildlife Service - Bladderworts

या वनस्पती विशेषतः अशा ठिकाणी वाढतात जिथे मातीमध्ये पोषक तत्वांची कमतरता असते, त्यामुळे त्या कीटकांकडून आवश्यक पोषक तत्वे मिळवतात.

उत्तर लिहिले · 14/4/2025
कर्म · 980
0
आंबेहळद (Ambahalad) चे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
  • त्वचेसाठी फायदेशीर: आंबेहळद त्वचेसाठी खूपच फायदेशीर आहे. ती त्वचेला चमकदार बनवते आणि डाग कमी करते.
  • जखम आणि सूज कमी करते: आंबेहळदमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म (anti-inflammatory properties) असतात, त्यामुळे ती जखम आणि सूज कमी करण्यास मदत करते.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढवते: आंबेहळदमध्ये एंटीऑक्सीडेंट्स (antioxidants) भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
  • पचनासाठी उत्तम: आंबेहळद पचनक्रिया सुधारते आणि गॅस, अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम देते.
  • सांधेदुखीमध्ये आराम: आंबेहळद सांधेदुखी आणि संधिवाताच्या त्रासांना कमी करू शकते.

अधिक माहितीसाठी काही संदर्भ:

उत्तर लिहिले · 4/4/2025
कर्म · 980
3
थंडीच्या दिवसात आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या-मोठय़ा तक्रारींवरचा रामबाण उपाय आहे. गवती चहाला "पातीचा चहा" असे देखील म्हणतात. याला एक विशिष्ट सुगंध असतो.

१:) सर्दी, डोकेदुखी, अंगातली बारीक कणकण घालवण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय म्हणावा लागेल.

२:) घाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे. तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा दिला जातो. हा वाफारा घेतल्यास ताप झटक्यात कमी होतो आणि अंगदुखी थांबते.

३:) गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा अष्टमांश काढा घेतल्याने सर्दी-पडसे, थंडी वाजून ताप येणे आदी विकार नाहीसे होतात.

४:) गवती चहापासून तेलही काढतात. हे तेल संधिवात आणि वाताने अंग दुखण्यावर अत्यंत गुणकारी आहे.







उत्तर लिहिले · 24/4/2022
कर्म · 1850
0
अडुळसा कुल Adhatoda zeylanica Medic असून शास्त्रीय नांव (Adhatoda vasaka Nees)असे आहे. अडुळसा ही अ‍ॅकॅंथेसी कुलातील सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅधॅटोडा व्हॅसिकाआहे. भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशांत ती आढळते. ही वनस्पती महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने लावतात. अडुळसा सु. १.२-२.४ मी. उंच वाढते. पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फांदीच्या टोकास फुलोरा येतो. फुले पांढरट रंगाची असतात. फळ लांबट व टोकदार असते. अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे औषधांत वापरली जातात. कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर अडुळसा औषध मोठ्या प्रमाणावर वापरतात. साधारणपणे २००० वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात असावा, असे आयुर्वेदातील उल्लेखांवरून दिसते. अडुळशापासून आयुर्वेदीय पद्धतीने अनेक औषधे तयार केली गेली आहेत. पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो. त्याचा रस, मध, सुंठ, मिरी व पिंपळी यांचे मिश्रण कफ व कास यांवर देतात.पानांत वासिसाईन हे अल्कलोइद आणि अ‍ॅडॅथोडिक आम्ल असते. हृदयाच्या आजारांवरही या वनस्पतीचा उपयोग केला जातो.

सामान्य नावे : मराठी-अडुळसा, अडुसा, वासा वसाका,गुजराती.-अडसोगे, अडुसो, अर्डुसी, हिंदी.-अडाल्सो, अरूशो, वसाका, कानडी अडसला, अडुमुत्तडा, अडुसोगे, संस्कृत. सिंहिका, वसाका, अटरूष.

वर्णन : १.२ ते २.८ मी.उंचीचे दाट झुडुप, फांद्या एकमेकांविरूद्ध, वर जाणाऱ्या. पाने: १२-२० X ४-६ सें.मी. दीर्घवर्तुळाकार, कुंतसम. वरील पाने गर्द हिरवी खाली पांडूर.

फुले : कक्षस्थ कणिशात, फांद्यांच्या टोकांवर, पुष्पकोश नलिकाकृती, पांढरा, गुलाबी रेषांसहीत.

फळ : बोंड गदाकृती, अणकुचीदार, गोलाकार, आयताकृती, नलिकाकृती. फुल वेळ : ऑगस्ट-नोव्हेंबर.

अधिवास : बहुतेक ठिकाणी उत्पादित, काही ठिकाणी पडीत जागेत वाढते.

स्थान : महाराष्ट्र राज्यभर कुंपणांमध्ये, दाख्खन व कोकणात विपुल.

प्रसार : भारत, श्रीलंका, मलाया, दक्षिण-पूर्व आशिया.

उपयुक्त भाग : मूळे, पाने, फळे व फुले.



वर्णन

अडुळसा याची पाने मोठी भाल्याच्या आकारासारखी असतात. फळांना कवच असते. प्रत्येक फळामध्ये ४ बिया असतात. फुले पांढरी किंवा जांभळी असतात. अडूळशाचे मुळ स्थान भारत आहे.यात पांढरा व काळा अशा दोनजाती आहेत.यास पांढरी फुले येतात. झाड सुमारे २.५ ते ३ मीटर उंच वाढते.


गुणविशेष

मूळ गर्भ निष्क्रमणोपयोगी, उन्हाळे लागणे, श्वेतप्रदर यात मूळ उपयोगी आहे . झाड कडू जहाल, गारवा उत्पन्न करणारे. वातकारक, श्वासनलिकेच्या दाहात उपयोगी आहे . कुष्ठरोग, रक्ताचा अशुद्धपणा, हृदयविकार, तृषा, दमा, ताप, वांती, स्मृतीभ्रंश, कोड, क्षय, कावीळ, अर्बुद, मुखरोग यात उपयोगी (आयुर्वेद) आहे . मुळे मूत्रवर्धक, खोकला, दमा पितप्रकोपवांती, नेत्रविकार, ताप, परमा यात उपयोगी आहे ,आर्तवजनक फुले रक्ताभिसरण सुधारून उन्हाळ्या व कावीळ कमी करण्यासाठी उपपयोगी (युनानी) आहे .अडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधी साठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.आयुर्वेदानुसार खोकला,काविळ,दमा,श्वास,कफ,क्षय,त्रिदोष,मुख,मुत्रघात,सुज इत्यादी रोगांवर उपयुक्त आहे.


उपयोग

मूळे, पाने व फुले स्वदेशी औषधात सर्दी, कफ, श्वासनलिकेचा दाह आणि दम्यात उपयोगी आहे . पानांचा रस आले किंवा मधाबरोबर जुनाट श्वासनलिकेचा दाह व दमा यात गूणकारी आहे . वाळविलेली पाने सिगारेट बनवून दम्यात वापरतात. पानांचा रस अतिसार व आमांशात वापरतात. पानंची भुकटी दक्षिण भारतात हिवतापात वापरतात. पाने संधिवातात पोटीस म्हणून सांध्यावर तसेच सूज आणि तंत्रिकाशूलात वापरतात. क्षुद्र दर्जाच्या जीवांना पाने विषारी, पानांचा अल्कोहोलमध्ये बनविलेला अर्क माश्या , पिसू, गोम, डास व इतर किटकांना विषारी (वॅट). ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.आयुर्वेदात या वनस्पतीचा वापर खोकल्यावर होतो.याचे फुलांची भाजीही करतात.


उत्तर लिहिले · 20/2/2023
कर्म · 9415
1

कायम चूर्णाचे फायदे - कायम चूर्ण चे फयदे!
कायम चूर्ण हे बद्धकोष्ठतेसाठी वापरले जाणारे एक अतिशय लोकप्रिय आयुर्वेदिक औषध आहे. ही भुकटी तयार करण्यासाठी इतर अनेक औषधी वनस्पतींचा वापर केला जातो, ज्यात लिकोरिस, अजवाइन, सनयाची पाने, नीशोथ, काळा नमक आणि हरितकी यांचा समावेश होतो. यासोबतच त्यात मध्यम रेचक गुणधर्मही आहेत, त्यामुळे त्याचा वापर काही वेळा असुरक्षित होऊ शकतो. पण जर तुम्ही त्याचा नियमित आणि नियंत्रित वापर करत असाल तर त्याचेही अनेक फायदे आहेत. याचा वापर करून तुम्ही अनेक औषधी फायदे मिळवू शकता. हे फायदे मिळविण्यासाठी तुम्हाला त्याचा वापर योग्यरित्या समजून घेणे आवश्यक आहे. यामुळे नैसर्गिक पेरिस्टॅलिसिसशी संघर्ष करून रेचक सवयीचा विकास होऊ शकतो. या लेखाद्वारे आपण कायम चूर्णाचे फायदे पाहूया.

कायम चूर्णाचे उत्पादन-
कायम चूर्णाची मुख्य क्रिया त्याच्या मुख्य घटक सेन्ना पानांवर आधारित आहे, जी आतड्यांसंबंधी अस्तरांना उत्तेजित करते आणि परिणामी एक उत्तेजक रेचक परिणाम होतो. कायम चूर्णामध्ये शक्तिशाली रेचक गुणधर्म आहेत कारण त्यात पन्नास टक्के सनयाची पाने असतात. सनाची पाने रेचक, तुरट, कडू, उष्णता निर्माण करणारी, तीक्ष्ण, यकृत शक्तिवर्धक आणि पित्त स्राव वाढवणारी आहेत. सनायामुळे ओटीपोटात दुखणे किंवा पेटके येतात, त्यामुळे काळे मीठ, कॅरम सीड्स, स्वंजक्सारा (शुद्धीकरण) आणि ज्येष्ठमध त्यांच्या अँटी-स्पॅस्मोडिक कृतींमुळे हा प्रभाव कमी करण्यासाठी जोडले जातात.

कायम चूर्णाचे फायदे आणि औषधी उपयोग-
*कायम चुर्णामध्ये ५०% शेवग्याची पाने असतात, म्हणून ती एक उत्तेजक रेचक आणि दस्तावर पावडर आहे, जी दीर्घकालीन बद्धकोष्ठतेपासून लवकर आराम देते.
* पोटात गॅसचा त्रास असलेल्या लोकांसाठीही हे फायदेशीर आहे.
* गॅसच्या समस्येपासूनही आराम मिळतो.
* पोटदुखीची समस्याही दूर होते.
* डोकेदुखी देखील कमी होते.
*तसेच तोंडातील व्रण दूर करते.

डोस आणि
दिशा- तुम्ही कायम चूर्ण 3 ते 6 ग्रॅम (1 ते 2 चमचे) च्या डोसमध्ये रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. साइड इफेक्ट्स टाळण्यासाठी दिवसातून 6 ग्रॅमपेक्षा जास्त घेऊ नका. कायम चूर्ण हे गोळ्यांच्या स्वरूपातही उपलब्ध आहे. कॅम टॅब्लेटचे ब्रँड नाव आहे. कायम चूर्णाच्या गोळ्यांचा डोस बद्धकोष्ठतेच्या तीव्रतेनुसार 1 ते 2 गोळ्या आहे. सौम्य बद्धकोष्ठतेमध्ये, 1 टॅब्लेट पुरेसे असावे.

कायम चूर्ण वापरण्याची खबरदारी आणि दुष्परिणाम
* तुम्ही कायम चूर्णाचा नियमित वापर करू नये कारण त्यामुळे रेचक सवय होऊ शकते. ज्यामुळे बद्धकोष्ठता वाढू शकते किंवा इतर समस्या देखील उद्भवू शकतात.
* ओटीपोटात दुखणे किंवा पेटके असल्यास याचा वापर करू नका
* कायम चूर्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी वापरू नये. ते मुलांसाठी असुरक्षित आहे.
*गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपान करवताना कायम चूर्णाचा वापर टाळा. कारण कायम चूर्ण गर्भाशयाचे आकुंचन उत्तेजित करू शकते आणि गरोदरपणात रक्त किंवा त्यातील गरम सामर्थ्य सामग्रीमुळे ते उघडू शकते. त्यामुळे गर्भात चूर्ण वापरू नये.
* सतत पावडर अवलंबित्व होऊ शकते. अनेक दिवस कायम चूर्ण वापरल्यानंतर बद्धकोष्ठता आणि रेचक अवलंबित्वाची पुनरावृत्ती होण्याची तक्रार अनेकांनी केली आहे. आम्ही नियमितपणे कायम चूर्ण न वापरण्याची शिफारस करतो.
*अधूनमधून वापर करणे उपयुक्त ठरेल, परंतु तुम्ही आहारात बदल करावा. फायबर सामग्रीने समृद्ध आहार घ्या आणि तुमच्या नियमित आहारात 2 ते 3 भाज्या आणि 3 ते 4 भाज्यांचा समावेश करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कायम चूर्ण घेऊ नका.


उत्तर लिहिले · 21/1/2022
कर्म · 121765
0
बाभळीच्या झाडाचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
  • औषधी उपयोग: बाभळीच्या झाडाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो.
    • दात आणि हिरड्यांसाठी: बाभळीच्या सालीचा उपयोग दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बाभळीच्या दातूनने दात घासल्याने दात मजबूत होतात आणि हिरड्यांमधील रक्त येणे थांबते.
    • त्वचेसाठी: बाभळीच्या पानांचा लेप त्वचेवरील पुरळ आणि जखमांवर लावल्यास आराम मिळतो.
    • पोटाच्या विकारांवर: बाभळीच्या सालीचा काढा पोटाच्या विकारांवर गुणकारी असतो.
  • इतर उपयोग:
    • जळणासाठी: बाभळीचे लाकूड जळणासाठी उत्तम असते.
    • बांधकामासाठी: बाभळीचे लाकूड मजबूत असल्यामुळे ते बांधकाम आणि फर्निचरसाठी वापरले जाते.
    • पर्यावरणासाठी: बाभळीचे झाड वाळवंटी प्रदेशात जमिनीची धूप थांबवते आणि पर्यावरणाचे संतुलन राखते.

टीप: कोणत्याही औषधी उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

ॲग्रोवन: बाभळ लागवड माहिती
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
1






 
"चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या हलेना." कवी 'बी' यांनी म्हटले. असे कवना खुलविणारे झाड व नाजुक सुंदर फूल आपल्या विविध छटांनी आणि गुणांनी कठोर हृदयी पुरुषालाही आपल्याकडे मोहून घेते. असे हे कवींनी प्रेमाचे प्रतीक बनविलेले चाफ्याचे फूल.

    पिवळ्या धम्मक सोनेरी अंगाचा दरवळून टाकतो आसमंत सारा
चाफा देखील एक सुवासिक आणि औषधीयुक्त वनस्पती आहे यास चंपक असेही संबोधण्यात येते. पांढरा चाफा, लाल चाफा, हिरवाचाफा, सोनचाफा, नागचाफा, भुईचाफा, कवठोचाफा असे ७ प्रकार आढळतात. 
     चंपकाच्या विविध जाती प्राचीन कालापासून भारतात होत्या. अनेक साहित्यांत चाफ्याचा उल्लेख आढळतो नंतर पांढरा चाफा या फुलास सुगंध बेताचाच पण ग्रामकन्या, ग्रामस्त्रिया, वन्यस्त्रिया, ती फुले प्राचीन काळापासून वापरत असल्याचे आढळते. चाफ्याचा वृक्ष मध्यम उंचीचा व निसरडा असतो. त्याच्या सुंदर कलिकेची उपमा स्त्रियांच्या नाकास देण्यात येते. वृक्ष सदाहरित असल्याने आजही बागांतून तो मोठ्या प्रमाणावर लावतात. 
 
     चंपक पुष्प विशेष प्रसिद्धीस आले ते इ.स. १-२ शतकातील कुषाण काळात. शिल्पकृतीत व प्राचीन भारतीय चित्रकलेत चंपकाची चित्रे आढळतात अजिंठा लेण्याचे ७ वे दालन म्हणजे चंपकाच्या विविध जातीची माळच! नागचाफा अतिशय श्रेष्ठ. याची गणना जगातील सुंदर पुष्पात करतात. मोठ्या धवल पाकळ्या सुवर्णाशी साम्य असणारे पुंकेसराचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो, यापासून नागकेशर तयार केले जाते. म्हणूनच तो कामदेवाच्या पंचबाणातील एक आहे. हिरव्या चाफ्याची झुडपे असतात. फुले प्रथम हिरवी व जुनी झाल्यावर पिवळी होतात. सुगंधही खूप असतो. पांढऱ्या चाफ्यामध्ये दोन प्रकार असतात, १ ल्या प्रकारातील फुलाचा आतील भाग किंचित पिवळसर असतो, चाफ्याच्या लाल व पांढऱ्या फुलांना हलका सुगंध असून फुले उमलल्यावर दुसऱ्या प्रकारात फुले पांढरी स्वच्छ असून आकाराने जरा मोठी असतात या फुलांना भरपूर सुगंध असतो, ही फुले सहसा गळून पडत नाहीत तसेच या चाफ्याची पानेही गळत नाहीत. पाने हिरवीकंच, काळपट हिरवी व मोठ्या आकाराची असतात. एकाच वेळी भरपूर गर्द हिरवा पर्णसंभार आणि पांढरी स्वच्छ टपोरी व सुगंधी फुले गुच्छल रूपाने झाडावर असल्यामुळे उन्हाळ्यातही नितांत शोभिवंत दिसतो. चाफ्याचे औषधी उपयोग

१) चाफ्याची साल, मुळी, पाने, फुले एकत्र कुटून त्याचा मोहरीचे तेल व त्याच्या चार पट खोबऱ्याचे तेल मिसळून त्याचे मिश्रण तयार काढावा तेवढेच करावे याचा उपयोग सांधेदुखोवर, अंगदुखी, कंबरदुखीवर केल्यास आराम मिळतो.

२) गळू (टॉन्सिल) वर चाफ्याच्या झाडाचा चीक उपयोगी आहे. (३) चाफ्याची शेंग उगाळून लावल्यास सापाचे विषसुद्धा उतरते असे म्हणतात.
४) कोणत्याही कारणाने नाकात मास वाढले की त्याला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही परंतु चाफ्याच्या फुलांचा सतत वास घेतला आणि नाकात सैधवादी तेल आणि वचादी तेलाचे मिश्रण टाकल्यास मास नाहीसे होते. नाकात येणारा फोड (माळीण) फुलांच्या वासामुळे बरा होतो.

५) चाफ्याची फुले उत्तेजक, दाहनाशक आणि नेत्र ज्योतिवर्धक असतात. ६) चाफ्याच्या फुलांपासून अत्तर तयार करतात. ७) डोकेदुखीवर चाफ्याची पाने वाटून रस लावावा. चाफ्यालाही जागतिक बाजारपेठेत चांगली मागणी आहे.


उत्तर लिहिले · 11/12/2021
कर्म · 121765