Topic icon

मीठ

0
मला माफ करा, मला तुमचा प्रश्न समजला नाही.
उत्तर लिहिले · 19/8/2022
कर्म · 0
0




श्रावणी सोमवारच्या उपवासात मीठ न खाण्याचे ‘ आहे कारण

श्रावण महिन्यात कुणी आठवड्यातल्या एखाद्या दिवशी उपवास करतात तर काही जणांचा संपूर्ण महिनाभर उपवास असतो. काही जण खास करून सोमवार पाळतात. सोमवार हा शंकराचा वार म्हणून समजला जातो.

मग, शंकराला खूश करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहीत मुली उपवास करतात. विशेषत: श्रावणी सोमवारी यापैकी बहुतेक लोक मीठ खात नाहीत.

किंवा सैंधव मीठ खाणे पसंत करतात. * सैंधव मीठ जास्त गुणकारी – सामान्य पांढरे मीठ कृत्रिम आणि रासायनिक मिश्रित मीठ असल्याचे मानले जाते.


हेच कारण आहे की उपवासाच्या पदार्थांत साधे मीठ न वापरता सैंधव मीठ वापरले जाते. कारण ते अधिक शुद्ध आणि गुणकारी असते. तसेच उपवासादरम्यान तुम्हाला हलके अन्न खावे लागते.

त्यामुळे मीठ नसेल तर ते अन्न शरीरास हलके फुलके वाटते. सैंधव मीठ हे केवळ अन्न हलकेच करते असे नाही परंतु त्यामध्ये असणारे थंड गुणधर्म मनुष्यास शक्ती प्रदान करतात.

* सैंधव मीठ आरोग्यवर्धक आहे आयुर्वेदात हे मीठ आरोग्यासाठी सर्वात चांगले मीठ मानले जाते. हे मीठ तीन प्रकारचे दोष – कफ, वात आणि पित्त शांत करते. फारच कमी लोकांना माहित आहे की या मीठामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि झिंक आदी घटक असतात.


उत्तर लिहिले · 6/6/2022
कर्म · 53720
0

समुद्रामध्ये अंदाजे 3.5% मीठ आहे, म्हणजे प्रत्येक लिटर पाण्यामध्ये 35 ग्रॅम मीठ असते.

मीठाचे प्रमाण खालील गोष्टींवर अवलंबून असते:

  • पाण्याचे बाष्पीभवन
  • नद्यांद्वारे समुद्रात येणारे गोडे पाणी
  • समुद्रातील बर्फाचे प्रमाण

उदाहरणार्थ:

  • लाल समुद्रात (Red Sea) 4% पर्यंत मीठ आढळते.
  • बाल्टिक समुद्रात (Baltic Sea) फक्त 0.5% मीठ आढळते.

स्रोत: USGS

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
1
मीठ कुठे तयार होते आणि ते कसे तयार करतात



माझा जन्म हा रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील एका खेड्यात झाला

मिठागरात मीठ पिकवणे हा तेथील मुख्य व्यवसाय होता

माझे बालपण त्याच परिसरातील असल्याने या प्रश्नाचे उत्तर मी व्यवस्थितपणे देऊ शकतो

माझे आजोबा हे या क्षेत्रातील गावठी इंजिनिअर त्यांचे नाव बळवंत आलोजी कडू त्याना सर्व बाळ्यामामा असे म्हणत रायगड जिल्ह्यातील 75 % मिठागरे ही त्यांच्या देखरेखीखाली झाली आहेत

हा कालखंड होता 19 व्या शतकाच्या अखेरचा आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीचा

मिठागर तयार करण्याचे एक शास्त्र होते

वार्‍याची दीशा आणि एकूण क्षेत्र याचा विचार करून आखणी करावी लागायची त्याकाळी साधन सामुग्री अशी काहीच नव्हती

मोजणीसाठी बांबूची काठी असायची त्यावर खूणा करून हे सर्व कामकाज चालायचे

आता मीठ उत्पादन कसे व्हायचे त्याची माहिती

मिठागराचे चार भाग असायचे पहिला वळण दुसरा तापवणी तिसरा कोंडी आणि चौथा मीठ ठेवण्यासाठी बांध

भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी पहिल्यांदा एका साधारण तीन फूट खोलीच्या लांब रूंद तळ्यात घ्यायचे याला वळण असे म्हणतात

यात उत्कृष्ट अशी तुडतूडी कोळंबी मिळायची

साधारण 15 ते 20 दिवसांनी बाष्पीभवन होऊन ते आणखी खारट झाल्यावर

तापवणीत घेतले जायचे ही साधारण एक ते दीड फूट खोल आणि लांबलचक असायची

हे पाणी बाष्पीभवन होऊन अधिक खारट बनायचे काही दिवसांनी ते पाणी कोंडीमध्ये घेतले जायचे

कोंडी ही साधारण एक फूट खोल 15 फूट रूद आणि 30 फूट लांब असते

या अतिखारट पाण्याचे आणखी बाष्पीभवन होउन काही दिवसांनी मिठाचे खडे स्पष्टपणे दिसतात

ते फळीच्या सहाय्याने बाहेर ओढले जाते

या फळीला लवटाणा असे म्हणतात

त्यानंतर दोन दिवसांनी मीठ डोक्यावर वाहून बांधावर टाकून राशी करतात

नंतर जशी मागणी असेल तसे विकले जायचे

विक्रीदर ऐकून तुम्हाला धक्का बसेल 1 नवा पैसा किलो हा 60 आणि 70 च्या दशकातील दर

त्यानंतर या सर्व मिठागराच्या जमिनी JNPT बंदरासाठी 80 च्या दशकात भूसंपादन करण्यात आल्या

या सर्व जमिनी केंद्र सरकारच्या मालकीच्या असल्याने त्या स्थानिकांनी भाडे पट्टयाने घेतल्या होत्या त्यामुळे मोबदला मिळाला नाही

भूमिपुत्र सुप्रिम कोर्टापर्यंत लढा देऊन हारले

उत्तर लिहिले · 6/1/2022
कर्म · 121765
1
मिठ, तिखटचा जास्त वापर न करता चविष्ट पदार्थ तयार करणे शक्य आहे का? होय, अगदी बरोबर आहे. मिठाचा वापर न करता अथवा जास्त प्रमाणात तिखट मसाल्यांचा वापर न करता आपण चविष्ट पदार्थ च काय पूरक जेवण बनवू शकतो.. म्हणजेच रोजचा आहार हा अप्रतिम, स्वादिष्ट आणि तब्येतीस पूरक असा आरोग्यपूर्ण बिन मिठाचा तसेच कमी तिखटा चा बनवू शकतो..
होय, अगदी बरोबर आहे. मिठाचा वापर न करता अथवा जास्त प्रमाणात तिखट मसाल्यांचा वापर न करता आपण चविष्ट पदार्थ च काय पूरक जेवण बनवू शकतो..

म्हणजेच रोजचा आहार हा अप्रतिम, स्वादिष्ट आणि तब्येतीस पूरक असा आरोग्यपूर्ण बिन मिठाचा तसेच कमी तिखटा चा बनवू शकतो..

उदाहरणार्थ: सकाळचा उपमा असो की पोहे, दुपारचे जेवण किंव्हा रात्रीचे कोणताही पदार्थ अथवा संपूर्ण आहार हा निःसंकोचपणे मीठ आणि तिखट यांचा अती वापर न करता. किंव्हा असेही म्हणता येईल बिगर मिठाचा, मिठाचा जराही उपयोग न करता सुद्धा जेवण हे अप्रतिम, चविष्ट आणि रुचकर असे तयार होते..

आता तुम्ही म्हणाल की कसे शक्य आहे?

तर गंमत अशी की, भाजीपाल्यामध्ये नैसर्गिक आपली चव असतेच. त्यात भर पडते ती खमंग अश्या भारतीय मसाल्यांची.. हळद, जिरे, मोहरी कांदे, लसूण, आले इत्यादी…

त्यामुळे चवीसाठी वेगळे अशी मिठाची गरज लागत नाही..

मसाले आपण आपल्या गरजेनुसार कमी अधिक वापरू शकतो.

मिठ म्हणजे एक प्रकारचे स्लो पॉईसन असे म्हणू शकतो. त्या मध्ये सोडियम तसेच क्लोरीन सारखे विषारी तत्व असतात..

जेव्हा इंग्रज भारतात होते तेव्हा भारतीयांस त्यांनी चहा आणि पांढरे मिठ यांचा वापर करण्यास भाग पाडले..आणि त्याची आपणांस सवय लागली..

परंतु हेच विषारी घटक मनुष्यास आतून पोखरत गेले आणि आरोग्याची हानी करत गेले..

त्यामुळे, मिठा सारख्या विषारी घटकाचा आहारात समावेश न करता, आरोग्यपूर्ण आहार घेणे हे केव्हाही चांगले..त्यामुळे निदान आपले आरोग्य तरी ठणठणीत राहील आणि आपण सर्व रोगराई पासून बरेच लांब राहू…

….
उत्तर लिहिले · 23/12/2021
कर्म · 121765
0
श्रा. अ] आमच्यामध्ये वेगळं कोण ? 17] मीठ, सोडा, कापूर, मोरचूद
उत्तर लिहिले · 26/7/2022
कर्म · 0
1
मी इथे स्थायू आहे.
उत्तर लिहिले · 5/10/2021
कर्म · 20