शब्द निबंध

राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि वसतिगृह चळवळ निबंध 500 शब्द?

1 उत्तर
1 answers

राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि वसतिगृह चळवळ निबंध 500 शब्द?

0
                राजर्षी छत्रपती शाहू महाराज

राजर्षी छत्रपती शाहू महाराज दीनदुबळ्या रयतेसाठी सत्ता राबवणारा हा लोकराजा-लोकनायक. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शाहूराजांनी आपल्या संस्थानात अनेक सामाजिक सुधारणा घडवल्या. ध्येयधोरणे आखून विकासासाठी त्यांनी सत्ता राबवली.स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवरायांचे वंशज असणाऱ्या कोल्हापूरच्या या गादीवरील या राजाने सुराज्य आणण्यासाठी प्रयत्न केले आणि ते प्रत्यक्षात आणलेदेखील! राजा म्हटले की, ऐषोराम करणाऱ्या सत्तांधांची प्रतिमा नजरेसमोर येते.

गाद्यागिद्यवर लोळणाऱ्या राजांपेक्षा शाहूराजांनी आपल्या गादीची ताकद जनसामान्यांसाठी खर्ची घातली, पणाला लावली. या द्रष्ट्या राजर्षीच्या कर्तृत्वाची ओळख आपण करून घेऊ. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 1874 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे असे होते. यांचा वडिलांचे नाव जयसिंगराव व आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1848 रोजी 10 वर्षीय यशवंतरावांना दत्तक घेतले. त्यांचे नाव शाहू असे ठेवण्यात आले 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. छत्रपती राजर्षी शाहू महाराजे हे वयाच्या 20 वा वर्षी कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले.
धारवाड येथे इतिहास, व रघुनाथराव महाराजांचा विवाह कन्या लक्ष्मीबाई छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षण राजकोटव झाले. विद्यार्थीदशेने असताना त्यांनी इंग्रजी, संस्कृत राज्यशास्त्र इत्यादी विषयांचा अभास केला.
सर फ्रेझर सबनीस यांसारखे गुरु त्यांना मिळाले. छत्रपती शाहू बडोद्याचा गुणाजीराव खानविलकर यांच्या यांच्याशी 1891 मध्ये झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे व राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या. 

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी समाजाचा सर्वांगीण समाजामध्ये शिक्षणाचा विकासासाठी प्रयत्न केले त्यांनी प्रसार करण्यावर विषेश भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी राजाज्ञा काढली जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना 1 रुपये दंड आकारव्याची कायदेशीर तरतूद केली.

मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी कोल्हापूर येथे संस्थात 6 जुलै 1902 रोजी मागासवर्गीयांना 50 टक्के जागा राखीव राहतील अशी घोषणा केली व त्वरित अंमलबजावणी करून मागासवर्गीयांना प्रगतीच्या प्रवाहात आणले. विहिरी, पाणवठे, इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात नावाखाली देवांना मुले-मुली वाहण्याची आपल्या कोल्हापूर संस्थानामधे करून ही पद्धत बंद पाडली त्यांनी समानतेने वागवावे काढला त्याकाळी धर्माचा प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी जोगला-मुरळी प्रतिबंधक कायदा जातीभेदाचे प्रस्थ नष्ट व्हावे म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली.1977 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवून दिली. जातिव्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमातीच्या, लोकांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी ब्रिटीशकालीन हजेरी पद्धत बंद करून त्यांना कोल्हापूर संस्थानात नोकऱ्या दिल्या.

त्यांना घरे बांधून दिली वणवण भटकणाऱ्या लोकांची राहण्याची व पोटापाण्याची सोय करून दिली. गुन्हेगार पासून मुक्त होऊन त्या लोकांना समाजामध्ये माणूस म्हणून सन्मानाने वावरता येऊ लागले. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची 1991 मधे भेट झाली ती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचाशी महाराजांनी आंबेडकरांचा मुकनायक या वृत्तपत्रास व आंबेडकरांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्ष बास अर्थसहाय्य केले.सामाजिक सुधारणांबरोबरच शाहू महाराजांनी शेती व उद्योगधंद्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी अनेक कृषि व औद्योगिक प्रदर्शने भरवली. कृषि उत्पादनांसाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळेच कोल्हापूर ही गुळाची बाजार पेठ जगभर प्रसिद्ध पावली शाहू महाराजांनी पाया रचून ‘शाहू मिल’ची स्थापना करून चालना दिली.कृषी क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी अनेक धरणे बांधली. छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक कार्याबरोबरच संगीत नाट्य, चित्रकला, मुल्लविद्या यांसारख्या कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली.
त्यांनी अनेक नाटल कंपन्या व गुणी कलावंतांना आश्रय दिला बालगंधर्व व केशवराव भोसले यांसारखे थोर महाराष्ट्राला दिले. मल्लविदच्या प्रांतात शाहू महाराजांनी संस्थानासह सर्व देशातील मल्लांना उदार आखाजाच्या धर्तीवर त्यांनी खासबाग हे कुस्तीचे मैदान बांधून कोल्हापूर ही मल्लविधेची पंढरी बनवली छत्रपती शाहू महाराजांचा आवडीचा छंद म्हणजे शिकार करणे होय.शाहूंचा पट्टीचा शिकारी म्हणून लौकीक होता. छत्रपती शाहू महाराजांच्या कार्यामुळे त्यांची दालनांचा उद्धारक व रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली.
शाहू महा राजांचा सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षेत्रिय सभेने त्यांना राजर्षी ही पदवी बहाल केली. अशा या थोर लोकराजा, दलित-पतितांचा उद्धारक छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा वयाच्या 48 व्या वर्षी म्हणजे 6 मे 1922 रोजी मुंबई येथे हृदयविकाराने मृत्यू झाला.


                         वसतिगृह चळवळ 


वसतिगृहांची आवश्यकता

शाहू महाराजांच्या १९०२च्या राखीव जागांच्या जाहीरनाम्याचा धिक्कार करतानो लो. टिळकांच्या केसरी'ने असेही म्हटले होते की, 'हा जाहीरनामा केवळ ब्राह्मणांना धक्का देणारा नाही तर संस्थानच्या हितकत्यांनाही धक्का देणारा आहे. शिवाय महाराजांनी यापूर्वी तेली, तांबोळी, मुसलमान, लिंगायत यांना शिक्षण देण्याचा कधी प्रयत्न केला होता असे ऐकिवात नाही. ज्या तेली, तांबोळी, मुसलमानादी मागासलेल्या समाजांसाठी महाराजांनी आपल्या प्रशासनातील ५० टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत, त्यांच्यातील विद्येच्या प्रसारासाठी त्यांनी काही प्रयत्न केलेले नाहीत, असे म्हणून लोकमान्यांनी त्यांना डिवचले होते. लोकमान्यांना काय कल्पना की, हा राजा आपले येथून पुढचे सर्व आयुष्य मागासलेल्या समाजाच्या अभ्युदयासाठीच खर्च करणार आहे!

मागासलेल्या समाजात एकूण शिक्षणाविषयीच मोठी अनास्था होती, मग उच्च शिक्षणाविषयी तर बोलावयासच नको, त्यातूनही प्रतिकूल परिस्थितीशी झगडून काहींनी उच्च शिक्षण घेतले तर त्यांना ब्राह्मण नोकरशाहीकडून प्रशासनिक नोकल्यांत उपेक्षित ठेवले जात असे, तेव्हा उच्च शिक्षण घेऊनही त्याचा काही उपयोग होत नाही, ही वस्तुस्थिती मागासलेल्या समाजास नाउमेद करणारी होती. म्हणूनच महाराजांनी या भावनेची अचूक नोंद घेऊन प्रथम आपल्या राज्यातील नोकऱ्यांत त्याच्यासाठी ५० टक्के राखीव जागाची सुविधा निर्माण केली होती. महाराजांचा असा होरा होता की, अशा प्रकारे उच्च शिक्षणाची पारितोषिके मागासलेल्या व्यक्तींच्या पदरात पडू शकतात, ही जाणीव होताच उच्च शिक्षण घेण्याविषयीची त्याची उमेद वाढीस लागेल. त्यांचा हा होरा अवतीभोवतीच्या समाजाच्या निरीक्षणातून तयार झाला होता आणि तो चुकीचाही नव्हता.

मागासलेल्या समाजात उच्च शिक्षणाविषयी आस्था निर्माण करण्याची आणखी एक महत्त्वाची उपाययोजना होती आणि ती म्हणजे असे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरीब विद्यार्थ्यासाठी त्यांच्या राहण्या जेवण्याच्या सोयीसाठी वसतिगृह निर्माण करणे, या उपाययोजनेतील पहिला टप्पा उपरोक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वीच महाराजांनी सुरू केला होता है पाहिले की, त्याच्या डोक्यात मागासलेल्या समाजाच्या अभ्युदयासाठी एकाच वेळी अनेक विचार कसे चालू होते, याची कल्पना येते. वास्तविक १८९६ मध्येच कोल्हापुरात उच्च शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यासाठी दरबारच्या खर्चाने एकै वसतिगृह स्थापन केले गेले होते. असि. जज्ज व्ही. बी. गोखले हे त्याचे अध्यक्ष होते. वसतिगृहाची सर्व

व्यवस्था ब्राह्मण मंडळीकडेच असल्याने एकाही ब्राह्मणेतर मुलास तेथे प्रवेश दिला जात नव्हता, शैक्षणिक सुविधाची मक्तेदारी ब्राह्मण वर्गच उपभोगत होता, कारण शिक्षण हे क्षेत्र आपल्याच मक्तेदारीचे आहे, अशी

त्यांची मनोभूमिका होती. कोल्हापूर संस्थानात बहुसंख्य मराठा समाज होता. संस्थानही 'मराठ्याचे समजले जात होते; पण मराठे मात्र इतर समाजांसारखेच विद्येत मागासलेले राहिले होते. खेड्यामध्ये असलेल्या या मराठा समाजात चार-दोन घरंदाज पाटलांची घरे सांपत्तिकदृष्ट्या बरी असत; पण त्यांच्याही ठिकाणी शिक्षणाची गोडी नसे, आपल्या मुलास कोल्हापुरास उच्च शिक्षणासाठी पाठवावे, अशी आच मराठा आई-बापांच्या ठिकाणी उत्पन्न होत नव्हती. याला महत्त्वाचे कारण मुलास कोल्हापुरात पाठवायचे तर त्याच्या राहण्या- जेवण्याची सोय कुठे करायची, हा सर्वात मोठा प्रश्न त्याच्यासमोर असे. आज अनेक वसतिगृहांनी गजबजलेल्या शहराकडे पाहून या प्रश्नाचे महत्व आपल्या लक्षात येणार नाही; पण शंभर वर्षापूर्वीची समाजस्थिती पाहिल्यास या प्रश्नाचे गांभीर्य ध्यानी येते.

१८९९ मधील गोष्ट. शाहू महाराजांनी वर्तमानपत्रात बातमी वाचली की, वडगावच्या चिमाजी पाटलाचा मुलगा पांडुरंग मॅट्रिकची परीक्षा पास झाला आहे! त्या काळी बहुजन समाजातील मुलगा मॅट्रिक होणे ही मोठी नवलाईची गोष्ट होती, या बातमीने महाराजांना मोठा जानंद झाला. त्यांनी तातडीने स्वार पाठवून त्या मुलास (पी.सी. पाटलांना) पन्हाळ्यावर बोलावून घेतले. त्याचे तोंड भरून कौतुक केले आणि कोल्हापुरातील त्यांच्या राहण्या- जेवणाच्या व्यवस्थेची चौकशी केली, तेव्हा पाटलांनी सांगितले, 'शहरात मराठ्यांच्या खानावळी नाहीत; फक्त ब्राह्मणांच्या आहेत. त्या खानावळींचा दरमहाचा दर पाच रुपये असतो. शिवाय मराठ्यांना आपल्या पत्रावळी आपणच उचलाव्या लागतात, म्हणून मी ब्राह्मणाच्या खानावळीचा नाद सोडला आणि एका ओळखीच्या मराठ्याकडे महिना साडेतीन रुपये देऊन जेवणाची सोय केली होती."

"तेथे अभ्यास करण्यास तरी जागा होती का?" महाराज. "त्यांच्या घरात जागा कमी होती, म्हणून हायस्कूलजवळ सरकारी तालीम आहे, तेथे मामा जाधव, बळीबा पाटील, हरीबा पाटील, हिंदुराव घाटगे वगैरे पाच-सहाजणांनी तालीम मास्तरांच्या परवानगीने रात्री अभ्यासाची व

झोपण्याची व्यवस्था केली होती. त्यांच्याबरोबर मीही होतो. पाटील खेड्यातील मराठा समाजातील 'गावचा राजा' समजल्या गेलेल्या पाटील घराण्यातील मुलाची ही कथा तर इतर मागासलेल्या जातींची अवस्था कशी असू शकेल, याची आपण कल्पना करू शकतो. महाराजांच्या डोक्यातील विचारच वेगाने फिरू लागली. तुमच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था मी करतो, असे आश्वासन त्यांनी पी. सौ. पाटलांना दिलेच; पण ते तेथेच थांबले नाहीत. पाटील पुढे सांगतात की, दुसऱ्याच दिवशी रावसाहेब दाजीराव विचारे, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आणि रावसाहेब भास्करराव जाधव, असि सरसुभे या दोन मराठा अधिकान्यांना बोलावून मराठा विद्यायांसाठी एक वसतिगृहव्यवस्था ब्राह्मण मंडळीकडेच असल्याने एकाही ब्राह्मणेतर मुलास तेथे प्रवेश दिला जात नव्हता. शैक्षणिक सुविधांची मक्तेदारी ब्राह्मण वर्गच उपभोगत होता, कारण 'शिक्षण हे क्षेत्र आपल्याच मक्तेदारीचे आहे, अशी त्यांची मनोभूमिका होती. कोल्हापूर संस्थानात बहुसंख्य मराठा समाज होता. संस्थानही वसतिगृहाची (व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग) अधिकृतपणे स्थापना होण्यापूर्वी मुंबई इलाख्यात फक्त मोठमोठ्या कॉलेजला जोडून क्लब्ज (हॉटेल्स) असत; पण एखादया जातीने किया धर्मपंथाने चालविलेले वसतिगृह महाराष्ट्रात तरी अस्तित्वात नव्हते. सध्या पुण्यासारख्या शहरात जी एक दोन अनाथ वसतिगृहे आहेत, तीसुद्धा त्या वेळी नव्हती. या दृष्टीने शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी वसतिगृहांची विशेषतः निरनिराळ्या जातींनी आपापल्या जातीतील विद्यार्थ्यांची राहण्याची जबाबदारी घेऊन त्याच्यासाठी कमी खर्चात वसतिगृहे स्थापन करण्याची ही अभूतपूर्व कल्पना शाहू महाराजांचीच होती, असे म्हटले पाहिजे. कालौघात महाराजांनी ५५० रुपयांचे वार्षिक अनुदान, २ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळेल इतका जमीनजुमला आणि ४७ हजार रुपयांची स्थायी देणगी अशी अनुदाने देऊन मराठा वसतिगृहांचा पाया मजबूत केला.

याच वर्षी म्हणजे १९०९ मध्ये जैन बोर्डिंग'ची स्थापना केली गेली. त्यानंतर लिंगायत, मुस्लीम, अस्पृश्य, सोनार, शिंपी, पांचाळ, गौड सारस्वत, इंडियन खिश्चन, चा. का. प्रभू, वैश्य, दोर चांभार, सुतार, नाभिक, सोमवंशीय आर्यक्षत्रिय, कोष्टी अशा विविध जातिधमांची २० वसतिगृहे महाराजांच्या प्रेरणेने व साह्याने स्थापन केली गेली. प्रत्येक वसतिगृहास इमारती, खुल्या जागा कायमस्वरूपी उत्पन्नाची साधने उपलब्ध करून देऊन गॅरीब विद्यार्थ्यांच्या योगक्षेमाची चोख व्यवस्था केली गेली. वसतिगृह चळवळीतील तंत्र व प्रयोग

"वसतिगृह' हा शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग होता. त्याचे एके तंत्रच त्यांनी विकसित केले होते, असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. मनात आले की, सरकारी अधिकान्यांना हुकूम करून वसतिगृह स्थापन केले, असे त्यांनी केले नाही. ज्या जातीसाठी वसतिगृह स्थापन करायचे, त्या जातीतील पुढारी अथवा प्रतिष्ठित लोकांशी ते अशी युक्तीने संपर्क वाढवीत की, त्यांना आपल्या जातीच्या अभ्युदयासाठी काहीतरी करावयास हवे, अशी भावना त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होई आणि नंतर मग त्यांना त्यांच्या जातीतल्या मुलांसाठी वसतिगृह स्थापण्यास ते उद्युक्त करीत महाराज स्वतः कधीच त्याचे पुढारीपण करीत नसत. प्रत्येक जातीत त्या त्या जातीचे पुढारी तयार व्हावेत, यावर त्यांचा कटाक्ष असे. अशी पुढारी मंडळी एकत्र होऊन, वसतिगृहाची कल्पना घेऊन महाराजाकडे येत. तेव्हा ते त्यांच्या प्रयत्नास प्रोत्साहन देऊन सर्व प्रकारची मदत करीत असत. असे करण्यात लोकांचा सहभाग त्यांना महत्वाचा वाटत होता, तसेच त्या त्या जातीतल्या लोकांना आपण आपल्या जातीसाठी काहीतरी केल्याचे समाधान मिळत होते. अशा प्रकारे वसतिगृह' ही केवळ कोल्हापूरच्या राजाची चळवळ न बनता ती लोकचळवळ बनू शकली. परिणामी, तिचा प्रसार कोल्हापूर संस्थानच्या बाहेरही सर्व महाराष्ट्रात होऊ शकला.

अस्पृश्य समाजाविषयी मात्र शाहूंनी वेगळी वाट चोखळलेली दिसते. सर्वार्थाने उपेक्षित असलेल्या या समाजात शिक्षणाविषयी तळमळ बाळगून'मराठयाचे समजले जात होते; पण मराठे मात्र इतर समाजांसारखेच विद्येत मागासलेले राहिले होते. खेड्यामध्ये असलेल्या या मराठा समाजात चार-दोन घरंदाज पाटलांची घरे सांपत्तिकदृष्ट्या बरी असत; पण त्यांच्याही ठिकाणी शिक्षणाची गोडी नसे. आपल्या मुलास कोल्हापुरास उच्च शिक्षणासाठी पाठवावे, अशी आच मराठा आई-बापाच्या ठिकाणी उत्पन्न होत नव्हती. याला महत्वाचे कारण मुलास कोल्हापुरात पाठवायचे तर त्याच्या राहण्या- जेवण्याची सोय कुठे करायची, हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असे. आज अनेक वसतिगृहांनी गजबजलेल्या शहराकडे पाहून या प्रश्नाचे महत्त्व आपल्या लक्षात येणार नाही; पण शंभर वर्षापूर्वीची समाजस्थिती पाहिल्यास या प्रश्नाचे गांभीर्य ध्यानी येते.

१८९९ मधील गोष्ट. शाहू महाराजांनी वर्तमानपत्रात बातमी वाचली की, वडगावच्या चिमाजी पाटलांचा मुलगा पांडुरंग मॅट्रिकची परीक्षा पास झाला आहे त्या काळी बहुजन समाजातील मुलगा मॅट्रिक होणे ही मोठी नवलाईची गोष्ट होती, या बातमीने महाराजांना मोठा आनंद झाला. त्यांनी तातडीने स्वार पाठवून त्या मुलास (पी.सी. पाटलांना) पन्हाळ्यावर बोलावून घेतले. त्यांचे तोंड भरून कौतुक केले आणि कोल्हापुरातील त्यांच्या राहण्या- जेवणाच्या व्यवस्थेची चौकशी केली, तेव्हा पाटलांनी सांगितले, शहरात मराठ्यांच्या खानावळी नाहीत; फक्त ब्राह्मणांच्या आहेत. त्या खानावळीचा दरमहाचा दर पाच रुपये असतो, शिवाय मराठ्यांना आपल्या पत्रावळी आपणच उचलाव्या लागतात, म्हणून मी ब्राह्मणाच्या खानावळीचा नाद सोडला आणि एका ओळखीच्या मराठ्याकडे महिना साडेतीन रुपये देऊन जेवणाची सोय केली होती. "

"तेथे अभ्यास करण्यास तरी जागा होती का?" महाराज. "त्यांच्या घरात जागा कमी होती, म्हणून हायस्कूलजवळ सरकारी तालीम आहे, तेथे मामा जाधव, बळीचा पाटील, हरीबा पाटील, हिंदुराव घाटगे वगैरे पाच सहाजणांनी तालीम मास्तरांच्या परवानगीने रात्री अभ्यासाची व

झोपण्याची व्यवस्था केली होती. त्यांच्याबरोबर मीही होतो." पाटील खेड्यातील मराठा समाजातील गावचा राजा समजल्या गेलेल्या पाटील घराण्यातील मुलाची ही कथा तर इतर मागासलेल्या जातीची अवस्था कशी असू शकेल, याची आपण कल्पना करू शकतो. महाराजांच्या डोक्यातील विचारचक्रे वेगाने फिरू लागली. तुमच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था मी करतो, असे आश्वासन त्यानी पी. सौ. पाटलांना दिलेच पण ते तेथेच थाबले नाहीत. पाटील पुढे सांगतात की, दुसऱ्याच दिवशी रावसाहेब दाजीराव विचारे, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर आणि रावसाहेब भास्करराव जाधव, असि सरसुभे या दोन मराठा अधिकाऱ्यांना बोलावून मराठा विद्यार्थांसाठी एक वसतिगृह

काढण्याचा त्याचा विचारविनिमय सुरू झाला. !

व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग पहिले वसतिगृह

विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे वसतिगृह स्थापन करण्याच्या संदर्भात शाहू महाराजांनी पुण्यातील न्या. रानडे व नामदार गोखले या दोन उदारमतवादी नेत्यांशीही विचारविनिमय केला होता आणि त्या दोघांनीही महाराजांची कल्पना उचलून धरली होती. महाराजांनी गाईल्स या मुंबई इलाख्याच्या शिक्षण खात्याच्या संचालकांशीही या बाबतीत पत्रव्यवहार केला होता व त्यांचेही मत अजमावले होते. महाराजांना पाठविलेल्या पत्रात गाईल्ससाहेब म्हणतात, 'महाराजांचे पत्र आल्यामुळे मला परमानंद झाला. मराठ्यांकरता जेवणा-खाण्याची सोय असलेल्या शाळेच्या प्रश्नावर आपल्याशी चर्चा करायला मला आनंदच होईल. शिक्षणाच्या दृष्टीने मराठ्यांना पुढे आणण्यासाठी असे विशेष प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. या बाबतीत मी आपल्याशी सहमत आहे. मराठ्यांच्या सवयी आणि भावना या उच्च शिक्षण घेण्याच्या बाबतीत प्रतिकूल आहेत. यास्तव ब्राह्मणांशी तुलना करता ते शिक्षणात बरेच मागे पडलेले आहेत. मी जेव्हा कोल्हापूरला भेट दिली, तेव्हा मला असे आढळून आले की, शिक्षण खात्यात नोकरीसाठी येणाऱ्या अर्जात मराठ्यांचे अर्ज क्वचित आढळतात. इतर खात्यांतही तीच परिस्थिती आहे (१० ऑगस्ट, १९००).

समाजातील अनेक विचारवंतांशी असा विचारविनिमय चालू असतानाच शाहू महाराजानी पन्हाळ्यावरील दत्त मंदिरात पी. सी. पाटलासह चार कॉलेज

विदयार्थ्यांची आपल्या खासगीतून राहण्या जेवणाची सोय करून 'मराठा वसतिगृह सुरु केले होते, पुढे ते कोल्हापूरला नेण्यात आले. लवकरच महाराजांचे काका दत्ताजीराव घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरातील प्रतिष्ठित मराठ्यांची सभा भरविली गेली आणि मामासाहेब खानविलकर, अप्पासाहेब म्हैसाळकर, भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, जिवाजीराव सावंत आदी प्रमुख मराठा व्यक्तींच्या सहकार्याने २८ एप्रिल १९०९ रोजी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' या कोल्हापुरातील पहिल्या वसतिगृहाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये विशेषतः जाधव, विचारे व सांवत या तीन तरुण मराठा कार्यकत्यांचा मोठा पुढाकार होता. पी. सी. पाटील हे या पहिल्या वसतिगृहाचे पहिले विद्यार्थी पुढे पुण्याच्या शेतकी महाविद्यालयाचे ते प्राचार्य झाले. अमेरिकेतील एम.एस्सी. आणि मुंबई विद्यापीठाची डी. एस्सी. या सन्माननीय पदव्यांनी विभूषित होऊन देशातील थोर कृषितज्ज्ञ म्हणून ते प्रसिद्धीस पावले. या वसतिगृहाचे नाव 'मराठा' असे जातिविशिष्ट ठेवले गेले असले तरी अगदी प्रारंभापासून मराठ्यांशिवाय मुसलमान, शिंपी, कोळी, माळी, गवळी अशा बहुजन समाजातील अन्य जातींच्या मुलानाही तेथे उदार आश्रय दिला जात होता. यातून मराठा समाजाच्या सर्वसमावेशकतेचाच प्रत्यय येत होता. अशा प्रकारच्या वसतिगृहाची कल्पना ही त्या काळी नावीन्यपूर्णच होती आणि तिचे जनकत्व महाराजांकडेच जात होते. डॉ. पी.सी. पाटील आपल्या आठवणी म्हणतात स्वतंत्र मराठा वसतिगृहाची (व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग) अधिकृतपणे स्थापना होण्यापूर्वी मुंबई इलाख्यात फक्त मोठमोठ्या कॉलेजला जोडून क्लब्ज (हॉटेल्स) असत; पण एखादया जातीने किया धर्मपंथाने चालविलेले वसतिगृह महाराष्ट्रात तरी अस्तित्वात नव्हते. सध्या पुण्यासारख्या शहरात जी एक दोन अनाथ वसतिगृहे आहेत, तीसुद्धा त्या वेळी नव्हती. या दृष्टीने शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी वसतिगृहांची विशेषतः निरनिराळ्या जातींनी आपापल्या जातीतील विद्यार्थ्यांची राहण्याची जबाबदारी घेऊन त्याच्यासाठी कमी खर्चात वसतिगृहे स्थापन करण्याची ही अभूतपूर्व कल्पना शाहू महाराजांचीच होती, असे म्हटले पाहिजे. कालौघात महाराजांनी ५५० रुपयांचे वार्षिक अनुदान, २ हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळेल इतका जमीनजुमला आणि ४७ हजार रुपयांची स्थायी देणगी अशी अनुदाने देऊन मराठा वसतिगृहांचा पाया मजबूत केला.

याच वर्षी म्हणजे १९०९ मध्ये जैन बोर्डिंग'ची स्थापना केली गेली. त्यानंतर लिंगायत, मुस्लीम, अस्पृश्य, सोनार, शिंपी, पांचाळ, गौड सारस्वत, इंडियन खिश्चन, चा. का. प्रभू, वैश्य, दोर चांभार, सुतार, नाभिक, सोमवंशीय आर्यक्षत्रिय, कोष्टी अशा विविध जातिधमांची २० वसतिगृहे महाराजांच्या प्रेरणेने व साह्याने स्थापन केली गेली. प्रत्येक वसतिगृहास इमारती, खुल्या जागा कायमस्वरूपी उत्पन्नाची साधने उपलब्ध करून देऊन गॅरीब विद्यार्थ्यांच्या योगक्षेमाची चोख व्यवस्था केली गेली. वसतिगृह चळवळीतील तंत्र व प्रयोग

"वसतिगृह' हा शाहू महाराजांच्या सामाजिक कार्यातील एक अभिनव प्रयोग होता. त्याचे एके तंत्रच त्यांनी विकसित केले होते, असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. मनात आले की, सरकारी अधिकान्यांना हुकूम करून वसतिगृह स्थापन केले, असे त्यांनी केले नाही. ज्या जातीसाठी वसतिगृह स्थापन करायचे, त्या जातीतील पुढारी अथवा प्रतिष्ठित लोकांशी ते अशी युक्तीने संपर्क वाढवीत की, त्यांना आपल्या जातीच्या अभ्युदयासाठी काहीतरी करावयास हवे, अशी भावना त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होई आणि नंतर मग त्यांना त्यांच्या जातीतल्या मुलांसाठी वसतिगृह स्थापण्यास ते उद्युक्त करीत महाराज स्वतः कधीच त्याचे पुढारीपण करीत नसत. प्रत्येक जातीत त्या त्या जातीचे पुढारी तयार व्हावेत, यावर त्यांचा कटाक्ष असे. अशी पुढारी मंडळी एकत्र होऊन, वसतिगृहाची कल्पना घेऊन महाराजाकडे येत. तेव्हा ते त्यांच्या प्रयत्नास प्रोत्साहन देऊन सर्व प्रकारची मदत करीत असत. असे करण्यात लोकांचा सहभाग त्यांना महत्वाचा वाटत होता, तसेच त्या त्या जातीतल्या लोकांना आपण आपल्या जातीसाठी काहीतरी केल्याचे समाधान मिळत होते. अशा प्रकारे वसतिगृह' ही केवळ कोल्हापूरच्या राजाची चळवळ न बनता ती लोकचळवळ बनू शकली. परिणामी, तिचा प्रसार कोल्हापूर संस्थानच्या बाहेरही सर्व महाराष्ट्रात होऊ शकला.

अस्पृश्य समाजाविषयी मात्र शाहूंनी वेगळी वाट चोखळलेली दिसते. सर्वार्थाने उपेक्षित असलेल्या या समाजात शिक्षणाविषयी तळमळ बाळगून आपला उद्धार करण्याची इच्छा धरणारे पुढारी मिळणे अशक्यच होते. अशा परिस्थितीत महाराजांनी भास्करराव जाधव, महादेव डोंगरे, श्रीपतराव शिंदे, खंडेराव बागल, गणपतराव कदम प्रभृती कार्यकर्त्यांना पुढे करुन अस्पृश्यामध्ये शिक्षणाविषयी जागृती करण्यास उद्युक्त केले. महाराजांच्या प्रोत्साहनानेच उपरोक्त मंडळीनी अस्पृश्य मुलासाठी १९०८ मध्ये कोल्हापुरात 'मिस क्लार्क हॉस्टेल' हे स्वतंत्र वसतिगृह स्थापन केले. मिस व्हायोलेट क्लार्क ही मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क यांची कन्या. अस्पृश्याविषयी कळवळा असणारी. शाहू महाराज स्थापन करीत असलेल्या वसतिगृहास या मुलीने आपल्या नृत्याची एक खास कार्यक्रम करून जमलेले ५ हजार रुपये भेट म्हणून दिले होते. तिची मानवतावादी दृष्टी पाहून महाराजांनी तिचेच नाव अस्पृश्यांच्या वसतिगृहास दिले होते. *.

या वसतिगृह चळवळीत शाहू महाराजांनी आणखी एका समाजाबद्दल थोडी वेगळी भूमिका घेतली. महाराजांचे मुस्लीम समाजावर मोठे प्रेम होते; पण या समाजात इतर समाजांशी तुलना करता शिक्षणाबद्दल फारच अनास्था होती. मुस्लिमांसाठी स्वतंत्र वसतिगृह काढण्याचे महाराजांचे प्रयत्न १९०२ सालापासून सुरू होते; पण त्यामध्ये त्यांना यश नव्हते. दरम्यान, त्या समाजातील होतकरू मुलाची मराठा वसतिगृहात सोय केली जात होती. शेवटी १९०६ मध्ये महाराजांनी स्वतःच पुढाकार घेऊन शहरातील प्रमुख मुस्लीम मंडळाची सभा बोलावली.

"इंदुप्रकाश' हे वृतपत्र या सभेचा वृतान्त देते 'बोर्डिंगसाठी मुसलमान समाज तीन हजार रुपये गोळा करीत असेल, तर आपण तितकीच रक्कम देण्यास तयार आहोत, असे श्रीमंतांनी जाहीर करण्याबद्दल सेक्रेटरी यांस आज्ञा केली. त्या योगे जागच्या जागी चार हजार रुपयापर्यंत वर्गणीचे आकडे पडले. मुसलमान समाजातील मंडळींचा हा उत्साह पाहून हुजूरस्वारींनी खूश होऊन आणखी एक हजार रुपये वाढवून चार हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. शिवाय इलाखा मजकुरी दर्गा (देवस्थान), मसजीद वगैरे मुसलमानांच्या धार्मिक बाबीसंबंधी असलेली सर्व उत्पन्ने, मुसलमान जमातीच्या पंचातर्फे धार्मिक कृत्यांकडे योग्य तितकी खर्च करून शिल्लक राहील ती रक्कम, यतीम (पोरकी) गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे खर्च करण्याबद्दल बोर्डिंग फंडाकडे देण्यात यावी, अशी आपली इच्छा असून त्यास मुसलमान समाजाची अनुमती आहे का, असा प्रश्न हजुरस्वारींनी केला. त्यावर अत्यंत कृतज्ञतापूर्वक समस्त मुसलमान समाजाकडून या कामी सर्वांची एकवाक्यता असल्याचे जाहीर करण्यात आले.

त्याच समेत 'मोहमेडन एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना होऊन, 'मुस्लीम बोर्डिंग' सुरू केले गेले, महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी स्वतः मोहमेडन एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्षपद स्वीकारले. संस्थानाच्या दिवाणांना सोसायटीचे पदसिद्घ उपाध्यक्ष, तर करवीरच्या मामलेदारास पदसिद्ध कार्यवाह बनविला अशा प्रकारे मुस्लीम समाजावर कोल्हापूर दरबारचा कायमचा वरदहस्त महाराजांनी निर्माण केला. दरबारातून भरीव अर्थसाहय तर दिले गेलेच शिवाय संस्थानातील मुस्लीम आपला उद्धार करण्याची इच्छा धरणारे पुढारी मिळणे अशक्यच होते. अशा परिस्थितीत महाराजांनी भास्करराव जाधव, महादेव डोंगरे, श्रीपतराव शिंदे, खंडेराव बागल, गणपतराव कदम प्रभृती कार्यकत्यांना पुढे करून अस्पृश्यांमध्ये शिक्षणाविषयी जागृती करण्यास उद्युक्त केले. महाराजांच्या प्रोत्साहनानेच उपरोक्त मंडळीनी अस्पृश्य मुलांसाठी १९०८ मध्ये कोल्हापुरात 'मिस क्लार्क होस्टेल' हे स्वतंत्र वसतिगृह स्थापन केले. मिस व्हायोलेट क्लार्क ही मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लाक यांची कन्या. अस्पृश्यांविषयी कळवळा असणारी शाहू महाराज स्थापन करीत असलेल्या वसतिगृहास या मुलीने आपल्या नृत्याची एक खास कार्यक्रम करून जमलेले ५ हजार रुपये मैट म्हणून दिले होते. तिची मानवतावादी दृष्टी पाहून महाराजांनी तिचेच नाव अस्पृश्यांच्या वसतिगृहास दिले होते. "

या वसतिगृह चळवळीत शाहू महाराजांनी आणखी एका समाजाबद्दल थोडी वेगळी भूमिका घेतली. महाराजांचे मुस्लीम समाजावर मोठे प्रेम होते; पण या समाजात इतर समाजांशी तुलना करता शिक्षणाबद्दल फारच अनास्था होती. मुस्लिमांसाठी स्वतंत्र वसतिगृह काढण्याचे महाराजांचे प्रयत्न १९०२ सालापासून सुरु होते; पण त्यामध्ये त्यांना यश नव्हते. दरम्यान, त्या समाजातील होतकरू मुलाची मराठा वसतिगृहात सोय केली जात होती. शेवटी १९०६ मध्ये महाराजांनी स्वतःच पुढाकार घेऊन शहरातील प्रमुख मुस्लीम मंडळींची सभा बोलावली.

"इंदुप्रकाश' हे वृत्तपत्र या सभेचा वृतान्त देते 'बोर्डिंगसाठी मुसलमान समाज तीन हजार रुपये गोळा करीत असेल, तर आपण तितकीच रक्कम देण्यास तयार आहोत, असे श्रीमंतांनी जाहीर करण्याबद्दल सेक्रेटरी यांस आजा केली. त्या योगे जागच्या जागी चार हजार रुपयांपर्यंत वर्गणीचे आकडे पडले. मुसलमान समाजातील मंडळींचा हा उत्साह पाहून हुजूरस्वारींनी खुश होऊन आणखी एक हजार रुपये वाढवून चार हजार रुपये देण्याचे आश्वासन दिलं. शिवाय इलाखा मजकुरी दर्गा (देवस्थान), मसजीद वगैरे मुसलमानांच्या धार्मिक बाबीसंबंधी असलेली सर्व उत्पन्ने, मुसलमान जमातीच्या पंचातर्फे धार्मिक कृत्याकडे योग्य तितकी खर्च करून शिल्लक राहील ती रक्कम, यतीम (पोरकी) गरीब व होतकरू विद्यार्थ्याच्या शिक्षणाकडे खर्च करण्याबद्दल बोर्डिंग फंडाकडे देण्यात यावी, अशी आपली इच्छा असून त्यास मुसलमान समाजाची अनुमती आहे का, असा प्रश्न हुजूरस्वारींनी केला. त्यावर अत्यंत कृतज्ञतापूर्वक समस्त मुसलमान समाजाकडून या कामी सर्वांची एकवाक्यता असल्याचे जाहीर करण्यात आले. ८

त्याच सभेत मोहमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना होऊन, 'मुस्लीम बोर्डिंग' सुरू केले गेले. महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी स्वतः मोहमेडन एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्षपद स्वीकारले. संस्थानाच्या दिवाणांना सोसायटीचे पदसिदध उपाध्यक्ष, तर करवीरच्या मामलेदारास पदसिद्ध कार्यवाह बनविले! अशा प्रकारे मुस्लीम समाजावर कोल्हापूर दरबारचा कायमचा वरदहस्त महाराजांनी निर्माण केला. दरबारातून भरीव अर्थसाहय तर दिले गेलेच शिवाय संस्थानातील मुस्लीम

देवस्थानाची, मशिदी आणि दर्गे यांची उत्पन्नेही बोर्डिंगच्या खर्चासाठी महाराजांनी जोडून दिली. १९२० मध्ये महाराजांचे गुरु सर फेजर यांनी कोल्हापुरास भेट दिली. त्या वेळी भव्य दरबार भरवून मुस्लीम बोर्डिंगच्या प्रशस्त दुमजली इमारतीची पायाभरणी केली गेली. त्यासाठी महाराजानी साडेपाच हजार रुपयांची देणगी दिली. शिवाय इमारतीसाठी संस्थानच्या जंगलातील सागवानी लाकूड देण्याची व्यवस्था केली.

'वसतिगृह चळवळीत कोल्हापुरामध्ये या कालखंडात एक अभिनव प्रयोग केला गेला. शाहू महाराजांपासून प्रेरणा घेऊन सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकत्यांनी हा प्रयोग केला होता. हा प्रयोग म्हणजे मराठा समाजातील अत्यंत गरीब विद्यार्थ्यासाठी स्थापन झालेले 'श्री प्रिन्स शिवाजी मराठा फ्री बोर्डिंग हाउस हे वसतिगृह होय. पुण्यामध्ये बापूराव शिंदे हे सामाजिक कार्यकर्ते एक मोफत विद्यार्थिगृह चालवीत होते. या विद्यार्थिगृहातील विद्यार्थी माधुकरी मागून अन्न आणत असत आणि एकत्र बसून जेवण करीत असत. एकदा महाराजांचा पुण्यात मुक्काम असताना 'विजयी मराठा कार श्रीपतराव शिंदे यांनी ही गोष्ट महाराजांच्या कानावर घातली. आजपर्यंत गरीब ब्राह्मणाची मुले माधुकरी मागून शिक्षण घेत असल्याचे महाराजांना माहीत होते. आता मराठ्यांची मुलेही माधुकरी मागून शिक्षण घेण्याची जिद्द बाळगतात. हे ऐकून महाराजाना मोठे कौतुक वाटले आणि मग अवचितपणे महाराजच श्रीपतरावांना घेऊन ते वसतिगृह पाहावयास गेले. उघडीबोडकी मुले माधुकरी मागून आणलेल्या अन्नाची 'प्रतवारी करीत होती. ते सर्व दृश्य पाहून महाराजांचे हृदय भरून आले. श्रीपतरावाच्या चरित्रात म्हटले आहे, 'श्रीपतरावांच्या खांद्यावर हात ठेवून, सद्गदित कंठाने राजर्षीनी उद्गार काढले, श्रीपतरावा ही मराठ्यांची मुले माधुकरी मागून विद्या शिकू लागली हे बघून मला फार आनंद झाला!' शाहरायांचे डोळे आणि अंतःकरण भरून आले होते; ते पुढे म्हणाले, 'आता मली थोडी का होईना आशा वाटते की, माझा समाज, असाच काही कोपऱ्यात धूळ खात पडणार नाही. "

• आता शाहू महाराजांच्या वर्तुळातील तरुण कार्यकत्यांनी कोल्हापुरात हा प्रयोग करावयाचे ठरविले, श्रीपतराव शिंदे, मामासाहेब मिणचेकर, खंडेराव बागल, बाबूराव यादव, रामचंद्र बाबाजी जाधव (दासराम) इत्यादींनी प्रारंभी 10 मुले जमवून त्यांना सधन कुटुंबांमध्ये वार लावून दिले. 'वार' म्हणजे ठराविक विद्याथ्र्याने ठराविक कुटुंबात जेवण घ्यायचे. अनेक शिक्षणप्रेमी कुटुंबे आपणहून या कार्यासाठी पुढे आली, यात समाजाचा सहभाग महत्त्वाचा होता. शिक्षणाविषयी एक प्रकारची व्यापक जाणीव या प्रयोगातून तयार होत होती. हळूहळू विद्याथ्र्यांची संख्याही वाढू लागली आणि विद्याथ्र्यांच्या जेवणाची व्यवस्था करता करता कार्यकत्यांची दमछाक होऊ लागली. महाराज या प्रयोगाकडे बारकाईने लक्ष ठेवून होते, त्यांना शे-पन्नास विद्यार्थ्यांची मोफत जेवणाची व्यवस्था करण काहीच अवघड नव्हते; पण त्यांनी तसे केल्याचे दिसत नाही, कारण त्यांच्या मते शिक्षणासाठी खडतर मार्ग की बारीमा समाजातील लोकदली आहेत.देवस्थानांची, मशिदी आणि दर्गे यांची उत्पन्नेही बोडिंगच्या खर्चासाठी

महाराजांनी जोडून दिली. १९२० मध्ये महाराजांचे गुरु सर फ्रेजर यांनी

कोल्हापुरास भेट दिली, त्या वेळी भव्य दरबार भरवून मुस्लीम बोर्डिगच्या

प्रशस्त दुमजली इमारतीची पायाभरणी केली गेली, त्यासाठी महाराजांनी

साडेपाच हजार रुपयाची देणगी दिली. शिवाय इमारतीसाठी संस्थानच्या

जंगलातील सागवानी लाकूड देण्याची व्यवस्था केली. 'वसतिगृह चळवळीत कोल्हापुरामध्ये या कालखंडात एक अभिनव प्रयोग केला गेला. शाहू महाराजांपासून प्रेरणा घेऊन सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा प्रयोग केला होता. हा प्रयोग म्हणजे मराठा समाजातील अत्यंत गरीब विद्यार्थ्यासाठी स्थापन झालेले श्री प्रिन्स शिवाजी मराठा फ्री बोर्डिंग हाउस' हे वसतिगृह होय. पुण्यामध्ये बापूराव शिंदे हे सामाजिक कार्यकर्ते एक मोफत विदयार्थिगृह चालवीत होते. या विद्यार्थिगृहातील विद्यार्थी माधुकरी मागून अन्न आणत असत आणि एकत्र बसून जेवण करीत असत. एकदा महाराजांचा पुण्यात मुक्काम असताना 'विजयी मराठा कार श्रीपतराव शिंदे यांनी ही गोष्ट महाराजांच्या कानावर घातली. आजपर्यंत गरीब ब्राह्मणांची मुले माधुकरी मागून शिक्षण घेत असल्याचे महाराजांना माहीत होते. आता मराठ्यांची मुलेही माधुकरी मागून शिक्षण घेण्याची जिद्द बाळगतात, हे ऐकून महाराजांना मोठे कौतुक वाटले आणि मग अवचितपणे महाराजच श्रीपतरावांना घेऊन ते वसतिगृह पाहावयास गेले. उघडीबोडकी मुले माधुकरी मागून आणलेल्या अन्नाची 'प्रतवारी करीत होती. ते सर्व दृश्य पाहून महाराजाचे हृदय भरून आले. श्रीपतरावाच्या चरित्रात म्हटले आहे. श्रीपतरावांच्या खांद्यावर हात ठेवून, सद्गदित कंठाने राजर्षीनी उद्गार काढले, श्रीपतरावा ही मराठ्यांची मुले माधुकरी मागून विद्या शिकू लागली हे बघून मला फार आनंद झाला!' शाहूरायाचे डोळे आणि अंतःकरण भरून आले होते; ते पुढे म्हणाले, 'आता मली थोडी का होईना आशा वाटते की, माझा समाज, असाच काही कोपन्यात धूळ खात पडणार नाही. "

आता शाहू महाराजांच्या वर्तुळातील तरुण कार्यकर्त्यांनी कोल्हापुरात हा प्रयोग करावयाचे ठरविले. श्रीपतराव शिंदे, मामासाहेब मिणचेकर, खंडेराव बागल, बाबूराव यादव, रामचंद्र बाबाजी जाधव (दासराम) इत्यादीनी प्रारंभी १० मुले जमवून त्यांना सधन कुटुंबांमध्ये वार लावून दिले. 'वार' म्हणजे ठराविक विद्यार्थ्यांने ठराविक कुटुंबात जेवण घ्यायचे. अनेक शिक्षणप्रेमी कुटुंबे आपणहून या कार्यासाठी पुढे आली. यात समाजाचा सहभाग महत्वाचा होता. शिक्षणाविषयी एक प्रकारची व्यापक जाणीव या प्रयोगातून तयार होत होती. हळूहळू विद्याथ्र्यांची संख्याही वाढू लागली आणि विदयाथ्र्यांच्या जेवणाची व्यवस्था करता करता कार्यकत्यांची दमछाक होऊ लागली. महाराज या प्रयोगाकडे बारकाईने लक्ष ठेवून होते, त्यांना शे पन्नास विद्याथ्र्यांची मोफत जेवणाची व्यवस्था करण काहीच अवघड नव्हते; पण त्यानी तसे केल्याचे दिसत नाही, कारण त्यांच्या मते शिक्षणासाठी खडतर मार्ग स्वीकारण्याची तयारी मागासलेल्या समाजातील लोक दाखवीत आहेत

आणि त्या दृष्टीने ते स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा पडतझडत का होईना प्रयत्न करीत आहेत, ही गोष्ट समाज जागा होण्याच्या दृष्टीने मोलाची होती; म्हणून त्या प्रयोगास थोड़ा अवसर देणे त्यांना आवश्यक वाटत होते. तो दिल्यानंतर कार्यकर्त्यांची कुचंबणा होऊ लागताच महाराज पुढे झाले. त्यांनी या वसतिगृहावर आपल्या कृपेचा वर्षाव केला. त्यांनी 'कोठीशाळा' नावाची एक मोठी ईमारत वसतिगृहांसाठी दिली. वसतिगृहाच्या खर्चासाठी ७ हजार रुपयांचा स्थायी निधी ट्रेझरीत ठेवला. शहरात सात एकर जमीन बहाल केली. याच जागेवर पुढे वसतिगृहाच्या इमारती उभ्या राहिल्या. गडहिंग्लज तालुक्यातील नूल या गावी रामनाथगिरी मठाच्या देवस्थानच्या १०० एकर जमिनीचे उत्पन्न वसतिगृहास कायमचे लावून दिले. या वसतिगृहातील कोणाही विद्याथ्र्यास कोणत्याही संस्थेत मोफत शिक्षण देण्याचा हुकूम काढला गेला. "कोल्हापुरातील उपरोक्त दोन्ही 'मराठा' वसतिगृहांचे प्रथमपासूनचे वैशिष्ट्य असे आहे की, त्यामध्ये मराठ्यांच्या मुलांबरोबर इतर मागासलेल्या समाजातील मुलांनाही प्रवेश दिला जात होता. जो अत्यंत गरीब कुटुंबातील मुले असत, त्यांची वसतिगृहात मोफत व्यवस्था केली जात असे.

शाहू महाराजांना आपल्या वसतिगृह चळवळीचा मोठा अभिमान होता. ही चळवळ महाराजांच्या प्रेरणेने आणि आश्रयानेच फोफावली असली तरी तिच्या यशस्वितेचे श्रेय ते स्वत कडे न घेता आपल्या संस्थानातील शिक्षणप्रेमी प्रजेला देऊ इच्छित होते. १९२० मध्ये नाशिकमधील 'श्री उदाजी मराठा विद्यार्थी वसतिगृहाच्या इमारतीच्या कोनशिला समारंभात अध्यक्ष म्हणून भाषण करताना त्यांनी म्हटले होते. माझ्या चिमुकल्या राज्यातील प्रजाजनांनी एका बाबतीत तरी विशेष नाव कमावले आहे हे मी अभिमानपूर्वक सांगतो. त्यांचे उदाहरण लोकांपुढे आल्याने हा किता पुष्कळ ठिकाणी गिरविला गेला आहे. ब्रिटिश पार्लमेंटला मदर ऑफ पार्लमेंट्स असे मोठ्या अभिमानाने इंग्रज आणि इतर लोक म्हणतात. त्याप्रमाणे 'कोल्हापुरास मदर ऑफ बोर्डिंग हाउसेस म्हणजे विद्यार्थी वसतिगृहांची माता म्हणावे असे सार्थ यश मिळाले आहे.

शाहू महाराजांच्या वसतिगृह चळवळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी वसतिगृह चळवळीस दिलेला राजाश्रय फक्त कोल्हापूर संस्थानापुरताच मर्यादित नव्हता. महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, नाशिक, नागपूर इत्यादी ठिकाणच्या अनेक वसतिगृहांना त्यांनी उदार हृदयाने व सढळ हाताने अर्थसाह्य केले होते. ठिकठिकाणच्या सामाजिक कार्यकत्यांना मागासलेल्या समाजाच्या मुलांसाठी वसतिगृहे स्थापन करण्यात अर्थसाहय देण्याचे कार्य त्यांनी शेवटपर्यत चालूच ठेवले होते. महाराजांच्या डोक्यात वसतिगृहाचे इतके विलक्षण वेड भरले होते की, एकेकाळी त्यांनी लडनमधील विद्यार्थ्यासाठी तेथे एखादे स्वस्त वसतिगृह स्थापन करता येईल का, याचाही विचार केला होता!

वसतिगृह चळवळीतील जातीचा मुद्दा
शाहू महाराजांनी जातीनिहाय वसतिगृहे काढली. ही त्याच्या जातिर्भेदनिर्मूलन कार्याच्या विरोधात गेलेली बाब होय, असा काहीसा प्रतिकूल सूर काही टीकाकार लावतात वरवर पाहता ती वस्तुस्थितीही वाटते; पण अस्पृश्यता व जातिभेद यांच्याशी निकराचा लढा देणाऱ्या महाराजांनी जातीच्या पायावर वसतिगृहे का उभी केली, याचा खोलवर जाऊन विचार करता त्यांची ही कृती कालचितच होती, असे दिसून येते. शेकडो वर्षे भक्कम पायावर उभी असलेली जातिव्यवस्थेची उतरंड महाराज काही एका रात्रीत उद्ध्वस्त करू शकत नव्हते. या व्यवस्थेचे वैशिष्ट्यच असे होते की, प्रत्येक वरची जात खालच्या जातीस तुच्छ समजत होती; तसेच ती आपल्याच वर्तुळात फिरत राहून आपले स्वतंत्र अस्तित्व प्राणपणाने जपत होती. अशा कठोर सामाजिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर महाराजांनी सर्व जातिधर्मासाठी म्हणून एकच मोठे वसतिगृह स्थापन केले असते, तरी त्या वसतिगृहात जात्याभिमानी आई-बापांनी आपली मुले 'जात बुडते म्हणून पाठविली नसती. याउलट आपल्या जातीचे बोडिंग कोल्हापुरात आहे, हे पाहिल्यावर त्या त्या जातीच्या आई-बापांनी आपली मुले शिकली तरी जात तरते' या आशेवर मुले पाठविण्याचे धाडस केले. त्यामुळे निरनिराळ्या जातींची, विशेषतः मागासलेल्या जातींची मुले शिकू लागली. महाराजांच्या दृष्टीने प्रत्येक जातीची मुले आपापल्या जातीच्या वसतिगृहात राहून का होईना; पण शिकणे महत्वाचे होते. ही मुले शिकल्यावर त्यानो जातिभेदातील फोलपणा लक्षात आल्याशिवाय राहणार नाही, असा त्यांचा आशावाद होता. कुटुंबापेक्षा जात मोठी व जातीपेक्षा 'समाज मोठा ही जाणीव निर्माण होण्यासाठी प्रथम शिक्षणाच्या प्रसाराची गरज आहे, असे त्यांना वाटत होते.

उपरोक्त जातीचा मुद्दा प्रत्यक्ष उदाहरणावरून अधिक स्पष्ट होईल. आपण पाहिले की, सर्व अस्पृश्य जातीच्या मुलासाठी महाराजांनी 'मिस 'क्लार्क [होस्टेल' नावाचे वसतिगृह सुरु केले होते; पण वसतिगृहातील अस्पृश्य मुलांतही एकमेकाच्या जातीबद्दल तुच्छता होती. सर्व अस्पृश्य जातींची मुले एकत्र राहू शकत नाहीत, हे महाराजांच्या लक्षात आल्यावर अस्पृश्यातील चांभार व ढोर या दोन जातींसाठी त्यांनी १९१९ मध्ये स्वतंत्र वसतिगृह स्थापन केले. याचा अर्थ जातीचा उच्च-नीच भाव फक्त वरच्या जातीमध्येच होता असे नाही, तो अगदी खालच्या थरातही तितकाच तीव्र होता. अशा परिस्थितीत महाराजाच्या समोर अशा प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता आणि मग या पर्यायाच्या मार्गानेच जायचे ठरविल्यानंतर त्यांनी प्रत्येक जातीला वाटणाऱ्या अभिमानाच्या भावनेने वसतिगृह चळवळीसाठी उपयोजन केले.

१९०९ मध्ये मराठा वसतिगृहाची स्थापन करीत असतानाच महाराजांच्या मनात जैन वसतिगृहाची कल्पना घोळत होती. त्याच सुमारास निपाणीजवळ स्तवनिधी या तीर्थक्षेत्री जैन धर्मीयांची एक परिषद भरली होती. महाराजांनी ही संधी साधून आपला एक खास प्रतिनिधी त्या परिषदेस पाठविला आणि जैन मंडळीनी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी कोल्हापुरात वसतिगृह स्थापण्यास पुढे यावे, त्यास दरबारची सक्रिय सहानुभूती राहील, असा संदेश

पाठविला. या संदेशाने प्रभावित होऊन जैन मंडळी पुढे आली आणि मराठा वसतिगृहाच्या स्थापनेनंतर दुसऱ्याच महिन्यात कोल्हापुरात 'दिगंबर जैन वसतिगृह सुरू झाले. लिंगायत वसतिगृहाच्या स्थापनेपूर्वी तर खुद्द महाराजांनीच लिंगायत लोकांची एक परिषद आयोजित केरुन तिच्यात त्यांच्या समाजाचे वसतिगृह सुरु करण्यासाठी कार्यकत्यांनी पुढे यावे, असे कळकळीचे आवाहन केले होते. 
प्रत्येक जातीला आपल्याविषयी जी अस्मिता असते, तिचे रूपांतर शिक्षण प्रसारासारख्या विधायक कार्यात व्हावे, असे महाराजांना वाटत होते. प्रत्येक जातीत प्रतिष्ठित, सधन व समाजहितैषी मंडळी असतात, त्यांच्या ठिकाणी आपल्या जातीसाठी काही विधायक कार्य करावे अशा सुप्त भावनाही असते. महाराजांना याची अचूक जाण असल्याने ते अशा मंडळींच्या भावनांना आवाहन करुन कार्यसिद्धी साधत असत. महाराजांना वाटे की, ज्या जातीसाठी आपण वसतिगृह काढतो आहोत, त्या जातीच्या लोकांमध्ये आपली मुलेबाळे शिकली पाहिजेत, ही जाणीव निर्माण व्हायला हवी: त्या जातीने सामुदायिक प्रयत्न करून वसतिगृहासाठी काही प्राथमिक निधीही उभारावा, अशी त्यांची इच्छा असे, अशी इच्छा धरण्यात महाराजांना वसतिगृहाच्या निर्मितीत त्या त्या जातीच्या प्रत्यक्ष कृतीचा सहभाग महत्त्वाचा वाटत होता; त्यामुळेच वसतिगृहांच्या चळवळीत लोकांचा सहभाग वाढू शकला, चळवळीची फलनिष्पती
शाहू महाराजांच्या वसतिगृह चळवळीची फलनिष्पती काय, या प्रश्नाचे उत्तर पाहिले जाता असे दिसून येते की, या चळवळीने आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी शेकडो कर्तबगार व्यक्ती उदयास आणल्या. कृषितज्ज्ञ डॉ. पी.सी. पाटील यांच्यापासून पंजाबचे गव्हर्नर रँग्लर डी. सी. पावटे यांच्यापर्यंत, साहित्यिक ग. ल. ठोकळापासून शिक्षणतज्ज्ञ जे. पी. नाईकांपर्यंत, लोकनेते बाळासाहेब देसाईपासून कम्युनिस्ट नेते कॉ. मिरजकरांपर्यंत निरनिराळ्या क्षेत्रांत धमकलेल्या शेकडो व्यक्ती कोल्हापुरातील शाहू महाराजांच्या वसतिगृहांत राहून शिकून पुढे आल्या. सुमारे पाऊणशे वर्षे महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, कला इत्यादी क्षेत्रातील चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती कोल्हापूरच्या वसतिगृहांनी घडविल्या. या वसतिगृहामुळेच महाराष्ट्रात मुंबई-पुण्याखालोखाल कोल्हापूर हे विद्याभ्यासाचे केंद्र म्हणून पुढे आले. मुंबई ठाण्यापासून बेळगाव- धारवाडपर्यंत पसरलेल्या बहुजन समाजास ही वसतिगृहे म्हणजे आपल्या मुलाबाळांच्या भाग्योदयाची केंद्रे भासू लागली. परिणामी, महाराष्ट्राच्या कौना-कोपऱ्यातून शेकडो तरुण कोल्हापूरकडे आकर्षित झाले. महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाने विभूषित झालेली ब्राह्मणेतरांची पहिली पिढी घडविण्यात या वसतिगृहांचा वाटा मोलाचा ठरला. शाह काळातीलच नव्हे, तर त्यानंतरच्याही ब्राह्मणतर समाजाच्या तीन पिढ्या यो वसतिगृहांनी घडविल्या आहेत. आज जे पश्चिम महाराष्ट्रात बहुजन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचे समर्थ चित्र उभे राहिले आहे. त्याचा पाया शाहू महाराजांच्या वसतिगृहांनी घातला. बहुजन समाजाला अज्ञानाच्या गर्तेतून उचलून वर काढण्यासाठी महाराजांनी ज्या अनेक तरफा उपयोगात आणल्या, त्यात सर्वात प्रभावी तरफ वसतिगृहाच्या चळवळीची होती. बहुजन समाजातील हजारो मुले गेल्या शंभर वर्षात या वसतिगृहांतून शिकून पुढे आली ही वसतिगृह नसती तर ती शिक्षणापासून वंचितच राहिली असती. हे एक ऐतिहासिक सत्य आहे. शाहू महाराजांच्या वसतिगृह चळवळीच्या आणखी एका फलनिष्पत्तीची नौद घ्यावयास हवी ती म्हणजे या चळवळीतून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रातील अनेक सामाजिक कार्यकत्यांनी ठिकठिकाणी विद्येत मागासलेल्या समाजासाठी वसतिगृह स्थापन केली. त्यामध्ये सर्वात लक्षणीय कामगिरी केली ती स्वतःला महाराजांचे शिष्य म्हणवून घेणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खुद्द भाऊराव हे महाराजांच्या वसतिगृह चळवळीचेच अपत्य होते. त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करून महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात ज्ञानाची गंगा तर नेलीच; पण ठिकठिकाणी हायस्कूल- कॉलेजांसोबत गरीब विद्यार्थ्यासाठी वसतिगृहे स्थापन केली. या विद्यार्थ्यांना 'कमवा आणि शिका हा स्वावलंबी जीवनाचा मंत्र देऊन, कर्मवीरांनी आपल्या गुरुच्याही पुढे एक पाऊल टाकले त्यांच्या शैक्षणिक कार्याची नाळ थेट शाहूरायांच्या चळवळीशी जोडलेली होती. हे लक्षात घेतले पाहिजे.
उत्तर लिहिले · 26/8/2023
कर्म · 9395

Related Questions

जल ही जीवन आहे माहितीपर निबंध?
मोबाईलचे मोनोगत मराठी निबंध?
मराठ वाडा मुक्तीसंग्राम लढाचा धकधकनारा इतिहास निबंध?
मी अभिनेता झालो तर निबंध?
मला मित्र नसता तर निबंध मला मित्र नसतात तर निबंध?
आला ‌‌श्रावण निबंध?
जळणाऱ्या डोंगराच्या आत्मवृत्त निबंध?