सैन्य इतिहास

आझाद हिंद सेनेच्या झाशीची राणी रेजिमेंटची माहिती काय आहे?

2 उत्तरे
2 answers

आझाद हिंद सेनेच्या झाशीची राणी रेजिमेंटची माहिती काय आहे?

1
१९४३ ऑक्टोबर मध्ये यांना सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या महिला पथकाचे प्रमुख पद देण्यात आले. या पथकात त्या वेळी १८५ स्त्री सैनिक होत्या. हा आकडा नंतर २ हजारवर पोचला. पिस्तूल, बंदूक, मशीनगन्स यासारखी शस्त्रे वापरण्याचे शिक्षण या स्त्रियांना दिले जाई.

लक्ष्मी एस. स्वामीनाथन ऊर्फ लक्ष्मी सहगल (२४ ऑक्टोबर, इ.स. १९१४- २३ जुलै, इ.स. २०१२) या पेशाने डॉक्टर होत्या. १९४३ साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली. लक्ष्मी सहगल या कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जातात..


लक्ष्मी सहगल


मद्रास उच्च न्यायालयामध्ये फौजदारी कायदा करणारे वकील एस. स्वामिनाथन हे त्यांचे वडील होत. लक्ष्मी यांनी १९३८ साली मद्रास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. एक वर्षानंतर त्यांना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रात पदविका मिळाली. चेन्नई येथे असलेल्या कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून काम केले.

कॅप्टन लक्ष्मी या आझाद हिंद सेनेच्याच्या झाशी राणी पथकाच्या प्रमुख कॅप्टन होत्या. १९४३ ऑक्टोबर मध्ये यांना सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या महिला पथकाचे प्रमुख पद देण्यात आले. या पथकात त्या वेळी १८५ स्त्री सैनिक होत्या. हा आकडा नंतर २ हजारवर पोचला. पिस्तूल, बंदूक, मशीनगन्स यासारखी शस्त्रे वापरण्याचे शिक्षण या स्त्रियांना दिले जाई. प्रारंभी या स्त्रियांना शुश्रूषा पथकात काम करण्याची संधी दिली जात असे. पण नंतर लक्ष्मी यांच्या विनंतीवरून सुभाष बाबू यांनी महिलांच्या दोन पथकांना आघाडीवर जाण्यास संधी दिली आणि हिंदुस्थान आणि ब्रह्मदेश यांच्या आघाडीवर झालेल्या युद्धात या स्त्रियांनी विजय मिळविला. नंतर आझाद हिंद सेना माघार घेत असता यांच्या फौजेने निकराचा लढा दिला आणि सुभाषबाबू यांना निसटून जाण्याची संधी दिली व मगच त्या ब्रिटिशांना स्वाधीन झाल्या. युद्धाच्या अखेरीला त्या जखमी सैनिकांची सेवा करीत होत्या त्यामुळे त्यांच्यावर खटला न भरता त्यांना सोडून देण्यात आले.[१]

त्यानंतर बांगला देशात वैद्यकीय सुविधा आणि बचाव कार्यातही लक्ष्मी सहगल यांचा सहभाग होता. १९४७ च्या मार्चमध्ये लाहोरच्या प्रेम कुमार यांच्याशी त्यांनी लग्न केले. विवाह झाल्यानंतर ते कानपूर येथे स्थायिक झाले.तिथे त्यांनी आपली वैद्यकीय प्रॅॅक्टिस चालू ठेवली आणि भारताच्या फाळणीनंतर मोठ्या संख्येने आलेल्या शरणार्थींना मदत केली.

सुभाषिनी अली आणि अनिसा पुरी या कॅप्टन लक्ष्मी यांच्या दोन मुली.

सेहगल यांनी सन १९७१ मध्ये कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्या भारतीय राज्यसभेच्या सदस्याही होत्या.

आझाद हिंद सेनेत काम करण्याबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात कॅप्टन सेहेगल यांनी भरीव कामगिरी केली.

हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने कॅप्टन लक्ष्मी यांना दि. १९ जुलै २०१२ रोजी कानपूर येथील मेडिकल सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. सोमवार दिनांक २३ जुलै २०१२ला सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
उत्तर लिहिले · 9/8/2023
कर्म · 9415
0
झाशीची राणी रेजिमेंट ही आझाद हिंद सेनेची (INA) एक महिला युनिट होती. दुसऱ्या महायुद्धात जपानच्या मदतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या या सेनेत भारतीय स्त्रियांचा सक्रिय सहभाग होता. या रेजिमेंटची माहिती खालीलप्रमाणे आहे:
  • स्थापना: १९४३ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी झाशीची राणी रेजिमेंटची स्थापना केली. स्त्रियांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांना सैन्यात सहभागी करून घेणे हा यामागचा उद्देश होता.
  • नाव: या रेजिमेंटला वीरांगना लक्ष्मीबाई, झाशीची राणी यांचे नाव देण्यात आले होते, ज्यांनी १८५७ च्या भारतीय उठावात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढा दिला होता.
  • उद्देश: भारतीय स्त्रियांना सैनिकी प्रशिक्षण देऊन त्यांना आझाद हिंद सेनेत सक्रिय भूमिका घेण्यास सक्षम करणे, जेणेकरून त्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देऊ शकतील.
  • सदस्य: या रेजिमेंटमध्ये स्वयंस्फूर्तीने अनेक भारतीय महिला, विशेषतः मलाया (आताचे मलेशिया) आणि ब्रह्मदेश (म्यानमार) येथील महिला सामील झाल्या होत्या.
  • प्रशिक्षण: या रेजिमेंटमधील सदस्यांना शस्त्र वापरण्याचे आणि सैनिकी কৌশলचे प्रशिक्षण देण्यात आले. शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक खंबीरता यावरही भर देण्यात आला.
  • नेतृत्व: कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन (लक्ष्मी सहगल) यांनी या रेजिमेंटचे नेतृत्व केले. त्या एक डॉक्टर होत्या आणि त्यांनी रेजिमेंटला सक्षमपणे मार्गदर्शन केले.
  • योगदान: झाशीची राणी रेजिमेंटने आझाद हिंद सेनेच्या अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. त्यांनी सैनिकांना मदत करणे, जखमी जवानांची देखभाल करणे आणि गुप्त माहिती पुरवण्याचे कार्य केले.
  • महत्व: या रेजिमेंटने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांच्या योगदानाला एक नवीन दिशा दिली. स्त्रियासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशासाठी लढू शकतात हे त्यांनी सिद्ध केले.
झाशीची राणी रेजिमेंट हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी उदाहरण आहे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

स्थल सेनेच्या प्रमुखाला काय म्हणतात?
सर्वात प्राचीन सेना विभाग कोठे आहे?
फायरिंग के प्रकार?
किती जवान मिळून एक तुकडी असते?
भारतीय सैनिक आणि सेना संबंधी माहिती?
भारतीय सैनिक तास सेना संबंधी माहिती आंतरजालाच्या साहाय्याने शोधून लिहा?
मराठा पायदळातील सर्वात कनिष्ठ पद कोणते आहे?