2 उत्तरे
2
answers
राज्याचे कलेवर प्रेम होते या वाक्यातील 'कलेवर' या शब्दाचा अर्थ काय आहे?
0
Answer link
राजाचे 'कलेवर' प्रेम होते.
येथे पहिल्या वाक्यात 'कलेवर' हे शब्दरूप 'कला' या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे तर दुसऱ्या वाक्यात 'कलेवर' हे नाम असून त्याचा अर्थ 'शव' असा आहे.
आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतली अशी शक्तिस्थळे जाणून घ्यायला हवीत. भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा. आपल्या घरीदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे. तिने आपल्या भाव जीवनाला आकार दिला आहे. आपल्या भावना व्यक्त करायला आधार दिला आहे. तिच्याशी आपले खास जिव्हाळ्याचे नाते असायला हवे. त्यासाठी तिचे ज्ञानही आपण मिळवायला हवे.
आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आतबाहेर असते. तिचे जीवनातले महत्त्वाचे स्थान कायम ठेवायला हवे.. उदा., आता पाऊस पडत आहे. 'पाऊस पडणे' या घटनेविषयी दोन वाक्यांतून कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते पाहा.
१. पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिली..
२. सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या 'मॉर्निंग वॉक'च्या बेतावर पाणी पडले.
अशी अनेक वाक्ये तयार करता येतील. त्यातून भाव खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते, त्यामुळे तिचे अर्थसौंदर्य कळल्यावरच आपण 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...' असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरू, हे विसरून चालणार नाही.
0
Answer link
तुमच्या प्रश्नानुसार, "राज्याचे कलेवर प्रेम होते" या वाक्यातील 'कलेवर' या शब्दाचा अर्थ शरीर किंवा देह असा होतो.
या वाक्यात, 'कलेवर' म्हणजे राज्याचे शरीर किंवा देह यावर प्रेम होते, असा अर्थ अभिप्रेत आहे.