शेअर बाजार अर्थशास्त्र

तेजी म्हणजे काय? तेजीची कारणे कोणती?

2 उत्तरे
2 answers

तेजी म्हणजे काय? तेजीची कारणे कोणती?

1
तेज—न. १ प्रकाश; कांति; लकाकी; पाणी; झकझकी. २ उष्णता; कडक सूर्यकिरण. 'तोय तेज घूमु । ययां वायूसीं संगमु । -ज्ञा १८.३०८. ३ वैभव; शोभा; उत्कर्ष. ४ गुण; उपयुक्तता; सत्त्व; प्रताप (औषध इ॰ चा); जोम; उत्साह; गांभीर्य (भाषण इ॰ चें). ५ वीर्य; रेत. 'देइन तुज निजकन्या, तव तेजातें परा न सोसील ।' -मोअश्व ३.१५. ६ तिखटपणा; तीक्ष्णता; झणझणीतपणा. ७ पराक्रम; सामर्थ्य. 'भावितमःप्रशमीं न क्षमही होऊनि तेज देहिं सके ।' -मोसभा ५.१९. [सं. तेजस्] सामाशब्द- तेजगी-स्त्री. चकाकी; टवटवी; झांक; पाणीदारपणा. तेजतत्व- न. १ तेजाचें अधिष्टान; तेजस्वीपणाचें मूळ; नेत्र, सूर्य वगैरेच्या ठिकाणीं राहणारें आद्यतत्त्व. २ ज्ञान; ज्ञानेंद्रिय. 'जे तेजतत्त्वाची आदी ।' -ज्ञा १३.८८. तेजःपुंज-वि. सूर्य, रत्न, विद्वान, मानमान्यतेचा पुरुष यांना ही संज्ञा लावतात. तेजवान्,तेज- वंत, तेजोमय, तेजस्वी-वि. १ शोभायमान; कांतिमान्; उजळ; सतेज; उज्वल. २ (ल.) प्रभाववान्; प्रतापी; प्रतिष्ठित; प्रसिद्ध; सन्माननीय; बाणेदार. तेजस-वि. तेजस्वी; प्रकाशवान्. 'पैं कमलायतडोळसा । सूर्यकोटि तेजसा ।' -ज्ञा ११.६९.तेजःसंकर्ष- देश-पु. (शाप.) (सर्व प्रकाश एकत्र जमण्याचें स्थान). सूक्ष्मदर्शक भिगांतून निघणारे किरण ज्या ठिकाणीं केंद्रीभूत होतात तो बिंदु. तेजस्कर-वि. तेजस्वी; चकाकित; सतेज. तेजाकार-पु. सुर्य. 'कां उदय न कीजे तेजाकारें । तंव गगनचि होऊनि असे आंधारें ।' -ज्ञा ११.६९३. तेज्स्वी मासा-पु. चकचकीत व शोभायमान असे एकावर एक चढलेले खवले अंगावर असणारा एक जातीचा मासा. तेजाळ-वि. (काव्य.) १ उज्वल; सतेज; चकचकीत; तेजस्वी. 'तोच पारा परम चपळ । न धरवे कोणा तेजाळ ।' २ उदमा; भव्य; छानदार; शोभिवंत. तेजित-वि. १ झिलई, उजळा दिलेला. २ धार लावलेला. तेजोभंग-पु. १ अपमान; अवमान; अपमानपूर्वक अथवा तिरस्कारपूर्वक वागविणें; होणारा अपमान अथवा फजिती. २ तेजाचा, पराक्रमाचा नाश; वीर्यहानि. 'सर- कारी शाळांतून मिळत असलेलें शिक्षण भावी पिढीचा तेजोभंग व निरूत्साह करण्याकरितां मुद्दाम वेड्यावांकड्या रीतीनें दिलें जात आहे.' -टि ३.१३३. तेजोमय-वि. प्रकाशमय; तेजस्वी; पाणीदार; भव्य. तेजोवध-पु. तेजोभंग; पाणउतारा. तेजोवृध्दि- स्त्री. प्रकाश, कांति, शोभा, मोठेपणा, यश इ॰ कांची वाढ. तेजो- हानि-स्त्री. १ प्रकाशाची न्यूनता, कमतरता; पराक्रमाची वाढ खुंटणें; वीर्यनाश. २ अपमान; अवमान; प्रतिष्टा, नांवलौकिक, कीर्ति यांची हानि. तेजोर्‍हास-पु. तेजोहानि पहा. तेजोमेघ- न. आकाशामध्यें कापसाप्रमाणें विरळ, तेजोयुक्त भाग दिसतो तो; केंद्रीभूत होण्यापूर्वीं तेजाची विरलावस्था; पटल; भूर. (इं.) नेब्युला. तेजोवहमज्जातंतू-पुअव. तेजाचें ज्ञान करून देणारे किंवा तेजाचें वहन करणारे ज्ञानतंतु.
तेज—वि. तीक्ष्ण; तिखट; चलाख. [सं. तेजस्; फा. तेझ्]
उत्तर लिहिले · 16/7/2023
कर्म · 53750
0

तेजी म्हणजे काय:

तेजी म्हणजे अर्थव्यवस्थेतील एक अशी स्थिती जिथे वस्तू व सेवांची मागणी वाढते, उत्पादन वाढते, आणि लोकांकडे पैसा जास्त येतो. यामुळे कंपन्यांचा नफा वाढतो, गुंतवणूक वाढते आणि एकूणच आर्थिक क्रियाकलाप वाढतात.

तेजीची कारणे:

  1. मागणीत वाढ: जेव्हा लोकांची क्रयशक्ती वाढते, तेव्हा वस्तू आणि सेवांची मागणी वाढते.
  2. गुंतवणूक: कंपन्या नवीन उद्योग सुरू करण्यासाठी किंवाExisting उद्योगांचा विस्तार करण्यासाठी गुंतवणूक करतात, त्यामुळे मागणी वाढते.
  3. सरकारी धोरणे: सरकार कर सवलती, अनुदान आणि सार्वजनिक खर्चात वाढ करते, त्यामुळे आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळते.
  4. व्याज दर: बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध झाल्यास, लोक अधिक कर्ज घेतात आणि खर्च करतात, ज्यामुळे मागणी वाढते.
  5. तंत्रज्ञान: नवीन तंत्रज्ञानाचा विकासामुळे उत्पादन प्रक्रिया सुधारते आणि नवीन उत्पादने बाजारात येतात, ज्यामुळे आर्थिक विकास होतो.
  6. निर्यात: जेव्हा देशातून जास्त माल बाहेर पाठवला जातो, तेव्हा देशातील कंपन्यांना जास्त पैसे मिळतात आणि त्यामुळे अर्थव्यवस्था सुधारते.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 3480

Related Questions

आपण सोनं घेताना जीएसटी भरतो, तसा सोनं विकताना आपल्याला जीएसटी मिळतो का?
शासकीय फी नजराना म्हणजे काय?
भारतीय अर्थव्यवस्थेत पशुधनाचे महत्त्व विषद करा?
माथाडी कामगारांना पगार कमीत कमी किती असू शकतो?
माथाडी कामगारांचा पगार किती असतो?
सामान्य कर्जासाठी लागणारी कागदपत्रे कोणती?
दरसाल 8% व्याजदराने 3.5 वर्षासाठी 350 रुपयांच्या कर्जाऊ रकमेवर सरळव्याज किती?