2 उत्तरे
2
answers
आपण समाजाचे देणे लागतो काय, विशद करा?
2
Answer link
आपण समाजाचे देणे लागतो काय,
आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतून ढुसण्या देत असते. आपण व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असतेआपण व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतून ढुसण्या देत असते.
आपण व्यक्ती म्हणून समाजाचे काही देणे लागतो. आपले कुणाकडेही लक्ष नसले, तरी समाजाचे आपल्याकडे लक्ष असते. त्यामुळे आपल्या जगण्या-वागण्यावर अनेकदा मर्यादा येतात. आपण कुठेही आणि कसेही वागू शकत नाही. सामाजिक उत्तरदायित्व नावाची गोष्ट सतत आतून ढुसण्या देत असते. त्यामुळे आपले वर्तन हे सामाजिक जीवनाला साजेसे असावे लागते आणि ते तसे हवेही; कारण व्यक्ती जर यशाच्या शिखरावर जात असेल, तर लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या असतात. तो जे सांगतो त्या उपदेशापेक्षा तो जे वागतो त्याचे अनुकरण समाज करतो. एक साधा दृष्टान्त असा आहे की, कोणतेही नीतिशास्त्र पुस्तकांमधून शिकविल्यानंतर ते जेवढे रुजते त्यापेक्षा ते अधिक एखाद्याच्या वर्तनातून दिसले, तर परिणामकारक ठरते.
त्यामुळेच संत ज्ञानेश्वरांपासून अनेकांनी वर्तनावर भर दिला आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, ‘मार्गाधारे वर्तावे’ संत तुकाराम म्हणतात, ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ याचाच अर्थ व्यक्ती जीवनात वर्तनाला महत्त्व आहे. समाजातले प्रतिष्ठित, थोर लोक जे आचरण करतात, त्याच्या अनुकरणाचे प्रतिबिंब जागोजागी पडत असते.
सध्या डॉक्टर, उद्योगपती, न्यायाधीश आदींकडे समाजाचे लक्ष असते. त्यामुळे स्वतःचे आचरण सामाजिकदृष्ट्या सुयोग्य असण्याकडे प्रत्येकाचा कल हवा. कुणाचीही कॉपी असणे हे योग्य नाही; हे जरी सत्य असले, तरी गुणात्मकतेकडे लक्ष देऊन लोक पुढे जात राहतात. आजवर समाजाचे चलनवलन असेच होत आले आहे.
प्रत्येक पिढीत नवे काही करू इच्छिणारा जन्माला येतो; पण तो असलेल्या मुद्द्यांमध्ये आणि ती आचरण करण्याच्या प्रक्रियेत फक्त प्रयोग करतो. त्यामुळे, पिढीगणिक नवा विचार जन्माला येतो, असे जे म्हटले जाते त्याचे कारण या प्रक्रियेत आहे. आपले समाजाशी असणारे नाते हे जरी आपल्याला सुखावह वाटत असले, तरी आपण अंतर्यामी एकटेच असतो. तो एकटेपणा साधनेत परिवर्तित करून जे जे काही आत्मसात करता येईल ते करणे आणि त्याचा उपयोग पुन्हा समाजाच्या कल्याणासाठी करणे, हे अटळ चक्र आहे. या चक्रात जो बसतो त्याला समाज आपल्या मनात मानाचे स्थान देतो.
उन्नती किंवा यश ही प्रक्रिया सोपी नाही. त्यात खाचखळगे असतातच. एक साधा न्याय आपण लक्षात घेतला पाहिजे की, जो परीक्षेत पास होण्याची अपेक्षा बाळगून असतो त्याचीच परीक्षा घेतली जाते. ज्यांचा परीक्षा या विषयावर विश्वास नाही ते शाळेपासून, शिक्षणापासून दूर असतात. हेच उदाहरण जीवनात सर्वत्र आहे. एक परीक्षा पास झालात, की पुढची परीक्षा अशी ही शृंखला न संपणारी असते. जीवनात प्रत्येक टप्प्यावर सुखात आणि दु:खात अशा अगणित परीक्षा येत असतात. जो हरला तो संपला, हा नैसर्गिक न्याय आहे. ज्याला याची जाणीव झाली तो समाजजीवनात उडी घेतो. कोणतेही आवडीचे क्षेत्र आपलेसे करणे, त्यात प्रावीण्य मिळविणे, त्यातून आसपासच्या लोकांचे कल्याण साधणे ही सुरुवातीला मुद्दाम केलेली आणि नंतर अंगवळणी पडल्याने अनाहूत घडणारी प्रक्रिया म्हणजेच सगुण-निर्गुण उपासना नाही का?
हे सगळे ज्याला समजते त्या समाजपुरुषाच्या ठिकाणी तुम्हाला कधी दु:ख दिसत नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्यभाव येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणादायी असतात. अशीच माणसे प्रेरणेचे क्षण निर्माण करतात व वाटून मोकळे होतात. अशा व्यक्ती अल्पसंख्येत असतात. भराभर वाढणाऱ्या तणाप्रमाणे त्यांचे पीक नसते. एखादा असा समाजचिंतक असणे हे सामाजिक आरोग्याचे खरे लक्षण आहे. समुद्रात लाटांवर लाटा याव्यात आणि एकमेकींवर आदळून विराव्यात, हे काही नवनिर्माण नव्हे. तसे, समाजचिंतकांचेही आहे. आज सर्वत्र एकच ओरड असते, की मोठी माणसे राहिली नाहीत. मला वाटते की ती आहेत पण आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आपली दृष्टी स्वच्छ हवी.
0
Answer link
होय, आपण समाजाचे देणे लागतो. प्रत्येक व्यक्ती समाजाचा एक भाग असतो आणि त्यामुळे समाजासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी आपल्यावर असते.
आपण समाजाचे देणे लागतो हे विविध प्रकारे स्पष्ट करता येते:
- नैसर्गिक देणं: ज्या समाजात आपण जन्म घेतो, वाढतो आणि शिक्षण घेतो, त्या समाजाच्या संसाधनांचा आपण उपयोग करतो. त्यामुळे समाजासाठी काहीतरी करणे हे आपले कर्तव्य आहे.
- सामाजिक बांधिलकी: माणूस हा समाजशील प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. समाजाच्या प्रगतीमध्येच व्यक्तीची प्रगती असते. त्यामुळे समाजाला सहकार्य करणे आवश्यक आहे.
- नैतिक जबाबदारी: आपल्या समाजातील गरजू लोकांना मदत करणे, अन्याय व भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
- भावी पिढीसाठी: आज आपण जे चांगले काम करतो, त्याचा फायदा भावी पिढीला होतो. त्यामुळे आपल्या पुढच्या पिढीसाठी एक चांगले भविष्य निर्माण करणे आपले कर्तव्य आहे.
आपण समाजाचे देणे अनेक प्रकारे फेडू शकतो:
- शिक्षण आणि ज्ञानदान: गरीब मुलांना शिक्षण देणे, लोकांना साक्षर करणे.
- आरोग्य सेवा: आरोग्य शिबिरे आयोजित करणे, रक्तदान करणे.
- स्वच्छता: आपल्या परिसराची स्वच्छता करणे, कचरा व्यवस्थापनात मदत करणे.
- सामाजिक कार्य: सामाजिक संस्थांमध्ये स्वयंसेवा करणे, नैसर्गिक आपत्तीत मदत करणे.
- प्रामाणिक नागरिक: कर वेळेवर भरणे, कायद्याचे पालन करणे.
थोडक्यात, प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार समाजासाठी काहीतरी योगदान देणे आवश्यक आहे.
या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: