2 उत्तरे
2
answers
दुष्काळ झाल्यास तुम्ही काय कराल?
0
Answer link
दुष्काळ झाल्यास काय करावे
सब-सरफेस डॅम म्हणजे जमिनीखाली बांधण्यात येणारी धरणे. यांचा खर्च कमी आणि फायदे अगणित आहेत. यात गाळ साठत नाही. बाष्पीभवन होत नाही. पुराचा धोका नाही आणि खर्चही कमी. आज जपान, ब्राझील, केनिया या देशांनी तसेच काही राज्यांनी ही धरणपद्धत यशस्वी केली आहे. आपणही ती करायला हवी...
..................
सध्या अवघा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. धरणातील दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या जलसाठ्याने चिंता कमालीची वाढविली आहे. एरवी मार्चपासून पाण्याची झळ किती बसणार याचा नेमका अंदाज येतो. यंदा ही स्थिती फेब्रुवारीतच उद्भवली. औरंगाबाद विभागात आताच भीषण स्थिती आहे. त्यानंतर नागपूर विभाग जलसंकटाच्या भीषण सावटात सापडला आहे. अन्य विभागांतही स्थिती याहून वेगळी नाही. दरवर्षी कमी-अधिक प्रमाणात आपल्याकडे हेच चित्र बघायला मिळते. पाण्याच्या नैसर्गिक स्रोतापासून जलसमृद्धी कशी साधता येईल याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. अशावेळी 'सब-सरफेस डॅम' हा उत्तम उपाय ठरतो. पाणीटंचाई, दुष्काळ व पूर या सर्वांवर यामुळे मात शक्य होते.
बऱ्याच नद्यांमधून पाणी वाहून समुद्रास मिळते. अशा पाण्याचा साठा उपयोगात येत नाही. पावसाळ्यामध्ये पुराद्वारे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जाते. पुरामुळे पर्यावरणाचे, मालमत्तेचे नुकसान होते. मोठा आर्थिक फटका बसतो. नद्यांतील जमीन समांतर वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करून नदीचे पाणी खाली जमिनीमध्ये झिरपवून पाण्याचा साठा तयार करण्याकरिता ही सब-सरफेस धरणे बांधली जातात. त्यामुळे, तयार होणाऱ्या तटबंदीने नदीपात्रातील पाणी खालील पोकळ जमिनीत पाझरून पाण्याचा साठा तयार होतो. नदीच्या पात्रातील वाळू वापरून नदीच्या पात्रात ज्या ठिकाणी कमी खोलीवर टणक दगड असेल, अशा ठिकाणी हे धरण बांधण्यात येते. अशा प्रकारच्या धरणामुळे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा तयार होतो. धरणातील पाणी पंपाद्वारे किंवा विहिरींच्या माध्यमातून वर्षभर उपलब्ध होऊ शकते. दुष्काळावर पूर्णपणे मात शक्य होते. अशा धरणातील पाणीसाठ्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. जवळील विहिरांना बारा महिने पाणी राहते. महत्त्वाचे म्हणजे या धरणामुळे जमिनीमध्ये कोणताही बदल होत नाही. असे धरण फुटण्याची भीतीही राहत नाही.
सब-सरफेस धरण बांधण्याचा खर्च हा पारंपरिक धरण बांधण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा खूपच कमी आहे. त्याच्या व्यवस्थापनावरील खर्चसुद्धा कमी आहे. पारंपरिक धरणांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. जसे धरणामुळे पाण्याखाली गेलेली उपयुक्त जमीन, प्रभावित झालेली लोकसंख्या, विस्थापित झालेली गावे, पर्यावरणावर होणारा परिणाम इत्यादी. अशा धरणांमधील पाण्याचा साठा बाष्पीभवनामुळे कमी होत जातो आणि पाण्यासोबत वाहत येणाऱ्या गाळामुळे साठवणूकक्षमता कमी होत जाते. याविरुद्ध सब-सरफेस धरण हे जमिनीखाली बांधण्यात येत असल्यामुळे अशा सर्व समस्यांपासून मुक्त आहे. जमिनीखालील पाण्याच्या साठ्यामुळे नदींना येणाऱ्या पुरापासून संरक्षण मिळते. हे धरण पुरामुळे क्षतिग्रस्त होण्याची भीती नसते.
नद्यांच्या पात्राचा अभ्यास, प्रवाह, पावसाचे प्रमाण, जमिनीची संरचना इत्यादी बाबी लक्षात घेऊन सबसरफेस धरणे बांधल्यास शेती, उद्योग यांची पाण्याची गरज पूर्ण करता येऊ शकते. हे धरण ओला दुष्काळ आणि कोरडा दुष्काळ यावर उत्तम उपाय आहे. विकासाच्या वेगवान प्रवाहासाठी सब-सरफेस धरण एक प्रभावी माध्यम आहे. मोठ्या नद्यांमध्ये किंवा त्यांच्या उपनद्यांमध्ये या धरणांची मालिका उभारल्यास पाण्याचे मोठे साठे व स्रोत तयार होतील. सदर पाण्याची गुणवता पारंपरिक धरणातील पाण्यापेक्षा सरस आढळली आहे. त्यामुळे जमिनीची प्रत वाढविण्यास मदत झालेली आहे.
0
Answer link
दुष्काळ पडल्यास मी खालील उपाययोजना करू शकेन:
-
परिस्थितीचा आढावा: दुष्काळाची तीव्रता आणि त्याचा प्रभाव याबद्दल माहिती मिळवणे.
-
गरजू लोकांना मदत: पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, अन्नाची मदत पुरवणे आणि तात्पुरता निवारा देणे.
-
पाण्याचे व्यवस्थापन: पाण्याचा वापर जपून करणे, पाण्याची गळती थांबवणे आणि पुनर्वापराच्या योजना तयार करणे.
-
शेतीसाठी उपाय: शेतकऱ्यांसाठी जलसंधारणाच्या योजना, दुष्काळात तग धरणाऱ्या पिकांचे मार्गदर्शन आणि आर्थिक मदत उपलब्ध करणे.
-
जागरूकता: दुष्काळाच्या परिणामांबद्दल लोकांना माहिती देणे आणि त्यांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित करणे.
-
दीर्घकालीन योजना: भविष्यात दुष्काळ येऊ नये यासाठी उपाययोजना करणे, जसे की वृक्षारोपण, तलाव आणि बंधारे बांधणे.
या उपायांमुळे दुष्काळाच्या परिस्थितीत लोकांना मदत करता येईल आणि त्याचे गंभीर परिणाम कमी करता येतील.