समाजशास्त्र आदिवासी

आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये कोणती आहेत?

2 उत्तरे
2 answers

आदिवासी समुदायाची वैशिष्ट्ये कोणती आहेत?

0
आदिवासी समाज हा अतिप्राचीन मुळ भारतीय समाज आहे. एकेकाळी भारतीय वनसंपत्तीचा मालक असणारा हा समाज इंग्रजांच्या आर्थिक शोषणामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल बनत गेला. आदिवासी म्हणजे आदिकाळापासुन वास्तव्य असणारा समुह होय. आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे. त्यांच्या दैनंदिन जीवनाचे इतर समाजाशी काही देणेघेणे नसते. त्यांचे देव, भाषा आणि चालीरीती अन्य ग्रामीण आणि शहरी लोकांपेक्षा भिन्न असतात. जंगलात राहणारे काही आदिवासी तेथील उत्पादने शहरांत आणून विकतात. भारतीय राज्यघटनेत अशा आदिवासीचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये केला आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना नोकरी-व्यवसायात आणि निवडणुकांत उमेदवार म्हणून त्यांच्यासाठी खास जागा ठेवल्या आहेत. भारतात ९ ऑगस्ट हा दरवर्षी आदिवासी दिवस म्हणून साजरा होतो. आदिवासी लोक भारताखेरीज जगातील अन्य देशांतही आहेत. इ.स. १९६२ साली शिलाँगमध्ये आदिवासी समितीच्या परिषदेने आदिवासीची व्याख्या पुढील प्रमाणे केली आहे "एका समान भाषेचा वापर करणान्या, एकाच पूर्वजापासून उत्पत्ती सांगणाऱ्या, एका विशिष्ट भू-प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या 


तंत्रशास्त्रीय ज्ञानाच्या दृष्टीने मागासलेल्या, अक्षरओळख नसलेल्या व रक्तसंबंधावर आधारित, सामाजिक व राजकीय रीतिरिवाजांचे प्रामाणिक पालन करणाऱ्या एकजिनसी गटाला 'आदिवासी समाज म्हणताता.
उत्तर लिहिले · 5/12/2022
कर्म · 53710
0

आदिवासी समुदायाची काही वैशिष्ट्ये:

  • भौगोलिक एकाकीपणा: आदिवासी समुदाय सहसा दुर्गम आणि डोंगराळ भागात राहतात.
  • विशिष्ट संस्कृती: त्यांची स्वतःची भाषा, चालीरीती, परंपरा आणि कला आहेत.
  • समान संस्कृती: आदिवासी समुदायांमध्ये सामाजिक समानता आढळते.
  • आर्थिक मागासलेपण: ते सहसा गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतात.
  • राजकीय प्रतिनिधित्व: राजकीय प्रक्रिया आणि प्रशासनात सहभाग कमी असतो.
  • प्रकृतीवर अवलंबित्व: ते उपजिविकेसाठी नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असतात.
  • शिकार आणि अन्न गोळा करणे: काही आदिवासी समुदाय अजूनही शिकार आणि अन्न गोळा करण्यावर अवलंबून आहेत.
  • आत्मनिर्भरता: ते त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःवरच अवलंबून असतात.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1220

Related Questions

आदिवासी कोणास म्हटले जाते?
ठाणे जिल्ह्याची आदिवासी जमात?
तुम्हाला माहीत असलेल्या तीन आदिवासी जमातीची नावे सांगा?
तुम्हाला माहीत असलेल्या तीन आदिवासी जमातींची नावे सांगा?
आदिवासी कोण आहे?
भिल्ल आदिवासी जात एवढी मागासलेली का आहे?
भारतीय आदिम समुदायाची वैशिष्ट्ये काय आहेत?