शिक्षण कागदपत्रे प्रमाणपत्र

दहावी बोर्ड सर्टिफिकेटवरील जन्म तारखेत महिना चुकला आहे, तो कसा बदलता येईल?

3 उत्तरे
3 answers

दहावी बोर्ड सर्टिफिकेटवरील जन्म तारखेत महिना चुकला आहे, तो कसा बदलता येईल?

2
माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही तुमच्या शाळेत जाऊन यावर चर्चा करा. शाळेकडून कोणतीही मदत न मिळाल्यास तुम्ही एफिडेव्हिट बनवा आणि त्यानंतर गॅझेट बनवा. याने तुमच्या मार्कशीटवरील जन्मतारीख बदलणार नाही, पण तुम्हाला पुढे अडचण आल्यास एफिडेव्हिट किंवा गॅझेट उपयुक्त ठरेल.
उत्तर लिहिले · 15/10/2022
कर्म · 120
2
दहावी बोर्ड सर्टिफिकेटवरील जन्म तारखेत महिना चुकला आहे दुरुस्ती

त्या साठी तुम्हाला शालेमार्फत किंव्हा स्वतला थेट बोर्डात ज्यावे लागेल. 
(म्हणजेच बोर्ड
 पुणे: नागपूर: औरंगाबाद: मुंबई: कोल्हापूर: अमरावती: नाशिक: लातूर: कोकण: तुम्ही कोणती बोर्डात येतं त्या बोर्डात जावे लागेल)

त्या साठी आवश्यक कागदपत्रांची माहिती शाळेत मिळेल व शाळेतून भेटतील

सोबत 
आधार कार्ड 
असेल तर शाळा सोडल्याचा दाखला ( TC)
ग्रापंचायत कार्यालयाचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र 
स्वतः चे शपथपत्र (बाँड)
पासफोटो 

( टीप : प्रथम तुम्ही शाळेत भेट देया तेथून योग्य माहिती व योग्य मारगदर्शन मिळेल त्याचा प्रथम त्याचा विचार करावा धन्यवाद)

#Rutesh Sagvekar सर यांनी दिलेल्या उत्तर एक वेळ वाचून घ्यावे

उत्तर लिहिले · 17/10/2022
कर्म · 7460
0
तुमच्या दहावी बोर्ड सर्टिफिकेटवरील जन्म तारखेतला महिना बदलायचा असल्यास, तुम्हाला खालील गोष्टी कराव्या लागतील:

1. अर्ज:

  • तुम्हाला तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत बोर्डाला अर्ज करावा लागेल.
  • अर्ज भरताना, तुमचाregister number(नोंदणी क्रमांक), seat number (बैठक क्रमांक) आणि जन्मतारखेचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
  • 2. आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • जन्म दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
  • ओळखपत्र
  • 3. बोर्डाची प्रक्रिया:

  • बोर्ड तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करेल.
  • पडताळणी झाल्यावर, बोर्ड तुमच्या सर्टिफिकेटमध्ये आवश्यक बदल करेल.
  • 4. संपर्क:

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: msbshse.ac.in
  • तुम्ही शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयातही संपर्क साधू शकता.
  • टीप:

  • अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती वेळोवेळी बदलू शकते, त्यामुळे बोर्डाच्या वेबसाइटला भेट देऊन खात्री करून घ्यावी.
  • उत्तर लिहिले · 25/3/2025
    कर्म · 980

    Related Questions

    हरवलेले MS-CIT प्रमाणपत्र परत कसे मिळवावे? दहा वर्षांपूर्वी कोर्स केला होता, आता काही दिवसांपूर्वी प्रमाणपत्र हरवले आहे.
    ST cast certificate?
    लेविंग सर्टिफिकेट म्हणजे काय?
    व्यापारी पत्र आणि ठेवींचे प्रमाण पत्र काय आहे?
    मला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र काढायचे आहे, पण माझ्या वडिलांच्या शाळेच्या दाखल्यावर त्यांचे नाव ज्ञानदेव आहे आणि माझ्या वडिलांचे (आधार कार्ड व इतर कागदपत्रांनुसार) नाव गिण्या नदेव आहे, आणि माझ्या आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला नाहीये. सर म्हणतात की त्या नावाचे शाळेत रेकॉर्ड नाही, मग मी काय करावे?
    10वी गुणपत्रिका गहाळ झाली आहे?
    दीक्षा किंवा फॉर्मवर नोंदणी करून कोणताही एक कोर्स पूर्ण केल्यावर त्याचे प्रमाणपत्र मिळेल का?