मराठी कविता

क्षेत्रभेत म्हणजे काय?

क्षेत्रभेट म्हणलं कि आपल्या परिसरातील विविध जागा जसे कि दवाखाना, पोलीस स्टेशन, न्यायालय, शेत, जंगल, एखादी संस्था, मंदीर ई. यांना भेट देणे असा समज होतो. पण हे सर्व तर आपण सहलीतही करतोच. क्षेत्रभेट व सहल यामध्ये खूप सारे फरक करता येतील. जेव्हाही आपण एखादी जागा पहायला (SEE) जातो. त्या भेटीतून आपल्याला कशाची माहिती मिळते हे आपण तिथे जाऊन काय बघतो (LOOK) यावर अवलंबून असते. तर मिळणारे ज्ञान हे आपण तिथे कशाचे निरीक्षण(OBSERVE) करतो यावर अवलंबून असते.

म्हणजेच या तीनही गोष्टी निरनिराळ्या आहेत व त्यांचे फायदे निरनिराळे आहेत. 



उदा. समजा आपण ताडोबाचे जंगल पाहायला गेलो आहोत. आता आपण जंगल पाहायला गेलो म्हणजे जंगलात खूप साऱ्या गोष्टी आहेत. झाडे आहेत, इतर प्राणी आहेत, तलाव आहेत पण आपण जर फक्त वाघ शोधत असू तर इतर गोष्टी आपल्याला अगदीच ओझरत्या दिसतील. व वाघदेखील आपण फक्त बघितलेलाच असेल. 



पण जेव्हा आपण त्या दिसलेल्या वाघाचा अभ्यास करू, त्यावर विचार करू तेव्हा अगणित गोष्टी शिकायला मिळू शकतील. उदा. वाघ एकटा दिसला म्हणजे वाघ एकत्र राहत नसावेत. मग या वाघाच्या परिसरात दुसरा वाघ आला तर काय होईल हे शोधलं पाहिजे. किंवा हा वाघ लंगडत चालत होता म्हणजे त्याला काही इजा झाली असेल का हे शोधता येईल

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

क्षेत्रभेत म्हणजे काय?

Related Questions

कथेची संकलपणा स्पश्ठ करा?
खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण कोणते येईल? धन्य करी माझी कूस येई विजयी होऊन पुन्हा माझिया हाताने दुधभात भरवीन?
केशवसुतांच्या प्रीती कवितेतून कशाची माहिती सांगितली आहे?
आकाशात कवीला इंद्रधनुष्य पाहून काय वाटते?
मराठी काव्याचा प्रभात काल असे कोणी म्हटले आहे?
कवितेची व्याख्या कशी स्पष्ट कराल?
बहिणीसाठी एक कविता मिळेल का?