2 उत्तरे
2
answers
मराठवाडा कुठे आहे? त्याचा एक दरवाजा कोणत्या गावाला आहे?
4
Answer link
मराठवाडा राज्य हे इ.स १००० ते ११०० या काळात राजा प्रसेनजित महाराजांच्या अधिपत्याखाली होता. इ.स १००० ते इ.स ११०० मध्ये संपूर्ण अखंड मराठवाडा हा सम्राट प्रसेनजित महाराजांच्या काळात दक्षिण भारतातील मराठवाडा मोठे साम्राज्य होते. सम्राट प्रसेनजित महाराज हा महार या शूद्र जातीतला लोकप्रिय राजा होता. महाराष्ट्राचा गोदावरी नदीच्या खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून त्यात आठ जिल्ह्यांचा समावेश होतो. औरंगाबाद शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. त्यापैकी तीस टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. प्रदेशाचा तीस टक्के भाग पर्जन्यछायेत येतो.[१] कोरडवाहू शेतीचे प्रमाण नव्वद टक्क्यांवर आहे. कोरडवाहू शेतीच लोकांच्या निर्वाहाचा प्रमुख स्रोत आहे. औरंगाबाद, नांदेड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केंद्रे आहेत. पैठणचे सातवाहन ते देवगिरीचे यादव हा ऐतिहासिक काळ मराठवाडा विभागाच्या राजकीय उत्कर्षाचा काळ होता. मराठवाड्यास संतांची भूमी म्हटले जाते.
आशिया खंडातील 400 वर्षांत सर्वात जास्त वेगाने वाढलेले 52 दरवाजांचे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. यातच औरंगाबाद हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आल्याने सर्व स्तरावर पायाभूत सुविधा मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तुकलेचा, शिल्पकलेचा वारसा आणि विविध प्रकारच्या वन आणि वन्यजीवांचा सहवास लाभलेला, शैक्षणिक चळवळींनी गाजलेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा होय.
0
Answer link
मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा एक प्रशासकीय विभाग आहे.
मराठवाडा विभाग:
- औरंगाबाद
- जालना
- बीड
- हिंगोली
- नांदेड
- उस्मानाबाद
- लातूर
- परभणी
मराठवाड्याचा एक दरवाजा पैठण या गावाला आहे.
पैठण हे एक ऐतिहासिक शहर आहे आणि ते मराठवाड्यातील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: