भूगोल नकाशा वितरणाचे नकाशे

वितरनाचे नकाशे म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

वितरनाचे नकाशे म्हणजे काय?

1
अ) वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो. कारण :- वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश एखाद्या घटकाचे प्रदेशातील वितरण दाखवणे हा असतो. (आ) क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते.

तुम्ही मागील इयत्तांमध्ये परिसर अभ्यास व भूगोल विषयात जिल्हा, राज्य व देशांच्या नकाशांचा अभ्यास केला आहे. नकाशांचा उद्देश प्रामुख्याने ठिकाणाचे स्थान व चलांचे वितरण दाखवणे हा असतो. काही हा नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात येतात. त्यांना उद्देशात्मक नकाशे असे संबोधतात. अशा नकाशांद्वारे विविध घटकांचे प्रदेशातील वितरण दाखवले जाते. एखाद्या प्रदेशातील पर्जन्य, तापमान, लोकसंख्या इत्यादींचे वितरण त्या घटकांच्या आकडेवारीनुसार नकाशात दाखवले जाते.

या नकाशांचा उपयोग प्रदेशातील घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करण्यासाठी होतो. अशा नकाशांतून घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध चटकन लक्षात येतो. वितरणाचे नकाशे काढण्यासाठी संबंधित घटकांची सांख्यिकीय माहिती आवश्यक असते. नकाशांमध्ये हे वितरण खालील तीन प्रकारे दाखवता येते.
उत्तर लिहिले · 23/8/2022
कर्म · 53710
0
काही नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात येतात, त्यांना उद्देशात्मक नकाशे असे म्हणतात.
उत्तर लिहिले · 30/8/2022
कर्म · 55
0

वितरणाचे नकाशे हे विशिष्ट क्षेत्रात एखाद्या गोष्टीचे वितरण कसे झाले आहे हे दर्शविण्यासाठी वापरले जाणारे नकाशे आहेत.

हे नकाशे खालील गोष्टी दर्शवण्यासाठी उपयोगात येतात:

  • लोकसंख्या वितरण
  • खनिज वितरण
  • वनांचे वितरण
  • पर्जन्याचे वितरण
  • तापमानाचे वितरण

वितरण नकाशांचे प्रकार:

  1. ठिपक्यांचे नकाशे: हे नकाशे एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील घटकांची घनता दर्शवण्यासाठी ठिपक्यांचा वापर करतात.
  2. समघनी नकाशे: हे नकाशे समान मूल्याच्या क्षेत्रांना जोडणाऱ्या रेषा वापरतात.
  3. क्षेत्रीय नकाशे: हे नकाशे विविध क्षेत्रांमध्ये डेटा दर्शवण्यासाठी रंग किंवा छाया वापरतात.

वितरण नकाशे भूगोल, पर्यावरण, लोकसंख्याशास्त्र आणि अर्थशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये उपयुक्त आहेत.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040