नोकरी अभ्यास मानसशास्त्र करियर मार्गदर्शन

मला सरकारी नोकरीची तयारी करायची आहे, पण माझे मन अभ्यासात लागत नाही, काय करावे?

2 उत्तरे
2 answers

मला सरकारी नोकरीची तयारी करायची आहे, पण माझे मन अभ्यासात लागत नाही, काय करावे?

4
अभ्यासात मन लागणे अन् नाही लागणे हा तुमच्या मनाचा खेळ आहे. ज्या सरकारी पदासाठी तुम्ही अभ्यास करत आहात त्या पदासाठीचा अभ्यासक्रम काय आहे हे आधी सुनिश्चित करा. घरी अभ्यास होत नाही, एखाद्या ग्रंथालयात जाऊन अभ्यास करा किंवा निसर्गाच्या सान्निध्यात. जे गोष्ट तुम्हाला समजत नाही त्यासाठी YouTube वर खूप व्हिडिओ आहेत. उदा. शिवाजी महाराज यांचा इतिहास हा समजाऊन घेण्यासाठी अगोदर शिवाजी महाराज यांचे चांगले व्हिडिओ, ते कशे दिसतात, त्यांचे चित्रपट, बघून नंतर पुस्तके वाचावीत ज्यामुळे तुम्हाला जास्त समजेल. शिवाजी महाराज यांच्या काळातील राजे, त्यांचे मित्रमंडळी, प्रजा, त्यांच्यासाठी तपशीलवार माहिती ग्रहण करावीत. जसे विकिपीडिया पेज वर तुम्ही जाता त्यामध्ये article लिहिले असते. त्यामध्ये लिंक सुद्धा असतात जे तुम्हाला दुसऱ्या पेज वर घेऊन जाते. तसेच तुम्हाला येथे अभ्यासात करायचे आहे. रट्टा मारून चालणार नाही. तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा जेणेकरून भविष्यात त्या दुसर्यांच्या कामी पडेल. स्वतःच्या नोट्स तयार केल्या शिवाय अभ्यास होत नाही तसेच तुमची स्वतःची रणनिती तयार करा. व्यर्थ प्रपंच करू नका. अभ्यासात ध्यान द्या. याराना दोस्ताना आणि समाज वक्तावर कामी पडत नाही. तुमचा पैसा, तुमची मेहनत, तुमचे ज्ञान आणि तुमचा परिवार ह्याच खर्‍या रूपाने तुमच्या सोबत असतील. हे अनुभव माझे आहेत, हे तुम्हाला नंतर तुमच्या अनुभवावरून सांगता येईल की माझे शब्द नि शब्द बरोबर आहेत.
उत्तर लिहिले · 16/8/2022
कर्म · 44255
0

सरकारी नोकरीची तयारी करताना अभ्यासात लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. काही उपाय:

1. ध्येय निश्चित करा:

  • तुम्हाला कोणत्या प्रकारची सरकारी नोकरी हवी आहे ते निश्चित करा.
  • नोकरीचे महत्त्व आणि फायदे समजून घ्या.

2. अभ्यासाचे नियोजन करा:

  • वेळेचे व्यवस्थापन करा आणि अभ्यासासाठी नियमित वेळ काढा.
  • अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा आणि त्याचे पालन करा.
  • विषयानुसार वेळ विभागून घ्या.

3. अभ्यासाचे तंत्र:

  • एकाच जागी जास्त वेळ बसून अभ्यास करू नका.
  • ब्रेक घ्या आणि आराम करा.
  • Group Study करा. मित्रांसोबत चर्चा करा.
  • Concept समजून घ्या. पाठांतर करण्यावर भर देऊ नका.

4. प्रेरणा मिळवा:

  • यशस्वी लोकांच्या कथा वाचा.
  • Motivational videos पाहा.
  • सकारात्मक विचार करा.

5. शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपा:

  • नियमित व्यायाम करा.
  • पुरेशी झोप घ्या.
  • ध्यान करा.

6. मदत घ्या:

  • मार्गदर्शकांशी बोला आणि मार्गदर्शन घ्या.
  • समस्यांवर तोडगा काढा.

टीप: हे उपाय तुम्हाला अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास मदत करतील.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1440

Related Questions

नोकरी करून सरळ सेवेची तयारी कशी करावी?
गेल्या दहा वर्षांपासून मी विद्युत अभियंता पदाकरिता तयारी करत आहे, मात्र मला यश मिळत नाही, तरी उपाय सुचवावा. ऑफलाइन, ऑनलाइन, सेल्फ स्टडी, लायब्ररी सर्व पद्धतीने अभ्यास केला आहे.
MPSC साठी कॉम्प्युटर कोर्स करणे अनिवार्य आहे का?
Station master banne ke liye kaunsi notebook achhi hai? Main preparation chalu kar raha hu, meri req.... hai sir?
ते कोणत्या वयोगटाशी अथवा व्यवसायाशी निगडित आहेत ते लिहा?
12 वी सायन्स नंतर करिअर कश्यात करावे?
माझं मेकॅनिकल इंजिनीअरिंग डिग्री पूर्ण झाली आहे. पण मी आयटी क्षेत्रात काम करण्यास इच्छुक आहे. पण मी आता गोंधळून गेलो आहे की आयटी इंडस्ट्रीत जावं की मेकॅनिकलमध्येच करिअर करू, त्यामुळे कृपया मला योग्य मार्गदर्शन मिळावे?