व्यवस्थापन

शैक्षणिक व्यवस्थापनात येणारे घटक कोणते?

2 उत्तरे
2 answers

शैक्षणिक व्यवस्थापनात येणारे घटक कोणते?

0
शैक्षणिक व्यवस्थापनाचे घटक

१) नियोजन (Planning) -

एखादे कार्य करण्यापूर्वी ते कसे करावयाचे हे आगाऊ ठरविण्याच्या क्रियेला नियोजन म्हणतात. नियोजनात उद्यमाची उद्दिष्टे धोरणे, कार्यक्रम, पद्धती व उद्यमाची उद्दिष्टे साध्य करावयाचे इतर मार्ग ठरविण्याचा समावेश होतो. नियोजन म्हणजे पुढे पहाणे व भविष्यकाळाची तरतूद करून ठेवणे होय.

हिमा (Heima)

शैक्षणिक नियोजन हे केंद्रीय व राज्य पातळीवरील व्यवस्थापनाचे काम असून, त्यात शिक्षणाची राष्ट्रीय उद्दिष्टे ठरविणे, शिक्षणाची रचना ठरविणे, अभ्यासक्रम निश्चित करणे, आर्थिक व इतर साधनांची तरतूद करणे आदी कृतींचा समावेश होतो.

२) संघटन (Orgnization )

उद्दिष्टे प्राप्त व्हावीत व विविध व्यक्तींना एकत्रितरीत्या परिणामकारक काम करणे शक्य व्हावे म्हणून करावयाची कामे निश्चित करणे, ती योग्य गटात विभागणे, वैयक्तिक अधिकार व जबाबदाऱ्या शब्दबद्ध करणे व प्रदान करणे, विविध कर्मचाऱ्यांत योग्य संबंध स्थापित करणे, या बाबींचा समावेश असलेल्या प्रक्रियेस संघटन म्हणतात.

संघटनात खालील बाबींचा समावेश होतो..

५. संघटनेस स्वतःचा एक वा अनेक उद्देश असणे.

२. उद्देशाबाबत सर्वांचे एकमत होणे.
३. उद्दिष्ट प्राप्तीसाठी कामे निश्चित करणे व त्यांची योग्य गटात विभागणी करणे. ४. कमीत कमी दोघांनी एकत्रितरीत्या काम करणे.

५. गटातील प्रत्येक व्यक्तीचे अधिकार व जबाबदारी निश्चित करणे.

६. विविध व्यक्तींतील (अधिकारासंबंधी) संबंध निश्चित करणे.

७. संघटनेत संप्रेषण होणे.

८. कर्मचान्यास आवश्यक साधने पुरविणे,

शैक्षणिक बाबतीत केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मुख्याध्यापक, शिक्षक आदी अधिकार व जबाबदान्या निश्चित करण्यात आल्या आहेत. प्रत्येक शाळेतही कामाची • वाटणी केलेली असते व सर्वांचा उद्देश शाळेची जास्तीत जास्त प्रगती करणे हा असतो.

३) समन्वय (Co-ordination )

समन्वय याचा अर्थ विविध व्यक्तींची कामे एकमेकांना पूरक रीतीने केली जातात किंवा नाहीत, हे पाहणे. यासाठी संस्थेतील विविध घटकांत सामंजस्य निर्माण करणे, प्रत्येकाच्या अधिकार मर्यादा आखून देणे, प्रत्येकाच्या कामाच्या मर्यादा निश्चित करणे व हे सर्व योग्य रीतीने होते किंवा नाही, हे पाहण्याचे अधिकार कोणावर तरी सोपविणे या बाबींचा समावेश होतो.

शिक्षणाच्या विविध स्तरांवरील कार्यात समावेश राखण्यासाठी विविध शैक्षणिक अधिकार सोपविलेल्या व्यक्ती असतात. शालेय व्यवस्थापनात हे कार्य मुख्याध्यापक करतात.

४) दिग्दर्शन ( Direction) संचालन

कर्मचान्यांना मार्गदर्शन करण्याचे काम व्यवस्थापकाकडे असते. प्रथम कर्मचान्यास काम समजावून सांगणे, त्याच्या कामाचे निरीक्षण करणे व आवश्यक तेथे दिग्दर्शन करणे, मार्गदर्शन करणे ही व्यवस्थापकाची प्रमुख जबाबदारी असते. या कामात उद्देश देणे, सूचना करणे, चर्चा करणे, निरीक्षण करणे आदी बाबींचा समावेश होतो. शालेय व्यवस्थापनात मुख्याध्यापकांनी विशेषत: अध्यापनाच्या बाबतीत शिक्षकांना मार्गदर्शन करणे जरूरीचे असते.

५) संप्रेषण (Communication)

दोन किंवा अधिक व्यक्तीच्या दरम्यान होणारी वस्तुस्थिती, कल्पना, मते व भावना यांची

देवाण - घेवाण म्हणेज संप्रेषण होय.
शिक्षणातील लिखित व तोंडी संप्रेषण सुस्पष्ट असावे, व्यवस्थापकाच्या संप्रेषणामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यास त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत, याची सुस्पष्ट जाणीव व्हावी. संप्रेषणात शाब्दिक माध्यमाबरोबरच शारीरिक भाषेचाही मोठा हात असतो, याची जाणीव असावी.

६) निर्णय प्रक्रिया (Decision Making)

दोन किंवा जास्त पर्यायांमधून एका पर्यायाची निवड विशिष्ट निकषांच्या आधाराने करण्याच्या प्रक्रियेस निर्णय प्रक्रिया म्हणतात.

टेरी

यामध्ये निर्णयाबरोबरच जबाबदारीचा समावेश असतो. त्यामुळे कृती करणारे अनेक असू शकतात; परंतु निर्णय घेणारे थोडेच असतात. शालेय व शैक्षणिक बाबींचा दूरगामी परिणाम होऊ शकतात. शाळांच्या अभ्यासक्रमात कोणत्या विषयांचा समावेश कुरावयाचा त्याचे प्रमाण किती ठेवावयाचे अशा धोरणात्मक बाबींचा निर्णय उच्चस्तरीय व्यवस्थापनास करावा लागतो, तर मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थ्यांशी वागताना अनेक निर्णय घ्यावे लागतात.

७) कार्यप्रेरणा, अभिप्रेरण, प्रेरणा

विशिष्ट उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी व्यक्तींच्या ज्या आंतरिक अवस्थेमुळे उत्साहित केले जाते, कार्यप्रवृत्त केले जाते किंवा हालचाल करण्यास भाग पाडले जाते आणि वर्तनास योग्य दिशा दाखविली जाते व वर्तन सुनिश्चित मागनि नेले जाते, त्या अवस्थेत कार्यप्रेरणा असे म्हटले जाते.

८) नियंत्रण (Control)

बरेलसन व स्टेनर

संस्थेची उदिष्टे गाठण्यासाठी नियोजन केले जाते. त्यासाठी कामाची वाटणी केली जाते. ही कामे व्यवस्थित केली जातात किंवा नाही, त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे का, हा पाहणे व आवश्यक असल्यास सुधारणे करणे त्यासाठी नियंत्रण आवश्यक असते.

शैक्षणिक व शालेय व्यवस्थापनास नियंत्रण आवश्यक आहे. जोपर्यंत शैक्षणिक व शालेय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शिक्षणाच्या प्रत्येक स्तरावर नियंत्रण आवश्यक असते. सर्व संबंधित व्यक्ती त्यांच्या भूमिका व्यवस्थित पार पाडतात की नाही, हे पाहण्यासाठी सर्वांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी नियंत्रण आवश्यक आहे.
साधनसामुग्रीची जुळवा-जुळव व त्यांचा एकात्मक उपयोग होतो.

प्रत्येक व्यवस्थापकास भौतिक साधने व मनुष्यबळाची जुळवा-जुळव करावी लागते. मनुष्यबळाच्या विकासासाठी प्रशिक्षणाची सोयही करावी लागते व सर्व बाबींचा एकात्मक प्रयोग करावा लागतो.

कार्यवाही (Execution )

निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार कार्यवाही करून घेण्याची जबाबदारी व्यवस्थापकावर असते. कार्यवाहीसाठी व्यवस्थापकास वर सांगितलेल्या बाबींचा योग्य प्रमाणात उपयोग करून घ्यावा लागतो.

मुख्याध्यापक

मुख्याध्यापकाला शालेय प्रशासनाचा व व्यवस्थापनाचा कणा मानले जाते. त्यांचे शालेय प्रशासनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

ज्ञानमंदिरांच्या प्रमुखास मुख्याध्यापक या नावाने संबोधतात. मुख्याध्यापक या शब्दाची फोड केली, तर दोन शब्द प्रथम वेगळे करावे लागतात.

१. मुख्य २. अध्यापक

पहिल्या शब्दाचा अर्थ अध्यापकातील सर्वांत उच्च किंवा मुख्य ज्याच्या हाती शिक्षण प्रक्रियेच्या बाबींची सूत्रे बहाल केलेली असतात आणि तोच एकमेव बाबींचा मुख्य नेता म्हणून ओळखला जातो.

दुसरा शब्द अध्यापक, म्हणजे गुरू गुर अंधकार रू दूर करणारा जो अज्ञानरूपी अंधकार दूर रून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेतो तो गुरू होय. ज्ञान देणारी, मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणारी, त्यांच्यावर योग्य संस्कार करणारी व्यक्ती या अर्थाने प्रथम पाहिले जाते.

मुख्याध्यापकाकडे शिक्षकाचा शिक्षक या नात्यानेही पाहिले जाते.

शालेय कारभार चालविण्यासाठी ज्या कार्यक्षम व्यक्तींची प्रमुख म्हणून नेमणूक केली जाते, त्या व्यक्तीला मुख्याध्यापक असे म्हणतात.

अध्यापन कार्य, संघटन कार्य, प्रशासन कार्य करणारी जवाबदार व्यक्ती म्हणजे मुख्याध्यापक

होम

मुख्याध्यापकाची पात्रता, कार्यक्षमता, धडाडी, कर्तव्यदक्षता, कल्पकता व अनुभवपत्रता
यावर शाळेचा दर्जा, स्थिती व यश अवलंबून असते. शालेतील शैक्षणिक कार्य अभ्यासानुवर्ती उपक्रम व परस्पर मानवी संबंध या शाळेच्या प्रत्येक कार्यावर मुख्याध्यापकाच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पडलेले असते. शालेय कार्यात मुख्याध्यापकाची भूमिका संचालक, मार्गदर्शक, संयोजक, पर्यवेक्षक अशी असते. म्हणून असे म्हटले जाते की, (As is the Head Master, So is the school.) यथा मुख्याध्यापक तथा शाळा.

जनमाणसातील शाळेविषयीची प्रतिमा ही प्रत्यक्षात मुख्याध्यापकाचीच प्रतिमा असते. उत्तम लौकिकाची शाळौँ कार्यक्षम मुख्याध्यापकामुळे उद्ध्वस्त होऊ शकते, तर एखादी मोडकळीस आलेली शाळा ही प्रभावी व कार्यक्षम नेतृत्वाच्या मुख्याध्यापकामुळे सुव्यवस्थितपणे कार्य करू शकते, यासंदर्भात श्री. रायबर्ग म्हणतात




मुख्याध्यापकाकडे मुख्य स्थान असते जसे जहाजावर कॅप्टनचे प्रमुख पद असते तसेच शाळा असते. तसेच केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने असे म्हटले आहे की,

"शैक्षणिक पुनर्बांधणीची कोणतीही योजना अपेक्षित कार्यक्षमता निर्माण करणार नाही. जोपर्यंत ती दूरदृष्टीने प्रशासित होत नाही तोपर्यंत परिणाम

"
उत्तर लिहिले · 6/7/2022
कर्म · 53700
0
शैक्षणिक व्यवस्थापनात अनेक घटक (components) समाविष्ट असतात, जे शिक्षण प्रणालीला सुरळीत आणि प्रभावीपणे चालवण्यासाठी आवश्यक असतात. त्यापैकी काही प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत:
  • ध्येय आणि उद्दिष्ट्ये (Aims and Objectives):

    शैक्षणिक व्यवस्थापनाची निश्चित ध्येये आणि उद्दिष्ट्ये असणे आवश्यक आहे. हे शिक्षण प्रणालीला दिशा देतात आणि त्यानुसार नियोजन (planning) करता येते.

  • नियोजन (Planning):

    शैक्षणिक ध्येये साध्य करण्यासाठी योजना तयार करणे, वेळापत्रक बनवणे आणि आवश्यक संसाधनांची (resources) व्यवस्था करणे हे नियोजनामध्ये समाविष्ट असते.

  • संघटन (Organization):

    शैक्षणिक संस्थांची रचना, विभागणी आणि कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. अधिकार आणि जबाबदाऱ्यांचे वाटप करणे यात समाविष्ट आहे.

  • कर्मचारी व्यवस्थापन (Staff Management):

    शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती (recruitment), निवड (selection), प्रशिक्षण (training) आणि विकास (development) करणे आवश्यक आहे. त्यांच्या कामाचे मूल्यमापन (evaluation) करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे देखील महत्त्वाचे आहे.

  • नेतृत्व (Leadership):

    शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांनी (principal) किंवा व्यवस्थापकांनी (managers) योग्य नेतृत्व करणे आवश्यक आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन (guidance) केले पाहिजे आणि संस्थेमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण केले पाहिजे.

  • समन्वय (Coordination):

    विविध विभाग आणि व्यक्ती यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे. शिक्षकांमध्ये, प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये योग्य समन्वय असावा.

  • संप्रेषण (Communication):

    प्रभावी संप्रेषण प्रणाली (communication system) असणे आवश्यक आहे. माहितीचे योग्य आदानप्रदान झाल्यास गैरसमज टाळता येतात आणि कार्यक्षमतेत सुधारणा होते.

  • निर्णय घेणे (Decision Making):

    शैक्षणिक व्यवस्थापनात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. हे निर्णय धोरणात्मक (strategic) आणि तात्कालिक (immediate) स्वरूपाचे असू शकतात.

  • अर्थव्यवस्थापन (Financial Management):

    शैक्षणिक संस्थेचे बजेट (budget) तयार करणे, खर्चाचे व्यवस्थापन करणे आणि आर्थिक नोंदी ठेवणे आवश्यक आहे.

  • मूल्यमापन (Evaluation):

    शैक्षणिक कार्यक्रमांचे आणि प्रणालीचे वेळोवेळी मूल्यमापन करणे आवश्यक आहे. यामुळे सुधारणा करता येतात आणि उद्दिष्ट्ये साध्य करण्याची दिशा निश्चित करता येते.

  • तंत्रज्ञान (Technology):

    आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा आहे. ऑनलाइन शिक्षण (online education), डेटा विश्लेषण (data analysis) आणि इतर शैक्षणिक कामांसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे.

हे सर्व घटक एकत्रितपणे शैक्षणिक संस्थेला प्रभावीपणे चालवण्यास मदत करतात.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 960

Related Questions

वॉटर शेड व्यवस्थापनाची संकल्पना व गरज स्पष्ट करा?
हॉटेलच्या व्यवस्थापनाची संकल्पना व गरज काय आहे?
वॉटरशेड व्यवस्थापनाची माहिती काय आहे?
वॉटरशेड व्यवस्थापनाची संकल्पना व गरज स्पष्ट करा?
वॉटर व्यवस्थापनाची संकल्पना व गरज काय आहे?
सहकारी साखर कारखान्यात व्यवस्थापन हे प्रदूषणकारी आणि विकारी अहंकारी नसावे, तर कसे असावे?
उच्च स्तर व्यवस्थापन आणि कनिष्ठ स्तर व्यवस्थापन?