पर्यावरण समस्या ध्वनी प्रदूषण

ध्वनी प्रदूषणाची समस्या थोडक्यात कशी स्पष्ट कराल?

2 उत्तरे
2 answers

ध्वनी प्रदूषणाची समस्या थोडक्यात कशी स्पष्ट कराल?

0







ध्वनिप्रदूषण : समस्या व उपाय
,

ध्वनी प्रदूषणामुळे मनुष्य व प्राणी यांच्या आरोग्यावर आणि वर्तनावर परिणाम होतो. ध्वनीची पातळी वाढली की माणसांमध्ये ताण वाढून हृदयाची धडधड वाढू शकते, रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे विकार जडू शकतात. तसेच लक्ष विचलित होते, चिडचिड होते, कार्यक्षमता घटते व पचनक्रियेत बदल होतो. सतत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे बहिरेपणाही येतो.





कान, नाक, घसा तज्ज्ञ

ध्वनी प्रदूषणाचे आपल्या जीवनावर कोणते परिणाम होतात व त्यांना आपण कसे तोंड द्यायचे, याचा विचार करू या. जागतिक आरोग्य परिषदेनुसार, ध्वनिप्रदूषण म्हणजे नेमके काय, तर कुठल्याही अवास्तव प्रमाणापेक्षा जास्त आवाज, जो माणसांच्या आरोग्यावर परिणाम करतो आणि दैनंदिन जीवनात अडथळा आणतो, त्याला 'ध्वनिप्रदूषण' असे म्हणतात.


विविध संस्थांच्या संशोधनातून असे निदर्शनास आले आहे, की अर्ध्यापेक्षा जास्त लोकसंख्या ही ध्वनिप्रदूषणाची बळी आहे. ८० डेसिबल एवढा आवाज आपण सतत आठ तासांसाठी ऐकला, तर आपल्याला बहिरेपणा येण्याची शक्यता अधिक असते. कर्णकर्कश हॉर्नचे डेसिबलमध्ये मोजमाप केल्यास ही पातळी १००-१२० डीबी (डेसिबल) या प्रमाणात येते.

ध्वनिप्रदूषणामुळे होणारे दुष्परिणाम


ऐकायला कमी येणे, कानात बेल वाजत राहिल्यासारखा आवाज येणे, झोपेत सतत बिघाड होणे, अस्वस्थता वाटणे, वेदना होणे वा थकवा येणे, कामाच्या ठिकाणी काम करण्याची इच्छा कमी होणे, बोलण्यात अडथळा येणे, हार्मोन्समध्ये बदल होणे यांसारखे दुष्परिणाम ध्वनिप्रदूषणामुळे होतात.

वरील समस्यांचे उपाय


दवाखाने, शाळा, महाविद्यालये हे 'ध्वनिप्रदूषण निषिद्ध' भाग असतात. याचे काटेकोर पालन करायला हवे. सरकारनेही यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मोबाइलचा कमीतकमी व योग्य प्रकारे वापर करावा. मोबाइलवर गाणे ऐकताना भान ठेवणे व आवाजाची पातळी कमी ठेवणे. कर्णकर्कश आवाज असताना इअर प्लगचा वापर करणे. डीजेसारख्या कर्णकर्कश आवाज करणाऱ्या साधनांचा मोकळ्या जागी योग्य डीबी पातळीत वापर करणे. कानाच्या क्षमतेवर होणाऱ्या परिणामांपासून वाचण्यासाठी नियमित व्यायाम, पोषक आहार, योग्य प्रमाणात झोप घेणे गरजेचे आहे.

ही पथ्ये पाळा


- कान कोरडे झाले; म्हणून कधीही खोबरेल तेल टाकू नये.

- वॅक्स फॉर्मेशन ही शरीराची प्रतिरोधक प्रक्रिया आहे, हे लक्षात घेऊन काही समस्या असल्यास डॉक्टरांशी सल्लामसलत करावी.


- कानात शिटीसारखा आवाज येतो; म्हणून त्यात तेल, चुना, मध, लसणाच्या पाकळ्या अशा गोष्टी टाकू नयेत.

- कानाला सारखी खाज येते; म्हणून 'इअर बड' घालून कान सारखा खाजवू नये. त्यामुळे कानाला व पडद्याला इजा होण्याची शक्यता असते.

    

उत्तर लिहिले · 25/6/2022
कर्म · 53750
0

ध्वनी प्रदूषण म्हणजे मानवी किंवा नैसर्गिक कारणांमुळे निर्माण होणाऱ्या आवाजांमुळे पर्यावरणावर आणि सजीवांवर होणारा नकारात्मक परिणाम.

ध्वनी प्रदूषणाची कारणे:
  • वाहतूक: गाड्या, विमाने, रेल्वे यामुळे होणारा आवाज.
  • औद्योगिक क्षेत्र: कारखाने आणि मशिनरीमुळे होणारा आवाज.
  • बांधकाम: बांधकाम साईटवरील आवाज.
  • सामाजिक कार्यक्रम: उत्सव, समारंभांमधील मोठ्या आवाजाचे संगीत आणि घोषणा.
ध्वनी प्रदूषणाचे परिणाम:
  • शारीरिक परिणाम: श्रवणशक्ती कमी होणे, उच्च रक्तदाब, हृदयविकार.
  • मानसिक परिणाम: तणाव, चिडचिडेपणा, निद्रानाश.
  • पर्यावरणावर परिणाम: वन्यजीवांवर नकारात्मक परिणाम, त्यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम.
नियंत्रण उपाय:
  • वाहनांची नियमित तपासणी करणे.
  • औद्योगिक क्षेत्रांमध्ये ध्वनीरोधक उपाययोजना करणे.
  • सार्वजनिक ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळणे.
  • जागरूकता: ध्वनी प्रदूषणाबद्दल जनजागृती करणे.

ध्वनी प्रदूषण एक गंभीर समस्या आहे, ज्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5160

Related Questions

औद्योगिक ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना?
सामाजिक ध्वनीप्रदूषण यावर माहिती मिळेल का?
ध्वनी प्रदूषण म्हणजे काय?
ध्वनी प्रदूषणाची समस्या थोडक्यात स्पष्ट करा?
आरोग्यमान आवाज किती डेसिबल (dB) पर्यंत असावा?
ध्वनिप्रदूषण व त्याचे दुष्परिणाम स्पष्ट करा?
ध्वनिप्रदूषण व त्याचे दुष्परिणाम कसे स्पष्ट कराल?