शिक्षण शालेय सुरक्षा

बालसुरक्षेसाठी शाळेतील उपक्रम कोणते आहेत?

4 उत्तरे
4 answers

बालसुरक्षेसाठी शाळेतील उपक्रम कोणते आहेत?

17
शाळेत बालकांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवता येईल.
यात अग्निशमकचे प्रात्यक्षिक दाखवू शकता. 
भूकंप किंवा आग यावेळी कोणती खबरदारी  घ्यावी याचे प्रात्यक्षिक घ्यावे. 
विद्यार्थ्यांना काही अडचणी असेल तर शाळेत तक्रार पेटी ठेवावी
शाळेच्या आवाराला कंपाउंड असावे.
खेळाचे मैदान मोकळे असावे.
अग्निशमचे फायर उपलब्ध असावेत.
अग्निशमन दलाचे , पोलीस स्टेशनचे नंबर भिंतीवर लिहावेत.
भूकंप विरोधी इमारती असाव्यात.
 वाहनतळ वेगवेगळे असावेत. 
रस्ता सुरक्षेचे महत्व व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना द्यावेत. शाळेत जाताना पायऱ्या व सोबत रॅम्प पण असावेत. स्वच्छ व मुली व मुलांसाठी स्वतंत्र शौचालय असावेत. त्यात निसरड्या जागा किंवा अति पाणी नसावे. 
टेरेस पॅक असावेत.
बेंच मध्ये योग्य अंतर असावेत.
 शाळा भरताना व सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना व्यवस्थित गेटच्या बाहेर सोडणे.
शाळेच्या  गाडीत चढताना व उतरताना मार्गदर्शक ठेवणे.
शाळेच्या मधल्यावेळेत विद्यार्थावर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षकांचे गट करावेत.
विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे मंत्री किंवा विभाग करून वेगवेगळ्या सुरक्षेच्या जबाबदाऱ्या द्याव्यात.
प्रथमोपचार पेटी असावी.
जवळच्या दवाखान्याचे नंबर असावेत.
असे विविध उपक्रम करता येईल.

उत्तर लिहिले · 22/6/2022
कर्म · 11785
13
बाल सुरक्षेसाठी शाळेतील उपक्रम
उत्तर लिहिले · 21/6/2022
कर्म · 500
0
शाळेतील बालसुरक्षेसाठी काही उपक्रम खालीलप्रमाणे आहेत:
  • सुरक्षित परिसर: शाळेचा परिसर सुरक्षित असावा यासाठी उपाययोजना करणे, जसे की सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे, शाळेच्या आवारात नियमित गस्त ठेवणे.
  • मार्गदर्शन व समुपदेशन: विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन व समुपदेशन सत्रांचे आयोजन करणे. त्यांना सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक माहिती देणे.
  • सुरक्षित वाहतूक: विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करणे. स्कूल बसमध्ये प्रशिक्षित ड्रायव्हर आणि मदतनीस असावेत. बसमध्ये प्रथमोपचार किट उपलब्ध असावे.
  • आपत्कालीन योजना: शाळेत आग, भूकंप, पूर यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी योजना तयार करणे आणि त्याचे वेळोवेळी प्रशिक्षण देणे.
  • शिकवणी: मुलांना सुरक्षित स्पर्शाबद्दल (safe touch) माहिती देणे. तसेच, असुरक्षित स्पर्श (unsafe touch) झाल्यास काय करावे याबद्दल मार्गदर्शन करणे.
  • तक्रार निवारण पेटी: शाळेत तक्रार निवारण पेटी (complaint box) लावावी, जेणेकरून विद्यार्थी कोणत्याही अडचणी किंवा तक्रारी निनावीपणे नोंदवू शकतील.
  • पालक-शिक्षक संवाद: वेळोवेळी पालक-शिक्षक बैठका आयोजित करणे, ज्यात मुलांच्या सुरक्षिततेवर चर्चा करणे.

हे काही सामान्य उपक्रम आहेत जे शाळांमध्ये बालसुरक्षेसाठी राबवले जातात. प्रत्येक शाळेने आपल्या गरजेनुसार आणि उपलब्ध साधनसामग्रीनुसार योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040

Related Questions

सर्व स्कूल बसचे सर्व शाळांवर नियंत्रण आवश्यक आहे या विषयावर बातमी कशी तयार कराल?
तुमच्या शाळेत सुरक्षिततेसाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम घेता, सविस्तर लिहा?
तुमच्या शाळेत बाल सुरक्षेसाठी तुम्ही काय करता?
शाळेत खेळत असताना एखादे मूल पडले आणि त्या मुलाला गंभीर दुखापत झाली तर याला जबाबदार कोण?