कवी कविता प्रकार साहित्य

पंडित कवी यांचे प्रमुख काव्य कोणते?

2 उत्तरे
2 answers

पंडित कवी यांचे प्रमुख काव्य कोणते?

0
वामन पंडितांची गणना उच्च दर्जाच्या कवीत होते. लांब लांब यमके साधण्यात त्यांचे कौशल्य दिसून येते. वामन पंडितांची कांहीं काव्ये भाषांतररूप आहेत व काही स्वतंत्र. भर्तृहरीची श्रृंगार, नीति, वैराग्य शतके, गंगालहरी, समश्लोकी गीता ही भाषांतरित होत. निगमसागर नावाचा वेदान्तपर ग्रंथ त्यांनी लिहिला आहे. 'यथार्थदीपिका' या नावाची गीतेवरील टीका अनेक लोकांच्या आग्रहास्तव लिहिली. तीत ’आंधळी भक्ती ही कुचकामाची असून ज्ञानयुक्त सगुण भक्तीच श्रेष्ठ व मोक्षसाधनाचा उत्तम मार्ग आहे’ असे प्रतिपादिले आहे. या ग्रंथाची ओवीसंख्या २२ हजारांवर आहे. ओवीरचना अनियमित असून ती कोठे लांब तर कोठे आखूड झाली आहे. याशिवाय, रामजन्म, कंसवध, हरिविलास, आर्याटीका, कात्यायनीव्रत, अनुभूतीलेश, जलक्रीडा, जटायुस्तुति अशी इतर पुराणप्रसंगांवर वामन पंडितांनी काव्ये केली आहेत. 'सुश्लोक वामनाचा' असे मोरोपंतांनी म्हटले आहे, यावरून वामनपंडिताची योग्यता दिसून येते. निवृत्तिपर काव्यांप्रमाणेच वामन पंडितांनी शृंगार, वात्सल्य, करुण, वगैरे नवरसपूर्ण काव्येही केली आहेत. वर्णनशैली, रचनाचातुर्य, साधेपणा, व प्रासाद याच्या काव्यांत जागजागी दिसून येतो. आपल्या पत्नीस उपदेश करण्याकरिता लिहिलेले प्रियसुधा नावाचे प्रकरण फार उत्तम वठले आहे. [१]

विनामृत्तिका कुंभ जेव्हां दिसेना
विना मृत्तिका कुंभ कांहीं असेना
दिसेना असी ज्याविणें मृत्तिकाही
नसे मृत्तिकाही तयावीण कांहीं ॥१॥

अलंकार सृष्टीमधें काय आहे
सुवर्णाविणें हें विचारुनि पाहें .. चित्सुधा

सूर्याजी सदाशिव महात्मे यांनी वामन पंडितांच्या मिळतील तेवढ्या जुन्या हस्तलिखित पोथ्या गोळ्या केल्या व त्यातून वामन पंडितांची 'स्फुट रचना' व 'यथार्थ दीपिका' हे ग्रंथ सिद्ध झाले. हे ग्रंथ त्यानी त्यांच्या 'वामनग्रंथ' नावाच्या मासिकातून क्रमश: प्रसिद्ध केले.
उत्तर लिहिले · 10/6/2022
कर्म · 53750
0

पंडित कवींचे काही प्रमुख काव्य खालीलप्रमाणे:

  • श्रीधर: रामविजय
  • वामन पंडित: यथार्थदीपिका (भगवद्गीतेवरील टीका)
  • मोरोपंत: केकावली
  • मुक्तेश्वर: महाभारतावरील टीका
  • रघुनाथ पंडित: नलदमयंती स्वयंवर आख्यान
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2120

Related Questions

स्वतंत्र कवितेचे वेगळेपण स्पष्ट करा?
यशवंत मनोहर यांची कालचा पाऊस ही कविता कोणत्या रचना प्रकारातील आहे येत नाही?
यशवंत मनोहर यांची कलरचा पाऊस ही कविता कोणत्या प्रकारची रचना आहे?
यशवंत मनोहर यांची 'कालचा पाऊस' ही कविता कोणत्या रचना प्रकारातील आहे?
केशवसुत यांनी कोणता काव्य प्रकार मराठीत रूढ केला?
चारोळी म्हणजे काय?