अध्यात्म देव श्रद्धा

श्रद्धा तिथे देव असे का म्हटले जाते?

2 उत्तरे
2 answers

श्रद्धा तिथे देव असे का म्हटले जाते?

1
भाव तोची देव, भाव तोची देव, ये अर्थी संदेह धरू नका || १ ||

भावभक्ती फळे भावे देव मिळे, निजभावे सोहाळे, स्वानंदाचे || २ ||

भावची कारण, भावची कारण, यापरतें साधन नाही नाही || ३ ||

एका जनार्दनी भावाच्या आवडी, मनोरथ कोडी पुरती तेथे || ४ ||

श्रद्धा नसेल तर फक्त आकार दिलेला एक दगड आणि श्रद्धा असेल तर साक्षात देवाची मूर्ती.

आता 'निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे' हे सांगणाऱ्या संत गोरा कुंभार यांनासुद्धा सगुणाची जाणीव होती आणि त्याची मदत घेऊनच ते निर्गुणाच्या भेटीस जाणार होते / गेले होते … याचे कारण म्हणजे भाव. सगुणभक्तीसाठी भाव असायलाच पाहिजे अन्यथा निर्गुण निराकार परब्रह्माची साधना करावी … जे सामान्य माणसाला शक्य नाही. म्हणूनच जवळपास सर्वच संत श्रेष्ठींनी श्रद्देचाच दाखला दिला आहे.

सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे … काय संत तुकाराम महाराजांना समोर एक केवळ काळ्या दगडाची मूर्ती आहे याचे भान नसेल … पण भाव असल्यामुळे त्यांना त्या मूर्तीत देव दिसत असावा म्हणूनच तर ते एकेठिकाणी म्हणतात की, 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरोनिया' … आता तुकाराम महाराजांचा हात धरून साक्षात देव त्यांना कसा चालवेल … उत्तर आहे - भाव.

केवळ भाव होता म्हणूनच इतरांसाठी केवळ एक जड मूर्ती असली तरीही रामकृष्ण परमहंस यांच्यासाठी ती कालीमाता होती.

आपल्याकडे ज्या नवविधा भक्ती आहेत त्यात सुद्धा 'भाव' महत्वाचा आहे.



























… 
उत्तर लिहिले · 9/6/2022
कर्म · 53720
0

‘श्रद्धा तिथे देव’ असे म्हटले जाण्याचे कारण खालीलप्रमाणे आहे:

  • श्रद्धा म्हणजे विश्वास: श्रद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर दृढ विश्वास असणे. हा विश्वास सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.
  • सकारात्मक दृष्टिकोन: श्रद्धेमुळे आपल्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो. अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळते.
  • धैर्य आणि आत्मविश्वास: श्रद्धेमुळे आपल्यात धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे आपण धैर्याने परिस्थितीचा सामना करू शकतो.
  • एकाग्रता: श्रद्धेमुळे आपले मन एकाग्र होते. ध्येयावर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.
  • परिणाम: जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर पूर्ण श्रद्धा ठेवतो, तेव्हा आपले प्रयत्न अधिक प्रभावी होतात आणि यश मिळण्याची शक्यता वाढते.

म्हणून, श्रद्धेमुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात आणि यश मिळवणे शक्य होते. याच कारणामुळे 'श्रद्धा तिथे देव' असे म्हटले जाते.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

केरळच्या देवाला चॉकलेटचा नैवेद्य लागतो हे खरे काय?
मक्का मदिना मध्ये खरच शिवलिंग आहे का?
जर कोणी तुम्हाला विचारले की भगवंत सर्वत्र आहेत, तर मंदिरात कशाला जावे? यावर आपले उत्तर काय असावे?
देवाला मानावे का नाही?
छोट्या दगडाला देवपण कसे प्राप्त झाले?
कुलदैवत आणि कुलदेवी यात काय फरक आहे, ते कसे आणि कोण ठरवतं?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोण?