शिक्षण पात्रता

ग्रामसेवक शिक्षण पात्रता काय आहे?

2 उत्तरे
2 answers

ग्रामसेवक शिक्षण पात्रता काय आहे?

0
ग्रामसेवक

ग्रामसेवक पदाचे महत्त्व

• ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय प्रमुखास ग्रामसेवक असे म्हणतात.

• ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा पदसिद्ध सचिव असतो. त्याची नेमणूक, बदली आणि भरतीचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असतो.


• एक किंवा एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतीसाठी एका ग्रामसेवकांची नियुक्ती केली जाते.


• ग्रामसेवकावर गट विकास अधिकारी यांचे नियंत्रण असते.

  ग्रामसेवक पात्रताग्रामसेवक 

• ग्रामसेवक हा ग्रामप्रशासनातील वर्ग 3 चा सर्वात कनिष्ठ अधिकारी असतो.

• ग्रामसेवकाचे वेतन व भत्ते जिल्हा निधीतून दिले जातात.

• ग्रामसेवक पदासाठी 60 गुणांनी बारावी पास किंवा MCVC शाखेतून बारावी पास, कृषी पदविका किंवा कृषी पदवी, BSW म्हणजे समाज कल्याण पदवी, इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी,B.tech पदवी

• MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण


• परीक्षा देण्यासाठी वय 18 ते 38 दरम्यान

ग्रामसेवक परीक्षा स्वरूप


• ग्रामसेवक पदासाठी जिल्हा निवड मंडळाकडून परीक्षा घेतली जाते. परीक्षा एकूण 200 गुणांची असते.


• परीक्षेत 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. एका प्रश्नासाठी दोन गुण असतात.


• कृषी- 80 गुणांसाठी 40 प्रश्न

• इंग्रजी व्याकरण- 30 गुणांसाठी 15 प्रश्न

• मराठी व्याकरण- 30 गुणांसाठी 15 प्रश्न

• बुद्धिमत्ता चाचणी- 30 गुणांसाठी 15 प्रश्न

• सामान्य ज्ञान चाचणी- 30 गुणांसाठी 15 प्रश्न

ग्रामसेवक अधिकार व कार्य-

• ग्रामपंचायतीचा हिशोब ठेवणे.

• ग्रामपंचायत क्षेत्रातील जन्म मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे.

• कर वसुली करणे आणि ग्रामपंचायतीचा पत्रव्यवहार पाहणे.

• गावातील लोकांना शासनाच्या विविध योजना बद्दल माहिती देणे.

• ग्रामपंचायत सभांना उपस्थित राहून सभेचे इतिवृत्त लिहिणे.

• ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प तयार करणे.

• ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे

• ग्रामपंचायतीचा हिशोब ठेवणे.

• ग्रामपंचायत क्षेत्रातील जन्म मृत्यू आणि विवाहाची नोंद ठेवणे.

• कर वसुली करणे आणि ग्रामपंचायतीचा पत्रव्यवहार पाहणे.

• गावातील लोकांना शासनाच्या विविध योजना बद्दल माहिती देणे.

• ग्रामपंचायत सभांना उपस्थित राहून सभेचे इतिवृत्त लिहिणे.

• ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प तयार करणे.

• ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

• ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

• गावाच्या हद्दीतील रोजगार हमी योजनेच्या कामाची नोंद घेणे.

• ग्रामपंचायतीची कागदपत्रे, विवरणपत्रे, हिशोब व दस्तऐवज सांभाळणे.

• आपल्या कार्याचा अहवाल गटविकास अधिकार्‍यांकडे सुपूर्त करणे.


• ग्रामसभांना उपस्थित राहून मंजूर ठरावांची अंमलबजावणी करणे


उत्तर लिहिले · 7/6/2022
कर्म · 53700
0
ग्रामसेवक पदासाठी आवश्यक असणारी शिक्षण पात्रता खालीलप्रमाणे आहे:
  • उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा.
  • किंवा,Candidates should have Degree.
  • महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असावी.
Gramsevak Education Qualification : maharashtrazp.com
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

मी 10वी नंतर डिप्लोमा केला आहे आणि डिग्री पूर्ण केली तर मी तलाठी पदासाठी पात्र आहे का? की 12वी मुळे अडचण येऊ शकते?
माझी पत्नी ९वी पास असून ती १२वी कला शाखेची परीक्षा ह्या वर्षी देऊ शकते काय?
खासदार होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
मुक्त विद्यापीठातून दहावी न करता डायरेक्ट बी. ए. केलेले आहे, तर मला MPSC परीक्षेला बसता येईल काय?
मला MPSC करायची आहे, पण मित्र म्हणतात उंची लागते, तर उंची किती लागते कोणी सांगाल का?
तलाठी भरती २०२२ साठी मुक्त विद्यापीठाची पदवी चालते का?
माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाची शैक्षणिक पात्रता काय असावी लागते?