2 उत्तरे
2
answers
मटका (सट्टा) कोणी चालू केला?
2
Answer link
सट्टा मटका हा प्राचीन काळातील जुगारापेक्षा थोडा वेगळा असला तरी, भारतातील सट्टा मटक्याचा इतिहास हा स्वातंत्र्यापूर्वीचा असल्याचे मानले जाते.
देशात राजे महाराजांची सत्ता असताना सट्टाबाजार जोरात असायचा. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने हा खेळ खेळला जायचा. त्यावेळी चिठ्या लिहून एका मटक्याच्या आत टाकल्या जायच्या.
या खेळात संख्या जुळवून जय-पराजय ठरवले जायचे. आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात हा खेळ आता सहज ऑनलाइन सुद्धा खेळला जातो.
आज मटका (मडकं) या खेळात वापरले जात नाही, तरी सुद्धा या पारंपारिक खेळाचे नाव नेमके तेच ठेवण्यात आले आहे. त्यात कोणताही बदल करण्यात आला नाही. स्वातंत्र्यापूर्वी काळात कापसाच्या भावावर सट्टा खेळला जात होता.
७० च्या दशकात रतन खत्री नावाच्या व्यक्तीने पत्त्याचा खेळ मांडून या खेळाची सुरवात केली होती. म्हणून रतन खत्री या व्यक्तीला सट्टा किंग किंवा मटका किंग असे म्हटले जाते.
९० च्या दशकात हा खेळ खूप लोकप्रिय खेळ होता. अगदी खेळ्यापाड्यात या जुगाराने आपले पाय पसरले होते. यानंतर अशाच अनेक प्रकारच्या खेळांना जुगाराचे स्वरूप आले. त्यामुळे हळूहळू सट्टा मटक्याची लोकप्रियता कमी होऊ लागली.
लोकांना असे अनेक प्लॅटफॉर्म मिळाले आहेत जिथे ते कमी वेळेत पैसे गुंतवून जास्त नफा मिळवू शकत होते. आजही भारतीय परंपरेत जुगार ही वाईट सवय म्हणून ओळखली जाते. भारतीय राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर या खेळाला बेकायदेशीर ठरवण्यात आले.
पण आजही लोक गुप्त पद्धतीने हा खेळ खेळतात. ही जुनी पद्धत आता नव्याने खेळली जाते. सत्ता मटका आता अनेक वेबसाइट्स आणि ॲप द्वारे खेळला जातो.
0
Answer link
मटका (सट्टा) कोणी सुरू केला याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही, तरीसुद्धा काही लोकप्रिय मान्यता आणि ऐतिहासिक तथ्ये खालीलप्रमाणे आहेत:
- कल्याणजी भगत (Kalyanji Bhagat): १९६० च्या दशकात, कल्याणजी भगत यांनी ‘कल्याण मटका’ नावाचा जुगार सुरू केला, जो खूप लोकप्रिय झाला. ते 'मटका किंग' म्हणून ओळखले जातात.
- रतन खत्री (Ratan Khatri): रतन खत्री हे देखील प्रसिद्ध मटका चालवणारे होते. त्यांनी ‘वरळी मटका’ सुरू केला, जो कल्याण मटकापेक्षा वेगळा होता.
हे दोघे त्यावेळेस मटका व्यवसायातील मोठे नाव होते आणि त्यांनी याला भारतात लोकप्रियता मिळवून दिली.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: