औषधे आणि आरोग्य
औषध
आरोग्य
समजा, तुमची प्रकृती नाजूक आहे, प्रतिकारशक्ती कमी आहे आणि तुम्ही एखाद्या त्रासासाठी/दुखण्यासाठी औषध घेत आहात, तर अशा वेळी त्रास/दुखणं दूर करण्यात औषधाचा अपेक्षित परिणाम दिसत नाही, असे होऊ शकते का?
2 उत्तरे
2
answers
समजा, तुमची प्रकृती नाजूक आहे, प्रतिकारशक्ती कमी आहे आणि तुम्ही एखाद्या त्रासासाठी/दुखण्यासाठी औषध घेत आहात, तर अशा वेळी त्रास/दुखणं दूर करण्यात औषधाचा अपेक्षित परिणाम दिसत नाही, असे होऊ शकते का?
1
Answer link
आपली प्रकृती किरकोळ आहे म्हणजे प्रतिकारशक्ती कमी आहे ती प्रथम प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे तुम्हाला तरच एखाद्या दुखण्याच्या त्रासांवर औषधं घ्याल तर तुम्हाला त्या औषधांचा उपयोग होईल नाही तर काय प्रतिकारशक्ती कमी असेल तर तुम्ही एखाद्या दुखण्याच्या त्रासांवर किती औषध घेतलीत तरी उपयोग होणार नाही हो त्या औषधांचा उपयोग तात्पुरता असेल आणि परत औषधं घेतली तरी दुखण्याचा त्रास होत राहणार म्हणून त्यासाठी तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढवावी लागेल
म्हणजे काय करावे लागेल तर खाली वाचा तुम्हाला काय करायचे आहे ते
रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल?
डॉक्टरांनी कितीही औषधं दिली तरी पेशंटमधील उपजत रोग प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे. त्यासाठी काही उपाययोजना आणि पथ्यं पाळणं आवश्यक आहे.
गेट स्लिम ज्यूसने करा वजनावर नियंत्रण, कसं ते जाणून घ्या
डॉक्टरांनी कितीही औषधं दिली तरी पेशंटमधील उपजत रोग प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे. त्यासाठी काही उपाययोजना आणि पथ्यं पाळणं आवश्यक आहे.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यातच बैठं काम आणि जंकफूड, पिझ्झा, बर्गर यासारखे खाद्यपदार्थ खाण्याची आवड. अशात विविध जंतू, विषाणूंचा संसर्ग होऊन आजारी पडण्याचं प्रमाण वाढत आहे. डॉक्टरांनी कितीही औषधं दिली तरी पेशंटमधील उपजत रोग प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे. त्यासाठी काही उपाययोजना आणि पथ्यं पाळणं आवश्यक आहे. नेमकी रोग प्रतिकारशक्ती म्हणजे काय आणि त्यावर होणारा परिणाम तसेच ती कशी निर्माण करता येईल, याचा विचार करू.
शरीरात कोणताही जंतूसंसर्ग, तसेच अॅलर्जी यापासून सरंक्षण करण्याचं काम म्हणजेच प्रतिकारशक्ती. रोग प्रतिकार किंवा विविध गोष्टींमुळे शरीरात होणारी रिअॅक्शन यांना अडवण्याचं काम प्रतिकारशक्ती करीत असते. प्रतिकारशक्तीचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे निसर्गतः जन्मतः मिळणारी शक्ती. म्हणजेच शरिरात असणारा बोन मॅरो. हा रक्तातील जंतू कंवा नको असलेल्या पेशी शोधून त्यावर रिअॅक्शन देत असतो.
पहिला प्रकारः
विविध प्रकारचे जंतू किंव जेनेरिक भाग किंवा काही वेळा पूर्वी होऊन गेलेला आजार यामुळे ठराविक प्रतिकार शक्ती तयार होते. यात पुन्हा प्रकार असतात. एक म्हणजे सगळ्या प्रकारचे जंतू विरुद्ध प्रतिकार शक्ती आणि दुसरा ठराविक जंतू विरुद्धची शक्ती.
दुसरा प्रकारः
ठराविक वातावरण, जंतू, अॅलर्जी या सान्निध्यात वारंवार असण्यामुळे शरीरात ठराविक बदल घडून येतात. ज्यानं प्रतिकारशक्ती तयार होते. यामुळे शरिरात त्रास दिसून येत नाही. त्याचेसुद्धा दोन प्रकार आढळून येतात. एक म्हणजे शरीरात आपोआप तयार होणारी शक्ती आणि दुसरी म्हणजे लस, इंजेक्शनमुळे तयार होणारी शक्ती. याच दुसऱ्या प्रकारात मोडणारा प्रकार म्हणजे अॅक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह.
अॅक्टिव्ह म्हणजे जिवंत जंतूपासून तयार केलेली लस शरीरात इंजेक्शनद्वारे दिली जाते. व शरीरात त्यावर बदल होऊन त्या त्या आजाराची प्रतिकारशक्ती तयार होते. पॉझिटिव्ह म्हणजे प्रतिकारशक्ती तयार अन्टीबॉडीज वापरणं.
जंतूसंसर्ग झाल्यानंतर बोन मॅरोचं निदान करून त्यावर प्रतिकार करण्याच्या पेशीचं प्रमाण वाढवितो. (उदा. पांढऱ्या पेशी) किंवा शरीरात होणारी रिअॅक्शन म्हणजेच ताप, अंगदुखी, थंडी वाजून येणं म्हणजे जंतूमधील विषारी घटक रक्तात मिसळतात. रक्तातील पेशी त्यावर रिअॅक्शन दाखवून जंतूंचा नायनाट करतात.
दैनंदिन जीवनात प्रतिकारशक्ती ही दिवसेंदिवस कमी झालेली दिसते. बदलते वातावरण, अपूर्ण आहार, कमी झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे जंतूसंसर्ग जास्त जाणवतो. अपूर्ण ज्ञान, अस्वच्छ राहणीमान, गर्दीच्या ठिकाणाचं वास्तव्य यामुळे आजारांत वाढ होत आहे.
प्रतिकारशक्ती कशी वाढवावी ?
याचं सोपे उत्तर म्हणजे नैसर्गिक जीवन जगणं. नुसतंच काम न करता संपूर्ण पौष्टिक आहार, यात फळ आणि पालेभाज्यांचा समावेश असावा. रोज एक फळ खाणं आवश्यक आहे. आहारामध्ये जंकफूड असलं तरी परंतु,आठवड्यातून अगदी एक किंवा दोन वेळाच. आहाराची वेळ निश्चित असावी.
झोपः
२४ तासात कमीतकमी आठ तास झोप आवश्यक आहे. यात शरीराची झालेली झीज भरून निघते. तसेच मेटाबॉलिझम (चयापचय क्रिया) साधारण राहतो. अपुऱ्या झोपेमुळे हृदयासह मेंदूवर जास्त दुष्परिणाम दिसून येतात.
वजनः
जन्मतः उंचीनुसार वजनाचं प्रयोजन असतं. परंतु, स्थूलपणामुळे सगळे अवयव क्षमतेपेक्षा जास्त काम करत असतात. याकरीता नियमित आहार आणि मर्यादित अन्न खाणं गरजेचं असतं.
व्यायामः
खाऊन आलेली ऊर्जा खर्च करणं हे गरजेचं असतं. म्हणूनच २४ तासात एक तास व्यायाम करणं अत्यंत गरजेचं असतं. शरीराचा समतोल साधण्यासाठी प्रतिकारशक्ती गरजेची आहे. आधुनिक काळात नवीन नवीन येणाऱ्या जंतूंचा प्रतिकार करण्यासाठी औषधं, उपचारांपेक्षा नैसर्गिकरित्या आजार टाळता आले पाहिजेत. हाच खरा मोठा उपाय आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये.
0
Answer link
होय, तुमची प्रकृती नाजूक असल्यास, प्रतिकारशक्ती कमी असल्यास आणि तुम्ही एखाद्या विशिष्ट त्रासासाठी औषध घेत असाल, तर औषधाचा अपेक्षित परिणाम दिसण्यात अडचणी येऊ शकतात. याची काही कारणे खालीलप्रमाणे:
1. प्रतिकारशक्ती कमी असणे:
- प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे, शरीर औषधांना पुरेसा प्रतिसाद देत नाही.
- रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास, शरीरात जंतुसंसर्ग होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो.
2. औषधांचा परस्परसंबंध (Drug Interactions):
- तुम्ही घेत असलेल्या इतर औषधांमुळे, एका औषधाचा दुसऱ्या औषधावर परिणाम होऊ शकतो.
- दोन किंवा अधिक औषधे एकत्र घेतल्यास, त्यांचे दुष्परिणाम वाढू शकतात किंवा औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो.
3. शारीरिक स्थिती:
- तुमच्या शारीरिक स्थितीनुसार, औषधांचा प्रभाव बदलू शकतो. उदाहरणार्थ, किडनी किंवा लिव्हरच्या समस्या असल्यास, औषध व्यवस्थितपणे Metabolize होत नाही आणि त्यामुळे त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही.
4. कुपोषण:
- शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता असल्यास, औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो.
5. मानसिक ताण:
- जास्त ताण असल्यास, शरीरातील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो.
उपाय:
- डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांना तुमच्या वैद्यकीय इतिहासाबद्दल (Medical History) आणि तुम्ही घेत असलेल्या औषधांबद्दल माहिती द्या.
- प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा.
- पुरेशी झोप घ्या आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.