2 उत्तरे
2
answers
लग्नपत्रिका कशी छापतात?
0
Answer link

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. त्यामुळे या सोहळ्याची वधुवरांप्रमाणेच त्यांचे कुटुंबियही आतूरतेने वाट पाहत असतात. आपल्या मुलीचे अथवा मुलीचे लग्न थाटामाटात करण्यासाठी आईवडील जीवाचे रान करतात. लग्न कुंडली बघून लग्नाची तारीख आणि मुहूर्त ठरल्यावर सर्वात आधी तयार केली जाते लग्नाची निमंत्रण पत्रिका…भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात आधी परमेश्वराला म्हणजेच कुलदेवतेला आमंत्रण पत्रिका देऊन मगच नातेवाईक, मित्रमंडळींना आमंत्रण देण्यास सुरूवात केली जाते. तुमचा विवाहसोहळा खास करण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत हे खास लग्न निमंत्रण संदेश (… लग्नानंतर वधूवरांना गृहप्रवेश, पूजाविधींच्या वेळी उखाणे घेण्यास सांगण्याची पद्धत हिंदू संस्कृतीमध्ये आहे. यासाठीच वाचा हे मराठी उखाणे विविध प्रकारचे.
श्रीगणेश, ग्रामदेवता, कुलदेवतेला वंदन
लग्नाचे पहिले निमंत्रण सर्वात आधी देवाला म्हणजेच श्रीगणेश, ग्रामदेवता आणि कुलदेवतेला दिले जाते. यासाठी लग्न पत्रिकेच्या मजकूराची सुरूवातच या देवतांना वंदन करण्यापासून होते. कोणत्याही कार्याआधी श्रगणेशाला वंदन करण्याची पद्धत आहे. शिवाय कुलदेवतेला आणि ग्रामदेवतेला, सदगुरूंना अथवा इतर देवतांना कृतज्ञता पूर्वक वंदन करूनच या मंगल कार्याला सुरुवात केली जाते. या निमंत्रणाचा मुख्य हेतू घरी आयोजित केलेले मंगल कार्य परमेश्वर कृपेने सुखरूप आणि कोणतीही अडचण न येता पार पडावे हा असतो.
वधूवरांची नावे
निमंत्रण पत्रिकेवरील महत्त्वाचा मजकूर म्हणजे ज्यांचे लग्न आहे त्या नववर आणि नववधूचे नाव…कारण सर्व पाहुणे मंडळींना वधूवरांची नावे माहीत असतातच असं नाही. शिवाय हिंदू लग्नपत्रिकेमध्ये वर आणि वधूसोबत तिच्या आईवडीलांचे नावही दिले जाते. ज्यामुळे ते दोघं कोणाची मुले आहेत, त्यांचे गाव कोणते हे ही पाहुणे मंडळींना समजते.
लग्नाची तारीख आणि मुहूर्त
लग्नाचा मजकूर लिहीताना दक्षता घेत लग्नाची तारीख आणि मुहूर्त लिहावा. कारण जर लग्नाची तारीख आणि मुहूर्त लिहिण्यात चूक झाली तर विवाह सोहळ्याचा कार्यक्रम विस्कळित होऊ शकतो. यासाठी येणाऱ्या पाहुण्यांना लग्नाची तारीख आणि मुहूर्त योग्य् पद्धतीने समजेल अशा पद्धतीने लिहिलेला असावा. शक्य असल्यास तारीख आणि मुहूर्त बोल्ड स्वरूपात पत्रिकेत असावा. कारण तो पटकन लक्षात ठेवता येतो. यासोबतच जाणून घ्या हिंदू लग्न विधी समारंभ असतो असा, विवाह विधी घ्या जाणून (Lagna Vidhi Marathi)
आग्रहाचे आमंत्रण
प्रत्येकाची आग्रह करण्याची पद्धत निरनिराळी असते. भारतीय संस्कृतीमध्ये आग्रहाचे निमंत्रण देण्याची पद्धत आहे. एखाद्याला आर्वर्जून आणि प्रेमपूर्वक आग्रहाचे आमंत्रण देणं ही मानाची गोष्ट समजली जाते. असा आग्रह पाहुणे मंडळींना टाळता येत नाही. यासाठी निमंत्रण देताना योग्य शब्दरचना करत प्रेमाने आमंत्रणाचा मजकूर लिहावा.
निमंत्रकांचे नाव
लग्न पत्रिकेमध्ये निमंत्रण करणाऱ्या कुटुंबाचे अथवा व्यक्तीचे नाव असणे गरजेचं आहे. कारण बऱ्याचदा कुटुंबातील इतर पाहुण्यांची ओळख वधू वरांसोबत असतेच असं नाही. यासाठी पत्रिकेवर घरातील मुख्य सदस्य ज्याला सर्व जण ओळखतात त्यांचे नाव लिहीणे गरजेचे असते. अशा वेळी पत्रिकेवर निमंत्रकांच्या नावासोबत त्यांचा फोन नंबर दिला जातो. ज्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांना लग्नकार्याच्या स्थळी पोहचण्यास काही अडचण असेल तर मार्गदर्शन केले जाऊ शकते.
विवाह स्थळ
विवाहाची तारीख आणि मुहूर्ताप्रमाणेच महत्त्वाचे असते ते म्हणजे विवाह स्थळ. ज्या ठिकाणी लग्नसोहळा पार पडणार आहे. त्या ठिकाणाची माहिती आणि पत्ता पाहुण्यांना व्हावा यासाठी विवाह स्थळ अचूक असावे.
स्वागत समारंभ
लग्नाच्या विधींनंतर आजकाल मुंबई सारख्या धकाधकीच्या शहरात लग्नकार्य एकाच दिवसात उरकली जातात. अशा वेळी लग्नाच्या दिवशीच स्वागत समारंभ देखील असतो. त्यामुळे लग्नाच्या आमंत्रण पत्रिकेमध्ये स्वागत समारंभाची माहिती असावी. कारण जर वेगवेगळ्या दिवशी लग्नाचे विधी अथवा स्वागत समारंभ असेल तर त्याची नोंद पत्रिकेत असावी.
ड्रेस कोड
आजकाल थीम वेडिंगचा जमाना आहे. यासाठी या थीमनुसार वधुवर, घरातील मंडळी यांचा पेहराव असतो. बऱ्याचदा पाहुणे मंडळींना पत्रिकेमधून थीमनुसार ड्रेस कोडची सूचना दिली जाते. ज्यामुळे सोहळ्याची रंगत वाढते.
स्नेहांकित अथवा आप्तेष्ठ मंडळींची नावे
पत्रिकेच्या शेवटच्या भागामध्ये स्नेहांकित आणि आप्तेष्ठांची नावे असतात. याचं कारण भारतीय संस्कृतीत मोठ्या आणि एकत्र कुटुंबाची पद्धत आहे. काळानुसार सर्व आजकाल विभक्त पद्धतीने राहत असले तरी मनाने सर्व नक्कीच एकत्र असतात. लग्न पत्रिकेच्या मजकूरात घरातील थोरामोठांची, आप्तेष्ठांची नावे लिहून त्यांचा आदर केला जातो. बऱ्याचदा घरातील स्त्रिया आणि लहान मंडळींची नावे या यादीत असतात.
निवास स्थान
लग्न पत्रिकेमध्ये वधू आणि वरांचा पत्ता असावा कारण बरेच विधी लग्नाआधी आणि लग्नानंतर केले जातात. लग्नसोहळा व्यतिरिक्त असलेले विधी पाहुणे मंडळी आमंत्रणानुसार वधू वरांच्या घरी अथवा ठरलेल्या स्थळी जाऊन उपस्थित राहू शकतात.
लग्न आमंत्रण संदेश वॉट्सअपसाठी –
आजकाल लग्नसोहळे लहान आणि एक दिवसांचे असतात. शिवाय अशा प्रसंगी ऐनवेळी आमंत्रणाची घाई होऊ नये यासाठी पाहुण्यांना व्हॉट्सअपवरून पत्रिका पाठवल्या जातात. यासाठी लग्नाचे आमंत्रण संदेश वॉ्टसअपसाठी (
*यंदा घातला आहे…. लग्नाचा घाट, उपस्थित राहून आपण वाढवावा शुभकार्याचा थाट
*लग्नकार्य म्हणजे, सुख- आनंदाची सभा, तुमच्या येण्याने वाढेल समारंभाची शोभा
*लग्नामुळे जुळतात, सासर आणि माहेर… तुमचा प्रेमळ आर्शीवाद, हाच आमचा आहेर
आणि …. ची जमली आता जोडी, लग्नाला येऊन सर्वांनी वाढवा या मंगल कार्याची गोडी
साधुसंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवरायांच्या महाराष्ट्रात, हिंदू संस्कृतीप्रमाणे मराठमोळ्या वातावरणात हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. तरी आपण या सोहळ्यास उपस्थित राहून शोभा वाढवावी.
*विवाह! एक बंधन, एक कर्तव्य, एक नवं नातं, एक जाणीव. नव्याने जुळणारी एक रेशीम गाठ! एक स्वप्न… दोन डोळ्यांचं, एक हुरहूर… दोन मनांची, एक चाहूल… सात जन्मांची, अशा मंगल क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपणांस विवाहाचे अगत्याचे आमंत्रण.
*अग्नी नारायणाच्या साक्षीने, …. आणि … हे रेशमाच्या बंधनात, वाद्यांच्या गजरात, सनईच्या सुरात, हळदी आणि मेंदीच्या रंगात जीवनसाथी होत आहेत. अशा मंगल प्रसंगी आपले शुभार्शीवाद मिळावेत यासाठी आपणांस आणि परिवारास आग्रहाचे आमंत्रण
*पहिला प्रहर एक क्षण, मेंदीचा बहर एक क्षण, लगीन घाई एक क्षण, वाजे सनई एक क्षण, अंतरपाठ एक क्षण, सर्व सोनेरी क्षणांचा हा जणू एक सण…म्हणूनच आपणांस या सोनेरी क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अगत्याचे आमंत्रण
*ब्रम्हसुतामध्ये बांधली गाठ प्रेमाच्या नात्याची, पृथ्वी तलावर शोभे जोडी…. आणि ….. ची, कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. आमच्या आनंद सोहळ्यातत आपण सर्वांनी उपस्थित राहून वधू – वरांना शुभार्शीवाद आणि सदिच्छा द्याव्या ही विनंती
*नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरल्या रेशीम गाठीत बांधलेली… लग्नाचे आग्रहाचे आमंत्रण
*कमी खर्चात आणि लक्षात राहील असं लग्न
युनिक लग्न निमंत्रण संदेश –
*लग्नसोहळ्याची रंगत वाढवण्यासाठी, पाहुणेमंडळींना आग्रहाचे निमंत्रण देण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत हे खास युनिक लग्न निमंत्रण संदेश (
*लग्न इतक्या गडबडीत ठरलं आणि लग्नाचा मुहूर्तही पण खूपच लवकर ठरला… लग्नाची तयारी करायला खूप कमी वेळ मिळाला, या गडबडीत तुमच्या पर्यंत लग्न पत्रिका येवो न येवो माझे प्रेमाचे आणि आग्रहाचे निमंत्रण मात्र नक्कीच आहे…
*तुमचा आर्शीवाद राहो, सदैव आमच्या पाठी, नक्की या जुळताना… आणि …. च्या रेशीमगाठी
मंगल प्रंसग आणि सप्तपदी, असू दे तुमची साथ, वधू वरांवर असू दे तुमचे प्रेम आणि आर्शीवादाचा हात
आईभवानीचा आर्शीवाद राहो, तुमच्या पाठी, लग्न कार्याची शोभा वाढवा पाहत जुळणाऱ्या नव्या रेशीमगाठी
आणि …. चे जुळले आहेत सप्तसूर, तुमच्या उपस्थित राहण्याने वाढेल लग्नसोहळ्यातील आनंद भरपूर
आणि …. ची जुळणार, जन्मोजन्मींची नाती, उपस्थित राहून उधळा तुमच्या आर्शीवादाचे मोती
लग्नसोहळ्याकडे लक्ष लागले आहे साऱ्या विश्वाचे, आहेरात आणा फक्त अनमोल आर्शीवाद मोलाचे
लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, दोन नात्यांची सात जन्मांसाठी झालेली सुरेख गुंफण… अशा मंगल सोहळ्यासाठी आपणांस आग्रहाचे निमंत्रण
*विवाह हे दोन जीवांचे, दोन प्रेमाचे आणि दोन कुटुंबाचे मिलन आहे, अशा या सुंदर मिलनाचे साक्षीदार होण्यासाठी आपणांस विवाहसोहळ्याचे आग्रहाचे आमंत्रण
*लग्न म्हणजे रेशीमगाठ, अक्षता आणि मंगलाष्टकांची सात, दोनाचे होणार आता चार हात, दोन जीव गुंतरणार एकमेकांत, स्वप्न दोघांचे लग्नाचे, मंगलाष्टकांच्या सुरात पूर्ण होणार, तुमच्या शुभार्शीवादाने नव्या संसाराची सुरवात होणार
लग्नाचे बेस्ट आमंत्रण संदेश –
लग्नकार्यासाठी बेस्ट आमंत्रण द्यायचे असेल तर पत्रिकेवरचा मजकूरही थोडा हटके आणि बेस्ट हवा. यासाठी आम्ही शेअर करत आहोत काही खास लग्न निमंत्रण संदेश
*जन्म दिला माता पित्याने, गाठ मारली ब्रम्हदेवाने, होईल आज विवाह अग्नीदेवाच्या साक्षीने, शुभ कार्य सिद्धीस जाईल श्री गणेशाच्या आर्शीवादाने. संसाराची सुरूवात होईल सप्तपदीने, मंगलप्रसंगाची शोभा वाढू दे तुमच्या येण्याने
*विवाह म्हणजे आयुष्याच्या वेलीवरचे हळुवार पान, दोन जीवांना जोडणारा एक नाजूक धागा, दोन कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध, सात जन्मांच्या गाठी जुळवणारा हा सोहळा, आपल्या शुभेच्छा आणि आर्शीवादा शिवाय अपूर्ण… म्हणूनच आपणांस लग्नसोहळ्याचे आग्रहाचे निमंत्रण
*नवदाम्पत्याच्या सहजीवनाच्या नूतन पर्वाचा शुभारंभ होतोय, कुलस्वामिनीच्या कृपेने, अग्नीदेवतेच्या साक्षीने, श्री गणेशाच्या आर्शवादाने आणि त्यांच्या या वाटचालीत हवे आहात आपले शुभार्शिवाद… आपणांस लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण
*ऋणानूबंध ठाऊक नव्हते.. एकमेकांना शोधत होते, नाते तसे जुनेच होते, आगमन झाले शुभयोगाचे, नाते जुळले दोन मनांचे, असे हे बंध रेशमाचे, अथांग हा सागर संसाराचा, विवाह होतोय…. आणि …. चा, आर्शीवाद असो मान्यवरांचा. आपले पणाचे आमंत्रण आमचे आणि आपुलकीने आगमन तुमचे !!!
*विश्वा दिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी केला संसार पंढरी, शिवरायांनी रोवला स्वराज्यांचा झेंडा, असा महाराष्ट्र धर्म राडवेडा, याच मातीतील अभंग आणि ओव्या विवाहास येत आपण ,…. आणि …. यांच्यावर मंगल अक्षता पाडाव्या
*लग्न म्हणजे जुळलेले बंध, लग्न म्हणजे एक नवा अनुबंध*विवाह म्हणजे आजन्म साथ, आनंद आणि सुखाची बरसात, …. आणि…. यांची जमली जोडी…. आपण येऊन त्यात घालावी आर्शीवादाची साथ
सप्तपदींची सात पावले म्हणजे सात जन्मांच्या गाठी, यायलाच हवे तुम्हाला … आणि …. यांच्या विवाहासाठी,…
*सागराला साथ लाटांची, सूर्याला साथ किरणांची, पृथ्वीतलांवर जोडी शोभे …. आणि … ची, ईश्वरानेच गाठ बांधली सात जन्मांची, पूर्व जन्मींची पुण्याई…. घराण्याची, सहपरिवार येऊन शोभा वाढवावी आपण मंगल कार्यांची…
*पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा, भेट क्षणाची पण मैत्री जन्माची, मुहूर्त क्षणाचा पण नाती कायमची, आपला सहभाग क्षणाचा पण आर्शीवाज आयुष्यभराचा… या मनस्वी इच्छेने शुभमंगल प्रसंगी अगत्य येऊन वधू वरांना आर्शावाद द्यावे.
0
Answer link
लग्नपत्रिका (Lagna Patrika) छापण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असते:
1. नियोजन आणि तयारी:
- आमंत्रितांची यादी: लग्नाला किती लोकांना बोलवायचे आहे, याची यादी तयार करणे.
- बजेट: पत्रिका छपाईसाठी किती खर्च करायचा आहे, हे ठरवणे.
- वेळेचे नियोजन: पत्रिका वेळेवर छापून मिळण्यासाठी योग्य वेळी ऑर्डर देणे.
2. डिझाइन निवडणे:
- शैली (Style): पारंपरिक, आधुनिक,Minimalist किंवा थीम असलेली डिझाइन निवडणे.
- रंग आणि फॉन्ट: पत्रिका आकर्षक दिसण्यासाठी योग्य रंग आणि अक्षरांचे (Font) निवड करणे.
- सामग्री (Content): पत्रिकेत काय माहिती टाकायची आहे, जसे की लग्नस्थळ, तारीख, वेळ, RSVP (Party invitation) माहिती.
3. डिझाइन बनवणे:
- ग्राफिक डिझायनर: व्यावसायिक ग्राफिक डिझायनरकडून डिझाइन बनवून घेणे.
- ऑनलाइन टूल्स: कॅनव्हा (Canva) सारख्या ऑनलाइन टूल्सचा वापर करणे. कॅनव्हा (Canva)
4. छपाई (Printing):
- प्रिंटिंग प्रेस निवडणे: चांगली प्रिंटिंग प्रेस निवडणे.
- पेपर निवडणे: जाड आणि चांगल्या प्रतीचा पेपर निवडणे.
- finishing टच: पत्रिकेला आकर्षक बनवण्यासाठी Foil stamping, Embossing आणि Letterpress यांसारख्या finishing touch देणे.
5. प्रूफरीडिंग:
- तपासणी: छापण्यापूर्वी डिझाइन आणि माहितीची तपासणी करणे.
- सुधारणा: काही चुका असल्यास त्या सुधारणे.
6. वितरण:
- वितरण: पत्रिका नातेवाईक आणि मित्रांना वेळेवर पाठवणे.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार या प्रक्रियेत बदल करू शकता.