विवाह कायदा वैवाहिक कायदा

घटस्फोट घेताना नवऱ्याच्या संपत्तीमध्ये बायकोचा हिस्सा असतो का, पोटगी किती असते?

2 उत्तरे
2 answers

घटस्फोट घेताना नवऱ्याच्या संपत्तीमध्ये बायकोचा हिस्सा असतो का, पोटगी किती असते?

2
.

एकमेकांपासून पती-पत्नी वेगळे राहत असेल, किंवा त्यांचा घटस्फोट झाला असेल तर मात्र पत्नी पतीकडून हिंदू विवाह कायदा कलम 24 व 25 नुसार मेन्टेनन्स मनी घेऊ शकते. त्यालाच आपण मराठीमध्ये खाओटी किंवा पोटगी असे म्हणतो. आता मेंटेनन्स मनी हा जो असतो तो पत्नीच्या निर्वाह किंवा भरण-पोषण यासाठी प्रत्येक महिन्याला कोर्टाने ठरवून दिलेली एक रक्कम असतेअल्युमिनी जर असेल तर अशावेळी दोघांमध्ये म्युच्युअल डिवोर्स झालेला असतो. अशावेळी वन टाइम सेटलमेंट केली जाते असे असताना पत्नीला एकाच वेळेला एक ठराविक रक्कम दिली जाते. जसे दोन लाख, चार लाख, पाच लाख किंवा एक कोटी अशी जी काही असेल,

ती रक्कम एकाच वेळी पत्नीला दिली जाते व सेटलमेंट करून म्युच्युअल डिवोर्स घेतला जातो. पती द्वारे पत्नी ला जी पोटगी किंवा खाओटी मिळवण्यासाठी पत्नीला कायदेशीर गोष्टी कराव्या लागतात त्या आपण पुढील लेखात बघू.

या माहितीमध्ये आपण फक्त जर पती पत्नी एकमेकांपासून दूर असेल, किंवा त्यांचा घटस्फोट झालेला असेल, किंवा त्यांच्या घटस्फोटाची गोष्टही कोर्टापर्यंत गेलेली असेल तर अशा वेळेस पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टी मध्ये कशाप्रकारे अधिकार असतो याबद्दलची ही संपूर्ण माहिती आहे.कारण की जर समजा एखाद्या पत्नीचा पती हा जर मृत्यू पावला तर त्याच्या मृत्यूपश्चात पत्नीचा जो पतीच्या प्रॉपर्टी वर अधिकार असतो त्याविषयीची कायदेशीर तरतूद ही वेगळी आहे त्याबद्दल आपण दुसऱ्या लेखात आपण माहिती घेवूत. जर एखाद्या पती-पत्नीमधील कुठल्याही प्रकारची जर भांडण नसेल किंवा हेवा दावा नसेल, त्यांचा संसार सुरळीत चालू असेल तर मित्रांनो पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टी वर किती अधिकार आहे किंवा नाही अशा काही गोष्टींचा प्रश्न हा उद्भवतच नाही.तर मित्रांनो, पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टी वर अधिकार हा कशाप्रकारे असतो? त्याबद्दलचे नियम: १) समजा जर लग्नानंतर पत्नीने स्वतः एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती स्वतः विकत घेतली असेल, त्या संपत्तीचे मुख्य नाव पत्नीच्या नावाने असेल किंवा ती संपत्ती पूर्णपणे तिच्या नावावर असेल तर ती प्रॉपर्टी तिची झाली.

त्या संपत्तीवरती पतीचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसतो. 2) जर समजा, एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती पतीने स्वतः विकत घेतलेली असेल आणि ती संपत्ती त्याच्या स्वतःच्या नावावर जर असेल तर मित्रांनो त्या प्रॉपर्टी वरती पत्नीचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसतो.

3 ) समजा, पत्नीने जर एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती विकत घेतली. प्रॉपर्टी घेण्याकरता चे संपूर्ण पैसे स्वतः जवळचेवापरले मात्र त्या संपत्तीचे मुख्य नाव हे आपल्या पतीच्या नावाने केले असेल, म्हणजेच त्या पत्नीने ती प्रॉपर्टी आपल्या पतीच्या नावे विकत घेतली. अशा कंडिशन मध्ये त्या संपत्तीवरती पूर्ण अधिकार हा पतीचा होतो.

पण मात्र अशी प्रॉपर्टी पत्नीला मिळू शकते. पण ती मिळवण्यासाठी पत्नीला दिवाणी खटला दाखल करावा लागतो व पत्नीला हे स्पष्ट करावे लागेल की ही प्रॉपर्टी स्वतः विकत घेतली आहे. समजा ती महिला नोकरी करत असेल किंवा एखादा व्यवसाय करत असेल तर तिने नोकरीतून किंवा त्या व्यवसायामधून जी आवक आहे. त्यातून ती प्रॉपर्टी घेतलेली आहे.

हे तिला सिद्ध करावे लागेल किंवा जर तिने ती प्रॉपर्टी घेताना वडिलांकडून मदत घेतली असेल किंवा तिच्या वडिलांनी तिला ती संपत्ती घेऊन दिलेली असेल तर तसं तिला सिद्ध करावं लागेल. त्यांनंतरच सदर मालमत्तेवरपत्नीला हक्क प्रस्थापित करता येईल.

4) जर समजा, एखाद्या पतीने एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती विकत घेतली व संपत्ती घेताना सर्व पैसे हे पती ने लावले आणि प्रॉपर्टीला नाव मात्र पत्नीचे लावले म्हणजे संपत्ती चे मुख्य नाव हे पत्नीच्या नावाने आहेत तर मित्रांनो ही प्रॉपर्टी कुणाची? तर मित्रांनो त्या प्रॉपर्टी वरती संपूर्ण अधिकार हा पत्नीचा होतो म्हणजे साधी गोष्ट आहे की,

प्रॉपर्टी घेताना पैसे कुणीही देवो मात्र त्या संपत्तीचे नाव ही ज्याच्या नावे आहे किंवा ती संपत्ती ज्याच्या नावावर आहे त्याचा त्या प्रॉपर्टीवर अधिकार होतो. अशा घडामोडी मध्ये जर पतीला ती संपत्ती मिळवायची असेल तर पतीला सुद्धा दिवाणी न्यायालयात खटला दाखल करावा लागतो व त्याला सुद्धा कोर्टासमोर सिद्ध करावं लागेल की ही संपत्ती घेताना त्याने स्वतः पूर्ण पैसा लावलेला आहे. जेव्हा कोर्टात हे सिद्ध होईल की ही पूर्ण संपत्ती याची आहे. तेव्हाच पतीचा त्या संपत्तीवर अधिकार सिद्ध होतो.5) जर समजा एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती पती व पत्नी या दोघांनी मिळून घेतली. ती प्रॉपर्टी घेताना पैसे सुद्धा दोघांनी लावले व त्या प्रॉपर्टी चे नाव सुद्धा दोघांच्या नावे आहे, म्हणजेच ती संपत्ती दोघांच्या नावावर आहे म्हणजे त्या प्रॉपर्टीला जे नाव आहे ते दोघांचे नाव आहे.

तर अशा वेळेस त्या प्रॉपर्टी वरती कुणाचा अधिकार असेल तर मित्रांनो अशा वेळेस त्या प्रॉपर्टीवर ती पती-पत्नी दोघांचाही अधिकार हा सारखाच असतो. मग अशा वेळेस त्या प्रॉपर्टीचे विभाजन कशा पद्धतीने केले जाते? अशी प्रॉपर्टी विकून जो काही पैसा येतो त्या पैशाचे सारखे दोन भाग केले जाते व आपला आपला हिस्सा प्रत्येकाला दिला जातो. तर अशा प्रकारे पत्नीचा आपल्या पतीच्या प्रॉपर्टी वर कशा प्रकारे अधिकार असतो याबद्दलची ही थोडक्यात माहिती होती.घटस्फोट घेताना नवऱ्याच्या संपत्तीमध्ये बायकोचा हिस्सा असतो का, पोटगी किती असते?
उत्तर लिहिले · 8/5/2022
कर्म · 53710
0

हिंदू विवाह कायदा, 1955 नुसार, घटस्फोट घेताना नवऱ्याच्या संपत्तीमध्ये बायकोचा हक्क असतो की नाही, हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते.

संपत्तीचे स्वरूप:
  • स्व-अधिग्रहित मालमत्ता: नवऱ्याने स्वतःच्या कमाईतून किंवा प्रयत्नांनी घेतलेली मालमत्ता.
  • Ortsteil (ancestral property): वडिलोपार्जित मालमत्ता, जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे.
पत्नीचा हक्क:
  • स्व-अधिग्रहित मालमत्ता: सर्वसाधारणपणे, पत्नीचा नवऱ्याच्या स्व-अधिग्रहित मालमत्तेवर थेट हक्क नसतो. मात्र, कोर्ट काही विशिष्ट परिस्थितीत पत्नीला नुकसान भरपाई देण्याचा आदेश देऊ शकते.
  • वडिलोपार्जित मालमत्ता: वडिलोपार्जित मालमत्तेत पत्नीचा हक्क असतो. घटस्फोट झाल्यास, कोर्ट पत्नीला या मालमत्तेतील काही भाग देण्याचा आदेश देऊ शकते.
पोटगी (Alimony):

पोटगी म्हणजे घटस्फोटानंतर पत्नीला उदरनिर्वाहासाठी दिली जाणारी रक्कम. पोटगी किती द्यायची, हे कोर्ट अनेक गोष्टी विचारात घेऊन ठरवते, जसे की:

  • नवऱ्याची कमाई
  • पत्नीची गरज
  • विवाहाचा कालावधी
  • दोघांची जीवनशैली

पोटगी एकरकमी किंवा मासिक स्वरूपात दिली जाऊ शकते.

अधिक माहितीसाठी:

अधिक माहितीसाठी तुम्ही वकिलाचा सल्ला घेऊ शकता.

संबंधित काही सरकारी वेबसाईट आणि कायद्याची माहिती देणाऱ्या वेबसाईट

DISCLAIMER: हे केवळ सामान्य माहिती आहे आणि कायदेशीर सल्ला नाही.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1760

Related Questions

पत्नीला पतीकडून घटस्फोट पाहिजे आहे परंतु पत्नी सरकारी नोकरीत आहे. तर पत्नीने पतीकडून घटस्फोट घेतल्यास पत्नीच्या नोकरीवर त्याचा काही परिणाम होतो का?
घटस्फोट झाल्यावर नवऱ्याचे घर बायकोला मिळते का?
पोटगी दिली नाही तर काय?
पहिली पत्नी जिवंत असताना पतीने दुसरा विवाह केल्यास पहिल्या पत्नीने काय कायदेशीर कारवाई करावी?
नवरा बायको यांना मुलगा मुलगी नसली तरी घटस्फोट घेताना पोटगी किती द्यावी लागेल? जर मुलगा जॉबला नसेल तर काही उपाय आहे का?
घटस्फोट झाल्यावर पोटगी किती दिवस द्यावी लागते?
कलम ४९८ पासून पती ने बचाव कसा करावा?