कला मराठी भाषा पुस्तके साहित्य

मराठीतील पहिले छापील पुस्तक कोणते होते, ती माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

मराठीतील पहिले छापील पुस्तक कोणते होते, ती माहिती मिळेल का?

1
मराठीतलं पहिलं छापील पुस्तक निघाले १८०५ साली डॉ. विल्यम कॅरे याचं "द ग्रामर ऑफ मरहट्ट लँग्वेज". तेही या ख्रिस्ती माणसाने त्यांच्या धर्मप्रसारासाठी काढलेले. मराठीतलं पहिलं वृत्तपत्र काढलं बाळशास्त्री जांभेकरांनी१८३२मध्ये "दर्पण" या नावाने. पण खरंतर त्यातला सगळा मजकूर मराठीत नसे. काही इंग्रजीमध्ये देखील असे. म्हणून सगळा मजकूर मराठीत असणारे पहिले नियतकालिक असण्याचा मान "मुंबई अखबार" या १८४० साली निघालेल्या वृत्तपत्राला जातो.

दीर्घकाळ टिकलेले व संपादक भाऊ महाजन यांच्या तिखट राजकीय लेखनाने गाजलेले "प्रभाकर" हे पत्र १८४१ साली सुरु झाले. लोकहितवादींची सुप्रसिद्ध 'शतपत्रे' याच पत्रात प्रथम प्रसिद्ध झाली. याच भाऊ महाजन यांनी "धुमकेतू” नावाचे साप्ताहिकही काही दिवस चालवले. तिथपासून मग १८४२ मध्ये ज्ञानोदय १८४९ सालचे ज्ञानप्रकाश ( जे पुढे १०३ वर्षे चालून १ जाने १९५१ रोजी बंद पडले), इंदुप्रकाश (संपादक विष्णुशास्त्री पंडित), सुधारकांवर टीका करणारे"वर्तमानदीपिका" अशा या नियतकालिकांची परंपरा सुरु झाली. याच वर्तमानदीपिकेत येणाऱ्या लेखांचा समाचार घेण्यासाठी भाऊंनी वर उल्लेख केलेले धुमकेतू साप्ताहिक सुरु केले होते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी तर त्यांच्या उण्यापुऱ्या ३२ वर्षांच्या आयुष्यात ( १८५०-१८८२ ) मासिक "निबंधमाला" ( १८७४-१८८१ ) आणि केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरु केली. १८३२ पासून आता २०१७पर्यंत हजारो नियतकालिके सुरु झाली असतील. त्यातील काही काळ चालून बंद पडली असतील अशांची संख्या लक्षणीय. पण म्हणून पुढचा नवीन नियतकालिक चालू करणारा बिचकायचा अजिबात नाही. तो त्याला हव्या नियतकालिक सुरु असणाऱ्या करायचाच. विषयाचं मराठी माणसाला व्यक्त होण्याची किती आस आहे पहा..याच परंपरेतील काही लक्षणीय कामगिरी करणाऱ्या नियतकालिकांमध्ये कालानुक्रमे मनोरंजन, केरळकोकीळ, पुरुषार्थ, विविधवृत्त, विविधज्ञानविस्तार, प्रसाद ; त्यानंतरच्या काळातील किर्लोस्कर, युगवाणी, माणूस, सत्यकथा, अभिरुची, सोबत, साधना, अमृत, विचित्रविश्व, विज्ञानयुग आणि अलीकडील अंतर्नाद, रुची शब्द, ललित, अनुभव, अक्षरवैदर्भी, परिवर्तनाचा वाटसरू, आजचा सुधारक यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आणि ही परंपरा आजही अर्थक्रांती, शिक्षण विषयाला वाहिलेले 'जडणघडण पर्यावरणावरील 'भवताल' मुलांसाठीचे 'वयम्' या मासिकांनी सुरु ठेवली आहे. हे सर्व मी माझ्या अल्पज्ञानानुसार सांगत आहे. यात ,अजून भरपूर नावांची भर पडू शकेल याची मला खात्री आहे. तरीही यात आपण वृत्तपत्र समूहाची जी साप्ताहिके आहेत उदा. लोकप्रभा, साप्ताहिक सकाळ, विवेक याचा उल्लेख केलेला नाही. एकाच वेळी एकापेक्षा जास्त भाषांतून निघणाऱ्या 'चित्रलेखा'चाही उल्लेख राहिलाच.

स्वातंत्र्य पूर्व म्हणजे १९४७ च्या आधी सुरु झालेली नियतकालिके मुख्यत्वे दोन विषयांवर केंद्रित असायची. समाजसुधारणा आणि स्वातंत्र्य चळवळीचा प्रसार / प्रचार खूप तात्विक वाद चालायचा दोघांच्यात. आधी स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा ? अगदी हमरीतुमरीवर येऊन हा वाद चाले. एरवी असलेले चांगले मित्र या वादांमुळे दुरावल्याची भरपूर उदाहरणे सापडतील. पण दोन्हीपक्षांनी केलेल्या मेहेनतीचे फळ स्वातंत्र्योत्तर काळातील आमची आताची पिढी चाखत आहे. स्वातंत्र्य तर मिळालेले आहेच पण समाज सुधारणांनाही बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे. जाती, लिंग, धर्म, वर्गभेदांपलीकडे जाऊन सर्वांना समान संधी मिळू लागली आहे. जागतिक दर्जाचे साहित्य अनुवादातून मराठीत आणणे, विज्ञान / शिक्षणाचा प्रसार, जीवनाचा सर्वांगीण रसरशीत अनुभव घेण्यासाठी कविता / चित्रपट / हस्तचित्रे/ छायाचित्रे यांचा रसास्वाद घेणे हे त्या त्या घेतलेल्या नियतकालीकांमुळेच शक्य झाले आहे. मराठी साहित्यातील मैलाचा दगड ठरलेल्या अनेक साहित्यकृतींचा या नियतकालिकांमधूनच झाला आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात नियतकालिकांची कामगिरी सुवर्णाक्षराने लिहावी अशी यात शंका नाही.
उत्तर लिहिले · 4/5/2022
कर्म · 53710
0

मराठीतील पहिले छापील पुस्तक 'ख्रिस्ताचे धर्मशास्त्र' (Doctrina Christam) हे होते. हे पुस्तक इ.स. 1543 मध्ये गोव्यामध्ये छापले गेले.

पुस्तकाविषयी अधिक माहिती:

  • हे पुस्तक फादर थॉमस स्टीvens यांनी लिहिले होते.
  • 'दोत्रीना ख्रिस्तां' हे कॅथोलिक चर्चच्या शिकवणुकीचे स्पष्टीकरण करणारे पुस्तक आहे.
  • हे पुस्तक मराठी भाषेत असले तरी लिपी रोमन होती.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1080

Related Questions

‘गारंबीचा बापू’ मधील प्रादेशिकता vivid करा?
‘भूक’ या कथेतील नायकाची व्यक्तिरेखा स्पष्ट करा?
एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
रामायण हे महाकाव्य कोणत्या ऋषींनी रचले?
कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेचा परामर्श द्या?
लोककथांचे वाड्मयीन सौंदर्य विशद करा?
लोकसाहित्याची स्वरूप व व्याप्ती थोडक्यात स्पष्ट करा?