सामान्य ज्ञान म्हणी

रिकाम न्हावी आणि कुडाला तुंबड्या लावी याचा अर्थ काय?

2 उत्तरे
2 answers

रिकाम न्हावी आणि कुडाला तुंबड्या लावी याचा अर्थ काय?

4
 "रिकामा न्हावी आणि कुडाला तुंबड्या लावी" अशी म्हण आहे, '  कारण 'कुड' आणि भिंत हे समानार्थी शब्द आहेत. या म्हणीचा अर्थ असा आहे की रिकाम्या वेळात विनाकारण लोकांच्या गोष्टीत रस घेणे.

हि म्हण समजून घेण्यासाठी प्रथम 'तुंबडी' म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. पूर्वी न्हावी हे घरोघर जाऊन व्यवसाय करीत असत. आजच्या पिढीला कदाचित माहित नसेल, पण पूर्वी न्हावी हे किरकोळ शस्त्रक्रिया सुद्धा करीत असत. मी जी तुंबडी पाहिल्याचे माझ्या आठवणीत आहे, त्यानुसार तुंबडी हि साधारण एक वीत लांब असे धातूचे नळकांडे असायचे, पण एका बाजूचा त्याचा व्यास हा दुसऱ्या बाजूपेक्षा थोडा मोठा असे. जखमेतील अशुद्ध रक्त बाहेर काढण्यासाठी याचा उपयोग केला जात असे. तुंबडीचे एक टोक जखमेवर ठेऊन दुसऱ्या बाजूने तोंडानी हवा खेचून घेऊन ते अशुद्ध रक्त काढीत असत. हे काम ते मोठ्या सफाईने करीत असत. माझ्या लहानपणी म्हणजे जवळजवळ साठ वर्षांपूर्वी मी हा प्रकार पाहिल्याचे मला आठवते.

हि तुंबडी नळकांड्यासारखी असल्यामुळे ती कुडाला म्हणजे खेडेगावातल्या कुडाच्या भिंतीला टेकवून आतमध्ये चाललेले संभाषण ऐकण्यासाठी सुद्धा वापरता येत असे. जर कोणी न्हावी काही काम नसल्यामुळे रिकामा बसून असला तर तो कुडाला तुंबडी लावून गावातली माहिती गोळा करू शकत असे. त्याच्यावरून हि म्हणून पडली.
उत्तर लिहिले · 20/4/2022
कर्म · 121765
0

अर्थ: ज्या माणसाला काही काम नसतं, तो माणूस काहीतरी निरर्थक उद्योग करतो.

इंग्रजीमध्ये: An idle brain is a devil's workshop.

उदाहरण: राजू दिवसभर घरी बसून काहीतरी करत असतो, तो तर रिकामा न्हावी आणि कुडाला तुंबड्या लावी असा आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2700

Related Questions

भारतीय स्टेट बँक स्थापना दिवस कधी साजरा करतात?
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन कधी असतो?
अ वर्ग महानगरपालिका म्हणजे कोणत्या महानगरपालिका?
सांगली महानगरपालिका कोणत्या वर्गात मोडते?
भारतातील सर्वात लहान राज्य क्षेत्रफळानुसार कोणते?
भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते?
महाराष्ट्रातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते?