2 उत्तरे
2
answers
छकडा म्हणजे काय?
2
Answer link
भारतासारख्या कृषिप्रधान देशात प्रवासाचे स्वस्तातील साधन म्हणजे बैलगाडी. केवळ प्रवासासाठीच नव्हे तर शेतीच्या प्रत्येक कामासाठी बैलगाडी उपयोगी पडते.
या बैलगाडीचे दोन प्रकार रूढ आहेत. दोन बैलांनी ओढावयाची गाडी आणि एका बैलाने ओढायची गाडी. एक बैल लागणाऱ्या गाडीलाच 'छकडा' असे म्हणतात. महाराष्ट्राच्या काही भागांत याला 'एक्का' किंवा 'यक्का' असेही संबोधले जाते.
'शकट' या संस्कृत शब्दापासून प्राकृतमध्ये 'छक्कड' हा शब्द तयार झाला. या प्राकृत 'छक्कड' पासून मराठीत 'छकडा' सिद्ध झाला. ग्रामीण भागात असा छकडा विविध कारणांसाठी आजही वापरला जातो. अगदी शेतातली ओली वैरण आणण्यापासून तो शेजारच्या गावी यात्रेला जाण्यासाठीही!
इ.स.पहिल्या-दुसऱ्या शतकात इटली व चीनमध्ये ही गाडी प्रथम वापरात आल्याचा उल्लेख आढळतो. तथापि दोन दांड्यामध्ये एक बैल जुंपण्याची पद्धत युरोपमधील शेतकऱ्यांनी फारशी स्वीकारली नाही. मात्र अद्यापही पुर्वेकडील देशांतून ह्या एक बैलाच्या गाड्यांचा वापर करण्यात येतो.
शिवकाळामध्ये या छकड्याचा वापर दारूगोळा, खजिना, तंबू इत्यादी नेण्यासाठी केला जात असे. या छकड्याला आच्छादनासाठी तट्या बांधलेला असायचा आणि त्याची उंचीही बैलगाडीपेक्षा कमी ठेवलेली असायची.
कालांतराने कमी माणसांच्या प्रवासासाठीही हा छकडा वापरला जाऊ लागला. कोकणातील खोत, देसाई यासारखी श्रीमंत आणि वतनदार मंडळी या छकड्याला थाटामाटाने सजवतात. मणी-माळा बांधतात तसेच त्याला रंगही देतात.
वजनाने हलक्या असलेल्या या बैलगाडीत तीन किंवा चार माणसे बसण्याची व्यवस्था असायची. ऊन, पाऊस लागू नये यासाठी वरून कमानीच्या आकाराचा कापडी पडदा लावला जायचा. गाडी बनवण्यासाठी देवदार किंवा सागवान लाकूड वापरले जात असे.
जुन्या काळात लग्नाची वऱ्हाडी मंडळी जेव्हा दुसऱ्या गावी जायची, तेव्हा पाच-पंचवीस छकड्यांचा ताफा एकामागून एक रांगेमध्ये निघत असे. हे दृश्य खूप मजेदार दिसे.
संदर्भ-
ग्रामीण बोलीचा शब्दकोश
0
Answer link
छकडा म्हणजे ग्रामीण भागात वापरले जाणारे एक प्रकारचे बैलांनी ओढायचे वाहन आहे.
- हे सहसा शेती उपयोगी साहित्य, माल आणि माणसांच्या वाहतुकीसाठी वापरले जाते.
- छकड्याला दोन मोठे चाके असतात आणि ते बैलांच्या जोडीने ओढले जाते.
- हे वाहन विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अजूनही उपयोगात आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: