3 उत्तरे
3
answers
शेतामधील वीजतारेमध्ये आकडा टाकला तर काय होते?
5
Answer link
शेतामधील वीजतारेमध्ये आकडा टाकला तर साधारणपणे दोन गोष्टी होतील एक म्हणजे आकडा टाकल्यावर तुमची शेतातील विहिरीवर असणारी मोटार चालू होईल ज्याद्वारे तुम्ही तुमच्या पिकांना पाणी देऊ शकता त्यामुळे तुमची पिके जोमदार येतील .
आकडा टाकल्यावर होऊ शकणारी दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा तो आकडा अधिकाऱ्यांकडून पकडला जाऊ शकतो यातून तुमच्यावरच वीजचोरीचा गुन्हा दाखल होऊ शकतो शिवाय मोठ्या प्रमाणात आर्थिक दंडही भरावा लागू शकतो आणि समाजात बदनामी होईल ती वेगळीच .
वरील दोन गोष्टी आकडा टाकल्यावर होतील म्हणूनच आमचा एकच सल्ला असेल आकडा टाकून वीज घेण्यापेक्षा सरळ अधिकृत वीज कनेक्शन घ्या म्हणजे असे प्रश्न पुन्हा पडणार नाहीत
1
Answer link
शेतामध्ये विजेच्या तारेला आकडा टाकला आहे, वायरमन साहेबांना सापडला आहे. तर ते म्हणतात की 40 ते 50 हजार दंड भरावा लागेल व ऑनलाईन कोटेशन फॉर्म भरायचा आहे. आम्हाला माहिती नाही, तुम्हाला दंड भरावा लागेल.
तर मग सरकारी कायद्यानुसार दंड किती भरावा लागेल? लवकर उत्तर अपेक्षित आहे सर.
0
Answer link
शेतातील वीजतारेमध्ये आकडा टाकल्यास खालील गोष्टी होऊ शकतात:
- शॉर्ट सर्किट: आकडा टाकल्याने शॉर्ट सर्किट होऊ शकते, ज्यामुळे वीजपुरवठा खंडित होऊ शकतो आणि उपकरणे निकामी होऊ शकतात.
- आग: शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची शक्यता असते, ज्यामुळे शेती आणि आसपासच्या परिसराचे मोठे नुकसान होऊ शकते.
- मृत्यू: वीज तारेला स्पर्श झाल्यास विजेचा धक्का लागून मृत्यू देखील होऊ शकतो.
- गुन्हा: वीज चोरी करणे कायद्याने गुन्हा आहे आणि पकडले গেলে कायदेशीर कारवाई होऊ शकते.
त्यामुळे, शेतातील वीजतारेमध्ये आकडा टाकणे अत्यंत धोकादायक आणि गैरकानूनी आहे.