पोवाडे गाणाऱ्या कलाकारांस शाहीर म्हटले जाते.[१]
कार्य
पोवाडे गावून समाजाचे प्रबोधन करणे आणि त्यातून समाजाला विचारांची दिशा देणे असे सामाजिक आणि ऐतिहासिक काम शाहीर करीत असतात.[२] छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम[३] , डॉ. भीमराव आंबेडकर यांचे सामाजिक कार्य[४] अशा विविध विषयांवर शाहिरी कार्यक्रम सादर केले जातात. बदलत्या कालानुसार शाहिरी कार्यक्रमाचे स्वरूप आणि आशय बदलताना दिसून येतो. तत्कालीन ज्वलंत विषयावर समाज प्रबोधन व्हावे यासाठी सुद्धा शाहीर समाजाला संबोधित करतात.[५]
मराठी शाहीरांचे गायन प्रकारानुसार संबोधन संपादन करा
राष्ट्रशाहीर
लोकशाहीर
शिवशाहीर
भिमशाहीर
बाह्य दुवे संपादन करा
शाहीर आणि शाहिरी कवने
शाहीर गजानन वैद्य
पोवाडा हा वीर रसांतील लेखनाचा आणि गायनाचा महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रकार आहे. पोवाड्याचा शब्दश: अर्थ उच्चरवातला संवाद ( संस्कृत प्र + वद ==> पवद ==> पवड ==> पवाडा ==> पोवाडा) असा होतो. वीरांच्या पराक्रमांचे, विद्वानांच्या बुद्धिमत्तेचे तसेच एखाद्याच्या सामर्थ्य, गुण, कौशल्ये इ. गुणांचे काव्यात्मक वर्णन प्रशस्ती किंवा स्तुतीस्तोत्र म्हणजे पोवाडा, असा पोवाडा शब्दाचा अर्थ महाराष्ट्र शब्दकोशात दिला आहे .
पोवाड्याचा उल्लेख ज्ञानेश्वरी मध्ये "पवद" असा केलेला आढळतो. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांवर केलेले पोवाडे विशेष प्रसिद्ध आहेत.
मराठी भाषिकांचा हा एक स्फूर्ति देणारा गीत प्रकार आहे. भारतात याचा उदय साधारण १७ व्या शतकात झाला. पोवाड्यात ऐतिहासिक घटना समोर ठेवून गीत रचना केली जाते आणि खास वेगळ्या अशा धाटणीने मनोरंजक पद्धतीने गायली जाते. पोवाड्याची गीते रचणाऱ्या आणि गाणाऱ्या लोक कलावंतांना शाहीर म्हणतात.
अगदी आद्य पोवाडे संपादन करा
इ.स. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी राजे यांनी अफझलखानाचा वध केला. त्या प्रसंगावर अग्निदास यांनी एक पोवाडा रचून तो गायला होता. कवी तुलसीदास यांनी सिंहगड सर करणाऱ्या तानाजीवर पोवाडा केला होता, तर यमाजी भास्कर यांचा बाजी पासलकरवर पोवाडा आहे.
महाराष्ट्रामधील पेशव्यांच्या कारकिर्दीत राम जोशी (१७६२-१८१२) अनंत फंदी (१७४४-१८१९) होनाजी बाळा (१७५४-१८४४) प्रभाकर (१७६९-१८४३) वगैरेंनी अनेक पोवाड्यांची रचना केली.[१]
हॅरी अरबुथनोट अक्वोर्थ आणि एस.टी. शालिग्राम यांनी साधारण ६० पोवाडे मिळविले आणि ‘इतिहास प्रसिद्ध पुरूषांचे व स्त्रियांचे पोवाडे’ हे पुस्तक लिहून सन १८९१मध्ये प्रसिद्ध केले.[२] यापैकी १० पोवाड्यांचे एच. ए. अक्वोर्थ यांनी १८९४ मध्ये इंग्लिश भाषेत भाषांतर केले आणि ते ‘बॅलाड्स ऑफ द मराठा’ (मराठी पोवाडे) नावाने प्रसिद्ध केले.
मी शिवाजी राजे भोसले बोलतोय (२००९)या मराठी सिनेमा मध्ये अफझलखानाचा वध हा पोवाडा गायला आहे.[३]
महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी राजांची समाधी शोधून काढली आणि सन १८६९ मध्ये पुणे येथे शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. त्यांनी त्या समाधीची दुरूस्ती केली आणि त्यांनी त्यांचे ‘बल्लड(पोवाडा) ऑन शिवाजी’ हे पहिले पुस्तक लिहिले.[४]
महानुभाव संप्रदायातले भानुकवी जामोदेकर (जन्म : नांदेड जिल्हा, इ.स. १९२३) यांनी स्वातंत्र्याचा पोवाडा, रझाकाराचा पोवाडा वगैरे पोवाडे लिहिले होते. त्यांनी काही काळ शाहिरीचे व कलगीतुऱ्याचे अनेक प्रयोग केले.
शाहीर पांडुरंग दत्तात्रय खाडिलकर यांचे 'वीराग्रणी मुरारबाजी देशपांडे अर्थात् पुरंदरचा वेढा', 'शाहिस्तेखानाचा पराभव' हे पोवाडे यथे आहेत
पोवाड्यांचे प्रशिक्षण
१. पुण्यातली शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी ही पोवाड्यांचे वर्ग घेते. पिंपरी चिंचवडमध्येही पोवाडा शिक्षणाचे वर्ग सातत्याने चालतात.
२)" शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच " ही संस्था महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाहिरीच्या संगोपन,संवर्धन,आणि प्रशिक्षणाच्या अनुषंगाने काम करुन तरुण व होतकरूंना शाहिरी व लोकतालवाद्यांचे शास्त्रोक्त शिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. सेवानिवृत्त दारूबंदी सहाय्यक आयुक्त - समाज कल्याण, महाराष्ट्र शासन या पदावर काम केलेले राज्यशासनाचा राज्यसांस्कृतीक पुरस्कार प्राप्त *ज्येष्ठ शाहीर अंबादास तावरे* यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली " *शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच "* या संस्थेची सुरवात केली , पुढल्या वर्षी या संस्थेला १० वर्ष होत आहेत . या संस्थेने १० वर्षात केलेल्या कामाचा आढावा आपणांस पाठवीत आहे .
*शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच , औरंगाबाद .*
" शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच " ही संस्था गेल्या १० वर्षापासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी शाहिरीच्या संगोपन, संवर्धन, आणि प्रशिक्षणाच्या अनुषंगाने काम करुन तरुण व होतकरूंना शाहिरी व लोकतालवाद्यांचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहे. ह्यामुळे उदयोन्मुख शाहीर, वादक, कवी व कलावंतांच्या कलागुणांना वाव मिळत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमात, स्पर्धेत या मंडळींनी वाहवा मिळविली आहे,तसेच अनेक कलावंत व्यावसायिक कसोटीला पात्र ठरले असून शाहिरी व लोककलेची पताका उंचावत आहे.
शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंचाने आत्तापर्यंत *शाहिरी प्रशिक्षण शिबीर* , *शाहीरमहर्षी आत्माराम पाटील बालशाहीर पुरस्कार*
1) युवाशाहीर रामानंद उगले जालना. प्रथम बाल शाहीर पुरस्कार प्राप्त. २) युवा शाहीर पृथ्वीराज माळी सांगली. व इतर.आघाडीचे शाहीर व *महिला शाहीर पुरस्कार*,शाहिरी गायन स्पर्धा , शाहिरी पोवाडे व गीतलेखन स्पर्धा , शाहिरी पुस्तक प्रकाशन,ढोलकी प्रशिक्षण शिबीर , लोककलावंत मेळावे ,महिलांसाठी शाहिरी प्रशिक्षण शिबीर, शाहिरी सन्मान सोहळे आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे .
आणि याच सोबत 'लोकरंग', 'अक्षरधारा' ,'रात्र शाहिरांची', 'रंग शाहिरीचे',' जागर आत्मशाहिरीचा',*आत्मरंग* अशा या माध्यमातून शाहिरीचे व लोककलेचे असणारे रंग महाराष्ट्रात उधळले आहे .
आत्तापर्यंत मंचाने आठ बालशाहीर पुरस्कार प्रदान केले आहेत, याचे स्वरूप ५०००/- रु. रोख , स्मृतिचिन्ह, मानाचा फेटा, श्रीफळ असे आहे . यामुळे बालशाहीरांना खूप प्रोत्साहन मिळाले असून यामुळे हे पुरस्कार प्राप्त बालशाहीर आज व्यावसायिक तसेच टीव्ही चॅनेल सारख्या कसोटीस पात्र ठरले आहे .
त्याचसोबत मंचातर्फे झालेले पुस्तक प्रकाशन - १) *मराठवाड्याची शाहिरी*
( मराठवाड्यातील ५० शाहिरांचा परिचय पुस्तक )
२) *शाहिरी ललकार*
( मंचातर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शाहिरी पोवाडे व गीतलेखन स्पर्धेतील निवडक पोवाडे व गीत यांचे पुस्तक )
३) *शाहीर अज्ञानदास*
(आद्यशाहीर अज्ञानदास यांच्या माहितीचे पुस्तक )
४) *लोकरंग*
(ज्येष्ठ शाहीर अंबादास तावरे यांच्या पोवाडे व कवणाचे पुस्तक)
हे साहित्य उपलब्ध आहे .
यासोबत शाहीरमहर्षी आत्माराम पाटील शाहिरी मंच व लोककला प्रशिक्षण वर्ग - गरवारे कम्युनिटी सेंटर, गरवारे बालभवन , औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने
लोकशाहीर आपल्या भेटीला...* ही मालिका सुरू केली असून यामध्ये लोककलावंतांची मुलाखत व सादरीकरण बघायला मिळणार आहे . हे मालिका पर्व लोककला प्रेमी, लोककला अभ्यासक, लोककला शिकू इच्छिणारे विद्यार्थी तसेच लोककलेतील विविध विषयांवर PHD साठी विषय मांडणाऱ्या लोकांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचे आपल्या लोककलावंतासाठी Documentry व पुढच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचा साठा असून हे मालिका पर्व you tube चॅनेल वर बघायला मिळणार आहे .
तरी असे हे शाहिरीचे व लोककलेचे कार्य मंचातर्फे चालू आहे .
"शाहीर बाबूसिंह राजपूत कलामंच" ही बुलढाणा जिल्ह्यातील संस्था नवतरुणांना शाहिरी पोवाडे व गीतांचे प्रशिक्षण देते. कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून शाहिरी बाबूसिंह राजपूत यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी कार्यक्रम होतात.