क्रीडा कुस्ती

एकेरी पट तोड कुस्तीची व्याख्या लिहा?

2 उत्तरे
2 answers

एकेरी पट तोड कुस्तीची व्याख्या लिहा?

1
Kustimallavidya कुस्ती-मल्लविद्या डावाचे नाव- एकेरी पट कुस्तीप्रकार हनमंती कुस्ती

स्पष्टीकरण

विश्वातील सर्व वस्तूंना एक गुरुत्व मध्य अर्थात CENTRE OF GRAVITY असतो. मनुष्याला सुधा हा नियम लागू पडतो. मनुष्याचा गुरुत्वमध्य हा त्याच्या नभी म्हणजेच बेंबीत असतो. महाराष्ट्रातील कुस्ती हि सर्व मानस शास्त्रीय तथा भौतिक गोष्टींचा विचार करून बनलेली आहे. हा गुरुत्व मध्य आपण जर बाह्य शक्तीचा शास्त्रोक्त उपयोग करून हालवू शकलो तर प्रतिस्पर्ध्याला जमिनीवर पाडता येते. एकेरी पट हा डाव नेमके हेच करतो. पट याचा अर्थ पाय होय. एकेरी पट म्हणजे एक पाय धरणे.

एकेरी पट म्हणजे एक पाय धरून प्रतिस्पर्ध्याचा गुरुत्वमध्य हालवून त्याला जमिनीवर पाडणे. कुस्ती खेळत असताना जलदगतीने प्रतिस्पर्ध्याच का एक पाय आपल्या दोन्ही हाताने धरून त्याच्या बेंबीत डोक्याने धडक द्यावी, यामुळे प्रतिस्पर्धी आपला गुरुत्व गमावून समतोल सोडून जमिनीवर पडतो.
उत्तर लिहिले · 27/12/2021
कर्म · 121765
0
एकेरी पट तोड कुस्ती:

एकेरी पट तोड म्हणजे कुस्तीमधील एक डाव आहे. जेव्हा प्रतिस्पर्धी कुस्तीगीर तुमच्या एका पायाला पकडतो, तेव्हा तुम्ही त्याच्या पकडीतून सुटण्यासाठी जे तंत्र वापरता, त्याला एकेरी पट तोड म्हणतात.

  • एकेरी पट: प्रतिस्पर्धी तुमच्या एका पायाला पकडतो.
  • तोड: पकडलेल्या पायाला सोडवण्यासाठी केलेली क्रिया.

हा डाव बचाव करण्यासाठी आणि प्रतिस्पर्ध्यावर प्रतिहल्ला करण्यासाठी वापरला जातो.

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1660

Related Questions

कुस्तीसाठी खाशाबांचे शरीर बळकट होण्याची कारणे काय होती?
वडा​ पाला कोणत्या वयोगटाशी निगडित आहे?
2022 च्या कुस्ती महाराष्ट्र केसरी कोण ठरला?
महाराष्ट्रातील प्रमुख कुस्ती केंद्र कोठे आहे?
२०२२ चा कुस्तीतील महाराष्ट्र केसरी कोण आहे?
2022 चा कुस्तीतील महाराष्ट्र केसरी कोण ठरला?
कुस्तीसाठी पूरक कोणत्या पकडी आहेत, ज्यांची निर्मिती उत्तर पेशवाईत बाळंभट देवधर यांनी केली?